शहरं
Join us  
Trending Stories
1
मुंबईत ‘ऑपरेशन व्हाइट स्ट्राइक’, १,७४५ कोटींचे अमली पदार्थ जप्त; ३४९ किलो कोकेनही हस्तगत
2
आजचे राशीभविष्य - २ मे २०२६, आर्थिक, सामाजिक व कौटुंबिक क्षेत्रांत लाभ होतील, कुटुंबात सुख-शांती नांदेल
3
पुणे-मुंबई प्रवासाच्या स्वप्नाचा एक टप्पा पूर्ण, लवकरच नामकरण; अर्थव्यवस्थेला ७०००० कोटींची गती
4
महामुंबईत सायकल ट्रॅकचा ‘ट्रॅक’च हरवला!, सायकल आहे, पण चालवायची कुठे?; कोट्यवधींचा खर्च वाया
5
पेट्रोल-डिझेल दरवाढ उंबरठ्यावर?; व्यावसायिक गॅस सिलिंडरही महागले, निवडणुका आटोपताच तगडा झटका
6
कुजबुज! ठाण्यात पाऊल ठेवू देणार नाही म्हणणारे शिंदेसेनेचे पदाधिकारी राऊतांच्या स्वागताला पोहचले
7
पहिल्याच दिवशी मिसिंग लिंकवर ज्वलनशील पदार्थांची सर्रास वाहतूक; बंदी केवळ कागदावरच
8
मुंबई-पुणे ‘मिसिंग लिंक’ प्रकल्पासाठी सात देशांच्या तंत्रज्ञानाचा वापर; प्रमुख फायदे कोणते?
9
अजबच! बीकेसीत सायकल ट्रॅक बांधण्यासाठी ६० कोटी अन् आता काढण्यासाठी २५ कोटी खर्च केला
10
घरांच्या किमती कमी करण्याची म्हाडावर नामुष्की; विक्रोळीतील १,२२१ घरांच्या किमती ७.५ टक्क्यांनी कमी
11
‘MMC’ निवडणूक झाली, कौन्सिलमध्ये कोण असणार?; नामनिर्देशित की निवडून आलेले?, डॉक्टरांमध्ये संभ्रम
12
मध्य रेल्वेवर उद्या ‘नीट’मुळे ब्लॉक नाही; आज विशेष ब्लॉक, शेवटची लोकल सव्वाअकराची
13
आठ वर्षांच्या मुलीचे जबरदस्तीने चुंबन, आरोपीस ५ वर्ष सक्त मजुरीची शिक्षा, कोर्टानं ठरवलं दोषी
14
...तर अन्नपदार्थांचा उल्लेख धर्माचा अपमान ठरत नाही; शेखर सुमन, भारती सिंह यांना हायकोर्टाचा दिलासा
15
रोहित शेट्टी गोळीबारप्रकरणी १५ आरोपींवर आरोपपत्र दाखल; २ मुख्य आरोपी अद्यापही फरार
16
३ देशांतून तातडीने बाहेर पडा! UAEची नागरिकांना सूचना; सावधगिरीची इशारा की युद्धात उडी?
17
“महाराष्ट्राचे राजकीय महत्त्व कमी करायचा प्रयत्न, सरकारने आत्मपरीक्षण करावे”: हर्षवर्धन सपकाळ
18
माणुसकीला काळिमा! १२ वर्ष सिगरेटचे चटके, मग घटस्फोट देऊन घराबाहेर काढलं; हैवान पतीचा क्रूर चेहरा समोर
19
“महाविकास आघाडीने विकासाची लिंक मिस केली, आम्ही ती वेगाने कनेक्ट केली”: DCM एकनाथ शिंदे
20
लग्नाचे विधी सुरू होणार तोच पथक दारात! परभणीत बालविवाह रोखला; अल्पवयीन मुलीची बाल कल्याण समितीकडे रवानगी
Daily Top 2Weekly Top 5

दहेगावचे प्राथमिक आरोग्य केंद्र नामधारी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 30, 2019 05:00 IST

सदर आरोग्य केंद्राला परिसरातील अनेक गावे जोडण्यात आली आहे. दररोज १०० ते १५० रुग्ण याठिकाणी उपचारासाठी येतात. परंतु डॉक्टर उपलब्ध राहात नसल्याने त्यांना परिचारिका औषधोपचार करतात. थातूरमातूर उपचार घेवून नागरिकांना घरी परतावे लागते. यापरिसरात साथीच्या आजाराने तोंड वर काढले आहे. सर्दी, खोकला, ताप यासारख्या रुग्णांच्या संख्येत वाढ झाली आहे. तरीही दहेगाव आरोग्य केंद्राच्या डॉक्टरांना याविषयी काहीही देणेघेणे नसल्याचे दिसून येते.

ठळक मुद्देरुग्णांची गैरसोय : अधिकारी, कर्मचाऱ्यांना मुख्यालयाची अ‍ॅलर्जी, बाहेरगावहून बजावतात ड्युटी

लोकमत न्यूज नेटवर्कवडकी : राळेगाव तालुक्याच्या दहेगाव येथील प्राथमिक आरोग्य केंद्र नामधारी ठरले आहे. नागरिकांना अनेकदा उपचाराअभावी घरी परतावे लागते. शिवाय योग्य सेवाही मिळत नाही. अधिकारी आणि कर्मचाऱ्यांना मुख्यालयाची अ‍ॅलर्जी आहे.सदर आरोग्य केंद्राला परिसरातील अनेक गावे जोडण्यात आली आहे. दररोज १०० ते १५० रुग्ण याठिकाणी उपचारासाठी येतात. परंतु डॉक्टर उपलब्ध राहात नसल्याने त्यांना परिचारिका औषधोपचार करतात. थातूरमातूर उपचार घेवून नागरिकांना घरी परतावे लागते. यापरिसरात साथीच्या आजाराने तोंड वर काढले आहे. सर्दी, खोकला, ताप यासारख्या रुग्णांच्या संख्येत वाढ झाली आहे. तरीही दहेगाव आरोग्य केंद्राच्या डॉक्टरांना याविषयी काहीही देणेघेणे नसल्याचे दिसून येते.मुख्यालयी राहात नसलेल्या डॉक्टर व कर्मचाऱ्यांना आता दिवाळी सुट्यांचे निमित्त सापडले आहे. अत्यावश्यक सेवा असल्याने अधिकाऱ्यांनी उपस्थित राहणे आवश्यक आहे. परंतु वरिष्ठांचा वचक नसल्यामुळे स्थानिक रुग्णांना उपचार मिळत नाही. नाईलाजाने खासगी रुग्णालयात उपचार घ्यावे लागते. याप्रकाराकडे लक्ष द्यावे, अशी मागणी आहे. यासंदर्भात जिल्हा परिषद सदस्य प्रीती काकडे यांना विचारले असता, अधिकाऱ्यांनी मुख्यालयी राहून सेवा देणे आवश्यक आहे. दहेगाव आरोग्य केंद्राचे डॉक्टर मुख्यालयी राहात नसल्यास चौकशी केली जाईल, असे त्या म्हणाले.दिवाळीची सुटी असल्याने बाहेर आहे. नेहमी मुख्यालयी राहतो. अधिक माहितीसाठी प्रभारी असलेल्या अधिकाऱ्यांशी संपर्क करू शकतात.- सूरज पडगलवार, वैद्यकीय अधिकारी, पीएचसी दहेगाव.

टॅग्स :Healthआरोग्य