पांढरकवडात कोरोना रुग्णांची नव्वदी पार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 28, 2020 05:00 IST2020-07-28T05:00:00+5:302020-07-28T05:00:17+5:30

सोमवारी दुपारपर्यंत मिळालेल्या माहितीनुसार एकाच दिवशी ४० जणांचे रिपोर्ट पॉझिटिव्ह असल्याचे निदान झाल्याने कोरोना रुग्णांनी नव्वदी पार केली आहे. आता पांढरकवडा शहरातील कोरोना रुग्णांची संख्या ९३ वर पोहचली असून यातील एकाचा यापूर्वीच कोरोनाने मृत्यू झाला आहे. या रुग्णांवर येथील कोविड सेंटरमध्ये उपचार सुरू आहेत.

Ninety crosses of corona patients in white supremacy | पांढरकवडात कोरोना रुग्णांची नव्वदी पार

पांढरकवडात कोरोना रुग्णांची नव्वदी पार

ठळक मुद्देसंसर्ग वेगाने वाढतोयं : पुन्हा ४० रुग्णांची भर, अ‍ॅक्टिव्ह रुग्णांची संख्या ९२

लोकमत न्यूज नेटवर्क
पांढरकवडा : शहरात कोरोनाचा उद्रेक सुरूच असून सोमवारी दुपारपर्यंत मिळालेल्या माहितीनुसार एकाच दिवशी ४० जणांचे रिपोर्ट पॉझिटिव्ह असल्याचे निदान झाल्याने कोरोना रुग्णांनी नव्वदी पार केली आहे. आता पांढरकवडा शहरातील कोरोना रुग्णांची संख्या ९३ वर पोहचली असून यातील एकाचा यापूर्वीच कोरोनाने मृत्यू झाला आहे. या रुग्णांवर येथील कोविड सेंटरमध्ये उपचार सुरू आहेत.
नव्याने ४० पॉझिटिव्ह आलेल्या रुग्णांपैकी आठजण हनुमान वॉर्डातील पॉझिटिव्ह व्यक्तीच्या संपर्कातील असून हे सर्वजण यापूर्वीच क्वारंटाईन करण्यात आले होते. इतर ३२ जण मस्जिद वार्ड परिसर व शहरातील अन्य भागातील आहेत.
पांढरकवडा शहरात जुलै महिन्यात कोरोना रुग्णांची संख्या झपाट्याने वाढत असून त्यामुळे प्रशासनावरील ताण चांगलाच वाढला आहे. नागरिकही धास्तावून गेले आहेत.
नव्याने पॉझिटिव्ह आलेल्या व्यक्तीच्या संपर्कातील व्यक्तींना क्वारंटाईन करण्याची प्रक्रिया सुरू झाली आहे. पांढरकवडा शहरात रुग्णांची वाढती संख्या लक्षात घेता. इतरही काही ठिकाणी क्वारंटाईन करण्यासाठी प्रशासनातर्फे व्यवस्था करण्यात येणार असल्याचे सांगितले जाते.
संपर्कातील व्यक्तींचे स्वॅब तपासणीसाठी पाठविण्यात येत असून तपासणी अहवाल काय येतो, याकडे नागरिकारंचे लक्ष लागले आहे.
ज्या भागातील रुग्ण कोरोना पॉझिटिव्ह आला, तो परिसर प्रशासनाच्यावतीने सील करण्यात येत आहे. रुग्णांची वाढती संख्या लक्षात घेता, अर्धे पांढरकवडा शहर सील होण्याची भीती व्यक्त केली जात आहे. नागरिकांनी घाबरून जाऊ नये. स्वत:ची काळजी घ्यावी अत्यावश्यक काम असेल तरच घराबाहेर पडावे, अन्यथा घरातच सुरक्षित थांबावे, असे आवाहन वैद्यकीय अधीक्षक डॉ.संजय तोडासे यांनी केले आहे.

यवतमाळच्या पथकाने केली पाहणी
यवतमाळचे निवासी उपजिल्हाधिकारी ललितकुमार वऱ्हाडे यांच्या नेतृत्वातील पथकाने सोमवारी पांढरकवडा शहरातील कोरोनाबाधित क्षेत्र म्हणून घोषित झालेल्या मस्जिद वॉर्ड, आंबेडकर वॉर्ड व हनुमान वॉर्डा परिसरातील व्यवस्थेची पाहणी केली. तसेच स्थानिक अधिकाऱ्यांना काही सुचनाही केल्या.

Web Title: Ninety crosses of corona patients in white supremacy