शहरं
Join us  
Trending Stories
1
Vaibhav Suryavanshi : फक्त १६ चेंडू खेळला अन् हवा करून गेला! वर्ल्ड रेकॉर्ड थोडक्यात हुकला, पण...
2
मोठी बातमी : भाजपचं धक्कातंत्र! विधान परिषद निवडणुकीसाठी ५ जणांची यादी जाहीर, कुणाला मिळाली संधी?
3
नांदेड विमानतळ परिसरात ‘गूढ गोलाकार वस्तू’! उडती तबकडी की साधा बलून?
4
पोलीस आयुक्तांचा धडाकेबाज निर्णय, एकाच दिवसात ४० शस्त्र परवाने रद्द 
5
मंत्री उदय सामंत अंतरवाली सराटीत मनोज जरांगे यांच्या भेटीला, एक तास चर्चा; कारण काय?
6
बाबासाहेबांनी ध्वनी प्रदूषणाचे कधीच समर्थन केले नसते, हायकोर्टाने समाजाला विचार व तत्वज्ञानाची जाणिव करून दिली
7
निवडणूक संपताच पेट्रोल-डिझेल महागणार? केंद्र सरकारनं दिलं मोठं स्पष्टीकरण! काय होणार?
8
नागपूर भाजप शहराध्यक्ष तिवारींचा मोबाईल हॅक, आरोपींकडून लोकांना पैशांची मागणी
9
PBKS vs RR : वैभव-यशस्वीचा धमाका; फरेरा-दुबेचा फिनिशिंग टच! राजस्थानने रोखला पंजाबचा विजयरथ
10
भाजपचे धक्कातंत्र, विदर्भातून प्रस्थापितांऐवजी सहकारतज्ज्ञ संजय भेंडेंना संधी; ‘मायक्रो प्लॅनर’ म्हणून आहे ओळख
11
१ मे पासून खिशाला कात्री! बँकिंगसह 'हे' मोठे नियम बदलणार; गॅस सिलिंडर स्वस्त होणार की महागणार?
12
PBKS vs RR : 'वंडर बॉय' वैभव सूर्यवंशीनं धु धु धुतलं! मग अर्शदीपनं लो फुलटॉसवर हिशोब केला चुकता
13
‘मुंबई-पुणे एक्स्प्रेस वे’ मिसिंग लिंकवर किती स्पीडने जाता येणार?; वेगमर्यादेची नियमावली आली!
14
विदर्भात १ मे पर्यंत पावसाळी ढग; पारा खाली येणार, पण उष्णतेची तीव्रता कायम राहणार
15
गुजरातमध्ये BJPचा डंका! १५ महानगरपालिकांवर कमळ फुलले; आप-काँग्रेस आपटले, कुणाला किती जागा?
16
PBKS vs RR: परफेक्ट सेटअप! १५० kmph वेगवान चेंडूसह पुन्हा प्रियांश आर्यवर भारी पडला जोफ्रा (VIDEO)
17
"हे 'सेल्फ रेडिकलायझेशन'चं प्रकरण, जिहाद करायचा म्हणजे..."; मिरा रोड हल्ल्यासंदर्भात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस स्पष्टच बोलले
18
इराण-अमेरिका युद्धात UAE चा मोठा निर्णय; OPEC आणि OPEC+ गटातून बाहेर पडणार
19
म्हाडाच्या २६४० घरांच्या लॉटरीला मुदतवाढ; १४ मे पर्यंत अर्ज सादर करण्याची मुदत
20
१३६३५७ घन मीटर क्षमता, गायब होते LNG टँकर जहाज; अचानक भारताजवळ दिसले, महिनाभर कुठे होते?
Daily Top 2Weekly Top 5

फाॅरेस्टचे फिरते पथक नावाला

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 10, 2021 05:00 IST

यवतमाळ मुख्यालयातील फिरत्या पथकाचा कारवाईचा आलेख यापूर्वीचा मोठा आहे. अनेक गंभीर प्रकरणे या पथकाने समोर आणली. धडक कारवाईमुळे लाकूड तस्कर व शिकार करणाऱ्यांमध्ये जरब निर्माण झाली होती. गेल्या काही दिवसांपासून फिरते पथक कार्यालयातच वेळ काढत असल्याने जंगल असुरक्षित झाले आहे. नागपूरच्या पथकाने यवतमाळात झालेली बिबट्याची शिकार, त्याचे अवयव व आरोपी यांना अटक करून ताब्यात घेतले.

लोकमत न्यूज नेटवर्कयवतमाळ : जिल्ह्यात मोठ्या प्रमाणात वनसंपदा लाभलेली आहे. त्यातही सर्वांत मौल्यवान असं सागवान येथे आहे. आता येथील जंगलांमध्ये वाघ, बिबट यासह विविध प्राण्यांचाही अधिवास जंगलांमध्ये वाढला आहे. यामुळे वनविभागाच्या फिरत्या पथकाची जबाबदारी सर्वाधिक आहे. मात्र, गेल्या दीड वर्षापासून या पथकाची कामगिरी शून्य आहे. ना लाकूड तस्करी उघड झाली, ना शिकारी हाती लागले.यवतमाळ मुख्यालयातील फिरत्या पथकाचा कारवाईचा आलेख यापूर्वीचा मोठा आहे. अनेक गंभीर प्रकरणे या पथकाने समोर आणली. धडक कारवाईमुळे लाकूड तस्कर व शिकार करणाऱ्यांमध्ये जरब निर्माण झाली होती. गेल्या काही दिवसांपासून फिरते पथक कार्यालयातच वेळ काढत असल्याने जंगल असुरक्षित झाले आहे. नागपूरच्या पथकाने यवतमाळात झालेली बिबट्याची शिकार, त्याचे अवयव व आरोपी यांना अटक करून ताब्यात घेतले. दोन वर्षांपूर्वीची घटना नुकतीच उघडकीस आणली. मात्र, स्थानिक पातळीवर काम करणाऱ्या या पथकाला याची साधी कुणकुणही लागली नाही. फिरत्या पथकाला केवळ मालकी प्रकरणात इंटरेस्ट आहे. त्यासाठी प्रति मीटर ४०० रुपये वसूल केले जातात. तर, टाल तपासणीच्या नावाखाली २५०० रुपये आकारले जाते. यातील बहुतांश ठिकाणी विनापासिंगचा हॅमरिंग नसलेला आडजात लाकडाचा माल कटाईला आणला जात आहे. मात्र, याकडे पूर्णत: डोळेझाक केली जात आहे. विशेषत: अकोला बाजार परिसरात हा आडजातचा माल ठराविक आरागिरण्यांवर पोहोचत आहे. 

गोदाम फैलातील टालांवर विशेष मर्जीगोदाम फैल परिसरातील दोन टालांवर वनविभागाच्या स्थानिक पथकाची विशेष मर्जी दिसत आहे. त्यामुळेच अवैधरीत्या कटाई केलेले आडजात लाकूड बिनधास्तपणे या टालांवर आणले जात आहे. याचे ट्रक दररोज शहरात भरून येत आहेत. त्यावर आजतागायत कारवाई करण्यात आली नाही. याचे पर्यावरणप्रेमींकडून आश्चर्य व्यक्त होत आहे.

 

टॅग्स :forest departmentवनविभाग