शहरं
Join us  
Trending Stories
1
Bombay High Court: अग्निवीराच्या कुटुंबीयांच्या याचिकेला उत्तर द्या, अन्यथा दंड ठोठावण्याचा उच्च न्यायालयाचा इशारा
2
Uddhav Thackeray: देश तोडण्याचा डाव विरोधी पक्षांनी उधळला, महाराष्ट्र धर्मच देशाला वाचवू शकतो: उद्धव ठाकरे
3
Mumbai Drug Party: गोळ्यांवर मर्सिडीज, ऑडी, ॲपलचा लोगो; तरुणांना ड्रग्जच्या विळख्यात ओढण्यासाठी मोठं षडयंत्र!
4
Devendra Fadnavis: ३३ टक्के महिला निवडून देईपर्यंत लढाई थांबणार नाही: देवेंद्र फडणवीस
5
...म्हणून अश्विनी बनायची रुकसाना, पोलिसांच्या सीक्रेट मिशनमुळे अनेक धक्कादायक गोष्टी समोर!
6
चर्चा की ढोंग? इराणच्या कार्गो शिपवर अमेरिकेचा ताबा; डोनाल्ड ट्रम्प यांची थेट युद्धभूमीवर नजर!
7
Video: "गेट आउट"! भाजपाच्या मोर्च्यासाठी वाहतूक रोखली; महिला भडकली, थेट गिरीश महाजनांवर ओरडली...
8
दिंडोरीत काळाचा क्रूर घाला! बिबट्याने उचलून नेलेल्या ३ वर्षीय चिमुरडीचा दुर्दैवी अंत; परिसरात शोककळा
9
SRH vs DC : आधी अभिषेक शर्मानं धुतलं; मग मलिंगा-हर्षचा जलवा! 'ऑरेंज आर्मी'समोर दिल्लीकर ठरले हतबल
10
पेट्रोलची कटकट मिटणार? आता गाड्या अल्कोहोलवर धावणार! इंधन टंचाईवर असा आहे सरकारचा 'E85' मास्टर प्लॅन
11
विशेष लेख: चिनी महिलांना हवाय नवऱ्यापासून घटस्फोट!
12
लेख: तुमचा पिझ्झा पोहोचविणारा उन्हात होरपळतो आहे, सावधान!
13
लेख: विधेयक पडले, पन्नास हजार कोटी रुपये वाचले!
14
आजचा अग्रलेख: हे नुकसान कसे मोजणार?
15
२०० पारच्या लढाईत KL Rahul पुन्हा अपयशी! अभिषेक शर्मानं फिल्डिंगमध्येही दाखवला क्लास
16
इस्लामाबाद चर्चा २.० पूर्वी डोनाल्ड ट्रम्प यांच्याकडून इराणच्या जनतेचं कौतुक, पण...! युएस-इराण युद्ध पुन्हा भडकणार?
17
अभिषेक शर्मा ठरला जगात भारी! टी-२० क्रिकेटमध्ये अशी कामगिरी करणारा तो पहिलाच
18
केरळमध्ये फटाका कारखान्यात मोठा स्फोट; १३ जणांचा मृत्यू, अनेक गंभीर जखमी
19
Abhishek Sharma Century : अभिषेक शर्माचा शतकी धमाका! किंग कोहलीसह 'या' दिग्गजांच्या विक्रमाची बरोबरी
20
वसई तहसीलला पुन्हा लाचेचे 'ग्रहण'; ७ लाखांची लाच स्वीकारताना खासगी इसम ताब्यात
Daily Top 2Weekly Top 5

नामनिर्देशनचा गुंता अद्याप कायम

By admin | Updated: October 27, 2016 00:56 IST

आॅनलाईन प्रक्रियेमुळे राज्यात नगरपरिषदेसाठी नामनिर्देशन पत्र भरण्याचा गोंधळ उडाला आहे.

चंद्रकांत कित्तुरे -- कोल्हापूर --आर्थिक दुर्बल घटकांसाठी (ईबीसी) वार्षिक उत्पन्नाची मर्यादा अडीच लाख रुपये असणाऱ्या, तसेच सहा लाखांपर्यंत उत्पन्न असलेल्या, परंतु ६० टक्क्यांपेक्षा अधिक गुण मिळविणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी राजर्षी छत्रपती शाहू महाराज शिक्षण शुल्क प्रतिपूर्ती योजना, तसेच पंजाबराव देशमुख वसतिगृह निर्वाह भत्ता योजना या योजनांचा लाभ २०१६-१७ या शैक्षणिक वर्षापासून मिळणार आहे. त्यासाठी पात्र विद्यार्थ्यांकडून कागदपत्रांची जुळवाजुळव सुरू झाली आहे.ईबीसीची मर्यादा वाढविण्याची घोषणा राज्यकर्त्यांकडून तीन वर्षांपासून केली जात होती; पण निर्णय होत नव्हता. राज्यात ईबीसीची मर्यादा वाढविण्यासह विविध मागण्यांसाठी मराठा क्रांती मूक मोर्चे निघाल्यानंतर सरकारवरील दबाव वाढला. त्यामुळे सरकारने १३ आॅक्टोबरला ईबीसी मर्यादा एक लाखावरून अडीच लाख करण्याची आणि सहा लाखांच्या आत उत्पन्न असणाऱ्या आणि ६० टक्क्यांपेक्षा अधिक गुण मिळविणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी राजर्षी छत्रपती शाहू महाराज शिक्षण शुल्क प्रतिपूर्ती योजना तसेच पंजाबराव देशमुख वसतिगृह निर्वाह भत्ता योजना या योजनांची घोषणा केली. परंतु ही योजना यंदापासून लागू होणार की पुढील शैक्षणिक वर्षापासून याची अंमलबजावणी होणार याबाबत संभ्रम होता. मात्र, सरकारने त्यासंदर्भातील अध्यादेश तातडीने जारी केल्याने या योजनेचा लाभ यंदापासूनच मिळणार हे निश्चित झाले. शालेय तसेच उच्च व तंत्रशिक्षण खात्यानेही संबंधित शाळा, महाविद्यालयांना परिपत्रक पाठवून या योजनांच्या परिपूर्तीसाठीचे वेळापत्रक कळविले आहे. त्यामुळे विद्यार्थ्यांनीही आॅनलाईन अर्ज भरणे सुरू केले आहे. सीमाभागातील विद्यार्थ्यांनाही लागूमहाराष्ट्रातील विद्यार्थ्यांबरोबरच कर्नाटकातील सीमाभागातील मराठी भाषिक विद्यार्थ्यांनाही या योजना लागू असल्याने त्यांनाही याचा लाभ मिळणार आहे.यासाठी त्यांना सीमाभागातील रहिवासाचे कर्नाटकचे प्रमाणपत्र द्यावे लागणार आहे.आॅनलाईन अर्ज भरावा लागणारईबीसी सवलतीसाठीचे अर्ज दहावी, बारावी, पदवी, मागील वर्षीच्या उत्तीर्णतेची गुणपत्रिका, अधिवास प्रमाणपत्र, उत्पन्नाचा दाखला, आधार कार्ड, प्रवेश फी, बॅँक खाते पावती, आदी कागदपत्रे अर्जासोबत जोडावी लागणार आहेत. २१ आॅक्टोबरपासून आॅनलाईन अर्ज भरण्यास सुरुवात झाली असून, अर्ज भरण्याची अंतिम मुदत १५ नोव्हेंबर ही आहे.शिष्यवृत्तीसंदर्भात कार्यशाळाकोल्हापूर, सांगली, सातारा जिल्ह्यांतील ८९ महाविद्यालयांच्या प्रतिनिधीसाठी कोल्हापुरातील शिक्षण सहसंचालक कार्यालयाने तीन दिवसीय प्रशिक्षण कार्यशाळाही घेतली आहे. असे प्रशिक्षण राज्यात प्रथमच कोल्हापुरात देण्यात आले आहे.उच्च व तंत्र शिक्षण महाविद्यालयांना ईबीसी सवलतीच्या मर्यादा वाढीचे परिपत्रक पाठविण्यात आले असून, आॅनलाईन अर्ज भरून घेण्याची प्रक्रिया सुरू झाली आहे. - डॉ. अजय साळी, सहसंचालक,उच्च व तंत्रशिक्षण विभाग, कोल्हापूरव्यावसायिक अभ्यासक्रमांनाही लाभशाळा, महाविद्यालयांबरोबरच उच्च व तंत्र शिक्षण विभागाच्या अखत्यारित येणारे अभियांत्रिकी, औषधनिर्माणशास्त्र, हॉटेल मॅनेजमेंट अ‍ॅँड केटरिंग टेक्नॉलॉजी, मास्टर आॅफ बिझनेस मॅनेजमेंट, मॉस्टर आॅफ मॅनेजमेंट स्टडीज, मास्टर आॅफ कॉम्प्युटर अ‍ॅप्लिकेशन या अभ्यासक्रमांनाही या योजनांचा लाभ मिळणार आहे.