जिल्हा परिषदेचा नवा अध्यक्ष राकाँचाच

By Admin | Updated: September 13, 2014 00:33 IST2014-09-13T00:33:05+5:302014-09-13T00:33:05+5:30

जिल्हा परिषदेत काँग्रेससोबत राष्ट्रवादी आघाडी करणार हे निश्चित झाले आहे. शिवाय नवा अध्यक्ष हा राष्ट्रवादीचाच राहील असा दावा राष्ट्रवादीचे ....

The new chairman of the Zilla Parishad is formed | जिल्हा परिषदेचा नवा अध्यक्ष राकाँचाच

जिल्हा परिषदेचा नवा अध्यक्ष राकाँचाच

यवतमाळ : जिल्हा परिषदेत काँग्रेससोबत राष्ट्रवादी आघाडी करणार हे निश्चित झाले आहे. शिवाय नवा अध्यक्ष हा राष्ट्रवादीचाच राहील असा दावा राष्ट्रवादीचे आमदार संदीप बाजोरिया यांनी केला आहे. काँग्रेसला उपाध्यक्षपद दिले जाईल असे त्यांनी सांगितले. याचा निर्णय दोन्ही पक्षांच्या नेत्यांनी राष्ट्रवादी कार्यालयात झालेल्या संयुक्त बैठकीत घेतल्याचे त्यांनी सांगितले.
विधानसभा निवडणुकीचा बिगूल वाजताच स्थानिक पातळीवर एकमेकावर कूरघोडी करण्यात व्यस्त असलेली काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेसने सामोपचाराची भूमिका घेतली. जिल्हा परिषदेत काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेसची आघाडी होणार हे निश्चित मानले जात होते. आज यावर दोन्ही पक्षांच्या नेत्यांनी शिक्कामोर्तब केले आहे. राष्ट्रवादीच्या कार्यालयात झालेल्या बैठकीला ना.मनोहरराव नाईक, राष्ट्रवादीचे आमदार संदीप बाजोरिया, जिल्हाध्यक्ष नानाभाऊ गाडबैले यांच्यासह काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष आमदार वामनराव कासावार, जिल्हा परिषद सदस्य बाळासाहेब मांगुळकर आदी उपस्थित होते. या संयुक्त बैठकीतच जिल्हा परिषद आणि पंचायत समितीमध्ये आघाडी करण्याचा निर्णय घेण्यात आला.
जिल्हा परिषदेत राष्ट्रवादीचा अध्यक्ष तसेच पंचायत समितीमध्येसुद्धा राष्ट्रवादीचा सभापती राहणार असल्याचे आमदार बाजोरिया यांनी सांगितले आहे. अध्यक्ष व सभापतीपदाचा उमेदवार कोण राहणार या बाबत मात्र त्यांनी बोलण्याचे टाळले. १४ सप्टेंबर रोजी पंचायत समिती सभापती तर २१ सप्टेंबरला जिल्हा परिषद अध्यक्षपदासाठी निवड प्रक्रिया घेतली जाणार आहे. (कार्यालय प्रतिनिधी)

Web Title: The new chairman of the Zilla Parishad is formed