शहरं
Join us  
Trending Stories
1
पाकिस्तान निघाला अमेरिका-इराण शांतता करार घडवून आणायला, दोनच आठवड्यांत बसला २०० अब्जांचा फटका; शाहबाज यांना मोठा धक्का!
2
रिंकूची बॅटिंगसह फिल्डिंगमध्ये कमाल! LSG विरुद्ध सुपर ओव्हरमध्ये नरेन ठरला KKR च्या विजयाचा हिरो
3
शेअर्स मार्केट मध्ये मोठा परतावा देण्याच्या नावाखाली गंडा, फरार सागर कारिवडेकर अखेर ताब्यात
4
LSG vs KKR : नो बॉलचा ड्रामा! शमीनं शेवटच्या चेंडूवर सिक्सर मारला अन् सामन्यात सुपर ओव्हरचं ट्विस्ट
5
सूर्य कोपला, विदर्भात तापला! उष्णतेचा कहर; अकोल्यात देशातील सर्वाधिक ४६.९ अंश सेल्सिअस तापमान
6
बेलसर येथे ड्रेनेज टाकी साफ करताना तीन कामगारांचा गुदमरून मत्यू 
7
पाकिस्तानात 'अज्ञाता'चा पुन्हा थरार; लष्करचा टॉप कमांडर शेख युसूफ अफ्रिदीचा 'खातमा'! नेटवर्कला मोठा धक्का
8
LSG vs KKR : लखनौच्या मैदानात रिंकू सिंहचा 'मैं हूँ ना' शो! MS धोनीचा १५ वर्षांपूर्वीचा विक्रम मोडला
9
शिवाजी महाराज पूज्यनियच, माझ्या वक्तव्याचा विपर्यास केलागेला - धीरेंद्र शास्त्री
10
"फक्त जिम करून बॉलर होणार नाहीस, तर..." शमीच्या तालमीत कसा घडला मोहसिन खान?
11
बाजारात आली नवीन इलेक्ट्रिक कार, ६३० किमी रेंज, केवळ ९ मिनिटांत होईल फुल चार्ज! जबरदस्त आहेत फीचर्स
12
ट्रेनवर चढलेल्या युवकाचा विजेच्या धक्क्याने मृत्यू, ओएचई वायरला स्पर्श; विद्युत पुरवठा विस्कळीत, रेल्वे पोलिसांत गुन्हा दाखल
13
पंतनं खिलाडूवृत्ती नाही जपली! Angkrish Raghuvanshi ची विकेट ठरली वादग्रस्त; नेमकं काय घडलं?
14
DCM शिंदेंनी केली ‘मिसिंग लिंक’च्या कामाची पाहणी; कोणत्या वाहनांना परवानगी अन् टोल किती?
15
"महिलांना वर्षाला ३६०००, प्रत्येक घुसखोराला हाकलून लावणार अन् TMC..."; पंतप्रधान मोदींची मोठी घोषणा
16
भूषण गवई-धीरेंद्र शास्त्री भेटीवरून टीका, CM फडणवीसांनी सुनावले; म्हणाले, “श्याम मानव कोण?”
17
साई सुदर्शनचा जलवा; ऋतुराजची जिगरबाज खेळी व्यर्थ! चेपॉकच्या मैदानात गुजरातनं उडवला चेन्नईचा धुव्वा
18
जय श्रीराम! आता मुंबईतून अयोध्या गाठणे सुलभ, अमृत भारत ट्रेन सुरू होणार; पाहा, थांबे-वेळा
19
जयपूरच्या राजघराण्यातील 'सुपरकॉम्प्युटर'चा लंडनमध्ये लिलाव; १७व्या शतकातील यंत्र आजही कार्यरत...
20
आता ‘वंदे भारत बुलेट ट्रेन’ येणार, बंगळुरूत बांधणी; ICF-BEMLवर जबाबदारी, रेल्वेची मेगा योजना!
Daily Top 2Weekly Top 5

‘एनए’चा लाभ बिल्डरांनाच अधिक

By admin | Updated: July 18, 2014 00:19 IST

नगरपरिषद क्षेत्रातून एनए (अकृषक) हद्दपार करण्याचा निर्णय शासनाने घेतला असला तरी त्याचा सर्वाधिक फायदा हा बिल्डर लॉबीलाच होणार आहे. या निर्णयाने ही लॉबी सुखावली आहे.

नगरपरिषद क्षेत्र : यवतमाळ शहरात शेतकऱ्यांकडे जमिनी उरल्याच कुठे ? राजेश निस्ताने - यवतमाळ नगरपरिषद क्षेत्रातून एनए (अकृषक) हद्दपार करण्याचा निर्णय शासनाने घेतला असला तरी त्याचा सर्वाधिक फायदा हा बिल्डर लॉबीलाच होणार आहे. या निर्णयाने ही लॉबी सुखावली आहे. कारण नगरपरिषद क्षेत्रात आता कुण्याही शेतकऱ्याच्या मालकीची जमीन शिल्लक नाही.त्यावर बिल्डरांनी केव्हाचा कब्जा केला आहे. शासनाने बुधवारी महापालिका आणि नगरपरिषद क्षेत्रातून बिगरशेती परवाना हद्दपार करण्याचा निर्णय घेतला. या निर्णयाचा नेमका फायदा कोणाला याची चर्चा आता सुरू झाली आहे. त्यात हा निर्णय बिल्डरांच्याच हिताचा अधिक असल्याचे दिसून येते. कारण शेतकऱ्यांच्या जमिनी या ग्रामपंचायत क्षेत्रात आहेत. नगरपरिषद क्षेत्रात एक तर मोठ्या जागा अथवा शेती शिल्लक नाही. जी काही थोडीथोडकी शेती शिल्लक असेल ती आता शेतकऱ्याच्या मालकीची राहिलेली नाही. गब्बर राजकारणी, बिल्डर लॉबीने खूप आधी ती थोड्या पैशात शेतकऱ्यांकडून खरेदी केली. आज त्याच जमिनीचे भाव कितीतरी पटींनी वाढले आहेत. मंदी असूनही या जमिनींना मागणी असून भावही तेवढेच गगणाला भिडले आहे. शासनाच्या नगरपरिषद क्षेत्रातून एनए हद्दपारीच्या निर्णयाचा या जमिनीचे मालक असलेल्या बिल्डरांना मोठा फायदा होणार आहे. पूर्वी अकृषक परवान्याचे अधिकार महसूल विभागाकडे होते. त्यासाठी तब्बल २२ शासकीय विभागांचे नाहरकत प्रमाणपत्र बंधनकारक होते. त्यानंतर नगररचना विभागाची मोहर उमटत होती. तेव्हा कुठे अकृषक परवाना मिळत होता. हे सर्व दिव्य पार करताना जमीन मालकाला जागोजागी पैसा मोजावा लागत होता. त्यात मोठ्या प्रमाणात पैसा आणि वेळ खर्ची पडत होता. या सर्व कटकटीतून आता बिल्डरांची मुक्तता होणार आहे. यवतमाळ नगरपरिषद क्षेत्राचा विचार केल्यास शहरात शेती योग्य अगदी बोटावर मोजण्याएवढ्या जमिनी आहेत. त्यात यवतमाळ जिल्हा कारागृहाची बसस्थानक रोडवरील चार एकर जमीन आणि कृषी खात्याच्या गार्डन रोडवरील जमिनीचा समावेश आहे. याशिवाय धामणगाव रोडवर नागपूर बायपास परिसर, गिरजानगर, नारिंगेनगर या भागात काही प्रमाणात शेती आहे. परंतु धामणगाव रोडवरील सर्व शेती ही बिल्डर लॉबीच्या ताब्यात आहे. या जागेवर ले-आऊट थाटण्यासाठी अथवा बांधकाम करण्यासाठी या लॉबीला आता नगरपरिषद क्षेत्रात असल्याने अकृषक परवान्याची आवश्यकता राहणार नाही. त्यासाठी त्यांना केवळ नगरपरिषदेची परवानगी घ्यावी लागणार आहे. ही परवानगी मिळाल्यानंतर त्याची माहिती एक महिन्याच्या आत महसूल खात्याला कळविणे बंधनकारक करण्यात आले आहे. त्या आधारे महसूल विभाग रुपांतर कर व बिनशेती कर आकारणी करणार आहे. नगरपरिषद क्षेत्रात काही जमिनी सौंदर्यीकरण, तलाव अशा कामांसाठी आरक्षित केल्या जातात. या जमिनी नगरपरिषद खरेदी करेल असा करार असला तरी प्रत्यक्षात नगरपरिषदांची आर्थिक क्षमता नसल्याने वर्षानुवर्षे आरक्षणाच्या नावाखाली या जमिनी तशाच पडून राहतात. आता अशा जमिनींसाठीही संबंधित मालकाला पर्यायी ठिकाणी एफएसआय वाढवून देण्याचे शासनाचे धोरण आहे. शासनाच्या या नव्या निर्णयाचा सामान्य नागरिकांना कमी आणि बिल्डर लॉबीलाच अधिक फायदा असल्याचे स्पष्ट होते. त्यामुळे शासनाने ऐन विधानसभा निवडणुकांच्या तोंडावर बिल्डर लॉबीचे रखडलेले प्रकल्प मार्गी लावण्यासाठी, त्यांना खूश करण्यासाठी तर हा निर्णय घेतला नाही ना अशी शंका व्यक्त केली जाऊ लागली आहे.