शहरं
Join us  
Trending Stories
1
Rahul Gandhi: ‘भारताचा आत्मा वाचवण्यासाठीच विधेयक रोखले!’- राहुल गांधी
2
PM Modi: महिला आरक्षण रोखून विरोधकांनी पाप केले; त्यांना शिक्षा मिळणारच: पंतप्रधान मोदी
3
Iran fires on Indian ships: होर्मुजच्या सामुद्रधुनीमध्ये भारतीय जहाजांवर गोळीबार; इराणचे पुन्हा निर्बंध 
4
मोठी अपडेट! गोळीबारात एक जहाज होर्मुझमधून निसटले, इराणने भारताची १४ जहाजे रोखलेली
5
IPL 2026 : मलिंगाचा भेदक मारा; महागडा प्रफुलही शेवटी चमकला! CSK ला रोखत SRH नं मैदान मारलं
6
हा तर डिस्ट्रेस एड्रेस! पंतप्रधान मोदींच्या संबोधनावर काँग्रेसकडून पलटवार झाला; खर्गे म्हणाले, हताश होऊन पंतप्रधान...
7
आयुष म्हात्रेनं लंगडत लंगडत धाव घेतली; धोका पत्करुन डाव खेळला तोही फसला! पण खरंच याची गरज होती का?
8
भारतीय जहाजांवर हल्ला केल्यानंतर इराणची मोठी घोषणा; आता युद्ध संपेपर्यंत होर्मुझ ताब्यात ठेवणार...
9
"काल आमचे संख्याबळ कमी पडले, पण..."; महिला आरक्षणावरून PM मोदींचा निर्धार
10
संजू सॅमसनमध्ये दिसली MS धोनीची झलक; यशस्वी रिव्ह्यूसह CSK ला मिळवून दिली अभिषेकची विकेट
11
"स्त्री सर्व काही विसरू शकते, पण...!" महिला आरक्षण विधेयक पाडल्यावरून पंतप्रधान मोदी संतापले, भ्रूण हत्या संबोधले
12
"तुम्हीच परवानगी दिली आणि आता गोळीबार करताय?" भारतीय कॅप्टनचा इराणच्या नेव्हीकडून विश्वासघात,रेडिओवरील थरार समोर
13
Abhishek Sharma Fastest Fifty : अभिषेकची वादळी खेळी! रैना, ईशानला मागे टाकत वैभव सूर्यवंशीची बरोबरी
14
"विरोधकांनी राजकारण करून विधेयक मंजूर होऊ दिले नाही...", महिला आरक्षणावरून पंतप्रधान मोदींची टीका
15
'जग अर्णव' थोडक्यात बचावले; भारत संतापला, इराणच्या राजदूताला बजावले समन्स
16
IPL 2026 : मिलरचा किलर फिनिशिंग टच! RCB विरुद्धच्या रंगतदार सामन्यात DC नं अखेरच्या षटकात मारली बाजी
17
Akshaya Tritiya 2026 Wishes: अक्षय्य तृतीयेच्या हार्दिक शुभेच्छा, मराठी Messages, Images, Whatsapp Status शेअर करत साजरा करा अक्षय्य तृतीयेचा सण
18
"मम्मी, मी पास झाले..."; दहावी पास होताच लेकीने आईला केला फोन; Video पाहून व्हाल भावुक
19
इराणकडून भारतीय जहाजांवरच गोळीबार? टँकर VLCC माघारी परतला, होर्मुझमध्ये काय घडले...
20
कर्नाटकात 'बर्ड फ्लू'चा शिरकाव! बेंगळुरूमधील पोल्ट्री फार्ममध्ये H5N1 विषाणूचा प्रादुर्भाव; हजारो कोंबड्यांना पुरले
Daily Top 2Weekly Top 5

माझी शिक्षकाची भूमिका अत्यंत आवडीची

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 18, 2017 22:25 IST

वृत्तपत्राचे संपादन, विविध विषयांवरील भाषणे, आकाशवाणीचे चिंतन-भाषण, साप्ताहिकातील लेखन, ‘नुटा’चे संघटन, कवी, लेखक या विविध भूमिका मी केल्या असल्या तरी शिक्षकाची भूमिका ही माझी सर्वात आवडती आहे.

ठळक मुद्देशरद कळणावत : कृतार्थ पुरस्काराने सन्मानित

लोकमत न्यूज नेटवर्कयवतमाळ : वृत्तपत्राचे संपादन, विविध विषयांवरील भाषणे, आकाशवाणीचे चिंतन-भाषण, साप्ताहिकातील लेखन, ‘नुटा’चे संघटन, कवी, लेखक या विविध भूमिका मी केल्या असल्या तरी शिक्षकाची भूमिका ही माझी सर्वात आवडती आहे. कारण, जीवनाचा अर्थ सांगणारा संदेश शिक्षकांना विद्यार्थ्यांकडून मिळत असतो. विद्यार्थी हेच शिक्षकांची प्रेरणा असते, असे प्रतिपादन साहित्यिक प्रा.डॉ. शरद कळणावत यांनी ‘कृतार्थ’ पुरस्कार स्वीकारताना केले. अध्यक्षस्थानी दीपक आसेगावकर, तर प्रमुख वक्ते म्हणून विचारवंत आशुतोष अडोणी होते.डॉ. कळणावत पुढे म्हणाले, आयुष्यात भीती बाळगण्याचे कारण नाही. आपले कसे होईल, ही काळजी न करता कोणतेही काम करण्याची लाज वाटता कामा नये. आपल्याबरोबर काम करणारी सर्व माणसे सारखी आहेत, बरोबरीची आहेत, ही वागणूक दिली तर माणसे जोडता येतात. डोक्यावर बांधलेला फेटा डोक्यात जाता कामा नये, एवढी काळजी मात्र घ्यायला हवी.प्रमुख वक्ते आशुतोष अडोणी म्हणाले, ‘कृतार्थ’ पुरस्कार सोहळा हा संवेदनतेचा-आत्मियतेचा, हृदयंगम सोहळा आहे. डॉ. कळणावत यांच्या साहित्याची जातकुळीच वेगळी आहे.अध्यक्ष दीपक आसेगावकर यांचे यावेळी मार्गदर्शन झाले. आचार्य पदवी प्राप्त झाल्याबद्दल सतपाल सोहळे यांचा यावेळी सत्कार करण्यात आला. प्रास्ताविक विद्या शेट्टीवार यांनी केले. संचालन जयंत चावरे यांनी, तर सन्मान पत्राचे वाचन मंगेश खुने यांनी केले. विचारपीठावर कृतार्थ पुरस्कार समितीचे कार्याध्यक्ष असलम गफ्फार खान, आयोजन समितीचे अध्यक्ष अनंत कवलगीकर, लीलाताई बनगीनवार आदींची उपस्थिती होती.