शहरं
Join us  
Trending Stories
1
‘धर्मांतरासारखे प्रकार खपवून घेऊ नका’ मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचे पोलिसांना कडक निर्देश
2
Air Travel Rules: ...तर ‘त्या’ प्रवाशांना विमानात ‘नो एन्ट्री’, नव्या नियमांचा मसुदा तयार!
3
आजचे राशीभविष्य, १९ एप्रिल २०२६: शारीरिक व मानसिक आरोग्य उत्तम राहील, आर्थिक बाबीत सावध राहा!
4
आयत्या पिठावर रेघोट्या मारून राजकारण होत नाही; जनतेची कामे करा: एकनाथ शिंदे
5
Gold Rates: सोन्याचे दर खाली घसरतील की आणखी चढतील?
6
Supreme Court: घर मालकीहक्काचा निर्णय सोसायटी घेऊ शकत नाही : उच्च न्यायालय
7
Maharashtra Weather: अलर्ट! राज्यावर दुहेरी संकट, कडक उन्हासोबत अवकाळी पावसाचा शक्यता
8
जबरदस्तीने फोटो काढून अत्याचार अन् धर्मांतरास प्रवृत्त केल्याचा आरोप;  पंचवटी पोलिसांची मोठी कारवाई
9
केंद्रीय कर्मचाऱ्यांना गुड न्यूज; महागाई भत्ता २ टक्के वाढला; पेन्शनरांनाही होणार लाभ 
10
मुंबईत यकृत प्रत्यारोपणासाठी ८३७ रुग्ण वेटिंगवर, अवयवदानाबाबत पुन्हा जागरुकतेची आवश्यकता
11
Rahul Gandhi: ‘भारताचा आत्मा वाचवण्यासाठीच विधेयक रोखले!’- राहुल गांधी
12
खेळण्यातील कारचा वापर करून हल्ल्याचा कट, ४ संशयित दहशतवाद्यांना अटक
13
PM Modi: महिला आरक्षण रोखून विरोधकांनी पाप केले; त्यांना शिक्षा मिळणारच: पंतप्रधान मोदी
14
Iran fires on Indian ships: होर्मुजच्या सामुद्रधुनीमध्ये भारतीय जहाजांवर गोळीबार; इराणचे पुन्हा निर्बंध 
15
मोठी अपडेट! गोळीबारात एक जहाज होर्मुझमधून निसटले, इराणने भारताची १४ जहाजे रोखलेली
16
IPL 2026 : मलिंगाचा भेदक मारा; महागडा प्रफुलही शेवटी चमकला! CSK ला रोखत SRH नं मैदान मारलं
17
हा तर डिस्ट्रेस एड्रेस! पंतप्रधान मोदींच्या संबोधनावर काँग्रेसकडून पलटवार झाला; खर्गे म्हणाले, हताश होऊन पंतप्रधान...
18
आयुष म्हात्रेनं लंगडत लंगडत धाव घेतली; धोका पत्करुन डाव खेळला तोही फसला! पण खरंच याची गरज होती का?
19
भारतीय जहाजांवर हल्ला केल्यानंतर इराणची मोठी घोषणा; आता युद्ध संपेपर्यंत होर्मुझ ताब्यात ठेवणार...
20
"काल आमचे संख्याबळ कमी पडले, पण..."; महिला आरक्षणावरून PM मोदींचा निर्धार
Daily Top 2Weekly Top 5

मुकुटबन पोलिसांचा चक्क आदिलाबादमध्ये ‘फेरफटका’

By admin | Updated: February 27, 2015 01:39 IST

यवतमाळ जिल्ह्यातील मुकुटबन पोलीस फेरफटका मारण्यासाठी महिन्यातून अनेकदा तेलंगण राज्यातील आदिलाबादला जात असल्याचा खळबळजनक प्रकार उघडकीस आला आहे.

बी.संदेश आदिलाबादयवतमाळ जिल्ह्यातील मुकुटबन पोलीस फेरफटका मारण्यासाठी महिन्यातून अनेकदा तेलंगण राज्यातील आदिलाबादला जात असल्याचा खळबळजनक प्रकार उघडकीस आला आहे.वास्तविक पोलिसांना तपासासाठी जिल्ह्याबाहेर जायचे असेल तर पोलीस अधीक्षकांची आणि राज्याबाहेर जायचे असेल तर किमान विशेष पोलीस महानिरीक्षकांची पूर्वपरवानगी घेणे बंधनकारक आहे. मात्र मुकुटबन पोलीस कुणाचीही परवानगी न घेता आणि अनेकदा ठाणेदारालाही अंधारात ठेवून थेट आदिलाबादमध्ये फेरफटका मारण्यासाठी जात असल्याचे आढळून आले आहे. विनाकारण शासकीय वाहनाचा होणारा हा वापर रोखणार कोण, हा मुख्य प्रश्न आहे. अर्थात मुकुटबन ठाण्याच्या पोलीस जीपचे लॉगबुकही संशयास्पद असावे, बोगस पद्धतीने ते भरले जात असावे, असे दिसते. पोलीस वाहनांवर जीपीआरएस सिस्टीम अशाच भानगडी रोखण्यासाठी लावण्याचे शासनाचे धोरण आहे. मात्र मुकुटबन ठाण्याच्या या जीपला ही जीपीआरएस सिस्टीम लागलेली नाही. त्याचाच फायदा काही पोलीस कर्मचारी उठवित असल्याचे दिसून येते.दोन दिवसांपूर्वी आदिलाबाद बसस्थानक परिसरात यवतमाळ जिल्ह्यातील पोलिसांचे बोलेरो वाहन (एम.एच.२९/एम-९६१२) फिरताना आढळून आले. या वाहनात एक पोलीस अधिकारी, महिला पोलीस शिपाई व चालक दिसून आला. एखाद्या गुन्ह्याच्या तपासासंदर्भात हे वाहन आले असावे, या हेतूने यासंदर्भात आदिलाबाद पोलिसांशी संपर्क साधला असता त्यांनी देखील याबाबत आपल्याला कोणतीही माहिती नसल्याचे सांगितले. त्यामुळे पत्रकारांनी या प्रकरणाचा पाठपुरावा केला असता हे पथक कोणत्याही तपास किंवा आरोपीच्या शोधात आले नसून केवळ फेरफटका मारण्यासाठी शहरात आल्याचे सांगण्यात आले. या पथकाने आदिलाबाद पोलिसांशीदेखील कोणताही संपर्क केला नव्हता. अनेकदा हे पथक केवळ फिरण्यासाठी आदिलाबादमध्ये येत असल्याचेही काहींनी सांगितले. शासकीय वाहनाचा गैरवापर व कर्तव्याला बगल देवून केवळ फेरफटका मारणाऱ्यांवर वरिष्ठ काही कारवाई करतात का याकडे आदिलाबादकरांचे लक्ष लागले आहे.सदर प्रतिनिधीने यवतमाळ पोलीस मुख्यालयात चौकशी केली असता सदर क्रमांकाचे वाहन मुकुटबन पोलीस ठाण्याचे असल्याचे निष्पन्न झाले. मुकुटबनपासून तेलंगणची हद्द अगदी जवळ आहे. त्यामुळेच सीमावर्ती भागातील पोलीस अनेकदा आदिलाबादमध्ये जातात. कित्येकांचे तर व्यवहार, खरेदीसुद्धा आदिलाबादमध्ये आहे. मुकुटबनप्रमाणेच वणी व पांढरकवडा विभागातील अन्य सीमावर्ती ठाण्यातील पोलीस वाहनेही अशाच पद्धतीने नियमबाह्यरीत्या केवळ फेरफटका मारण्यासाठी आदिलाबादमध्ये जात असावी, असा संशय येथे व्यक्त केला जात आहे.