शहरं
Join us  
Trending Stories
1
राज्यात १८ प्रकल्पांत २.५६ लाख कोटींची गुंतवणूक; कोणत्या जिल्ह्यात किती रोजगार उपलब्ध होणार? 
2
ट्रम्प यांनी युद्धविराम वाढवला, पण इराणला नाही विश्वास, अमेरिकेसमोर ठेवली 'अशी' अट!
3
solar energy: सौरऊर्जा ग्राहकांना आणखी एक ‘झटका’, आता वीज शुल्क करही द्यावा लागणार
4
ट्रम्प यांची 'पीस-डील' धोक्यात! इराणच्या कट्टर धोरणामुळे मध्यपूर्वेत पुन्हा युद्धाचे सावट
5
ट्रम्प यांना खूश करण्यासाठी युक्रेनचा नवा डाव; डोनबासचा काही भाग आता होणार 'डोनीलँड'?
6
‘नाव मोठं लक्षण खोटं’... तरीही LSG संघ मालक संजीव गोयंका यांनी थोपटली रिषभ पंतची पाठ (VIDEO)
7
इराणनं अमेरिकेची नाकाबंदी तोडली, नाकाखालून घेऊन गेला ३४ टँकर्स; ९० कोटी डॉलर्सचं तेल 'होर्मुज'बाहेर! असा दिला चकमा
8
कॅप्टन रियान परागची चाल अन् गोलंदाजांची कमाल! RR नं पंतच्या LSG ला घरच्या मैदानात दिला पराभवाचा दणका
9
उकाड्याने हैराण पुण्यात अचानक पावसाचा वर्षाव; स्वारगेट, शास्त्री रोड परिसरात मध्यम सरी
10
LSG vs RR :अवघ्या ११ धावांत पंतसह तिघांच्या पदरी भोपळा! बडोनीनं स्वतःच्या पायावर मारून घेतली कुऱ्हाड
11
खर्गे मोदींना म्हणाले 'दहशतवादी'; निवडणूक आयोगाची मोठी कारवाई, २४ तासांत मागवलं उत्तर
12
एव्हीएशन सेक्टरमध्ये हाहाकार! या विमान कंपनीने अचानक २०,००० विमानफेऱ्या रद्द केल्या; एवढे काय घडले...?
13
Vaibhav Suryavanshi Fastest 500 : छोट्याखानी खेळीत महारेकॉर्ड! वैभव सूर्यवंशीनं रचला इतिहास
14
मालेगाव बॉम्बस्फोट खटल्यात मोठा निकाल; पुराव्याअभावी ४ आरोपींची निर्दोष मुक्तता!
15
LSG vs RR : शमीचा जलवा! यशस्वीपाठोपाठ ध्रुव जुरेल ठरला झिरो! लगेच संजीव गोएंकांनी काढला फोटो
16
प्रियकर मुलीच्या खोलीतून निघाला; चिडलेल्या बापाने पोटच्या १७ वर्षीय मुलीला संपवले
17
इराण-अमेरिका युद्धाचा फटका आता थेट 'फॅमिली प्लॅनिंग'ला! ३० टक्क्यांपर्यंत वाढू शकतात कंडोम्सचे भाव
18
उल्हासनगर महापालिकेत 'डम्पिंग'वरून रणकंदन; भाजप नगरसेवकांचे ठिय्या आंदोलन
19
कल्याणमध्ये ७० हजार रुपयांचा सायबर क्राईम : हेल्पलाईन तक्रार करुन दाद नाही
20
पाकिस्तानमधून इराणमध्ये दहशतवादी घुसले! रास्क सीमेवर मोठी चकमक; १२ दहशतवादी ठार
Daily Top 2Weekly Top 5

आर्णी बाजार समितीत राष्ट्रवादी, भाजप, सेना आघाडीची बाजी

By admin | Updated: October 11, 2016 02:51 IST

येथील कृषी उत्पन्न बाजार समितीच्या निवडणुकीत राष्ट्रवादी काँग्रेस, भाजपा आणि शिवसेना आघाडीने १३

आर्णी : येथील कृषी उत्पन्न बाजार समितीच्या निवडणुकीत राष्ट्रवादी काँग्रेस, भाजपा आणि शिवसेना आघाडीने १३ जागांवर विजय संपादित करत या निवडणुकीत बाजी मारली, तर काँग्रेस व सेना माजी आमदार गटाचा सफाया झाला. आर्णी बाजार समितीच्या निवडणूक निकालाकडे तालुक्याचे लक्ष लागले होते. सोमवारी झालेल्या मतमोजणीत राष्ट्रवादी, भाजपा आणि सेना आघाडीने विजय संपादित केला. त्यात राष्ट्रवादीचे आठ, भाजपा तीन, शिवसेना दोन असे १३ उमेदवार विजयी झाले. काँग्रेसचे चार उमेदवार विजयी झाले, तर दोन उमेदवार अविरोध निवडून आले होते. विजयी उमेदवारात राजेंद्र पाटील, रवींद्र नालमवार, संदीप बुटले, उमेश ठाकरे, दशरथ जाधव, नारायण गिलबिले, साधना तिवारी, गफूर शहा, मुनेश्वर आडे, अनिल जगताप, दुर्गा वानखडे, स्वप्नील राऊत, भोपीदास पेंदोर, तर काँग्रेस-शिवसेना माजी आमदार गटाचे राजू बुटले, अहमद तंवर, परशराम राठोड, उत्तम भोंडे निवडून आले. तर अमोल बेलगमवार, पवन पनपालिया अविरोध आले होते. आमदार ख्वाजा बेग, आमदार राजू तोडसाम, शिवसेनेचे प्रवीण शिंदे यांच्या गटाला या निवडणुकीत बहुमत मिळाले असून काँग्रेसच्या ताब्यातील ही बाजार समिती या गटाने ताब्यात घेतली आहे. तालुक्याच्या राजकीयदृष्ट्या महत्त्वाच्या या निवडणुकीत माजी मंत्री शिवाजीराव मोघे गटाला पराभव पत्करावा लागला. निवडणूक निर्णय अधिकारी म्हणून सुरेश अंबिलपुरे यांनी काम पाहिले. (तालुका प्रतिनिधी)