शेतीच्या नावाने गाळ वीटभट्टीवर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 29, 2020 05:00 AM2020-05-29T05:00:00+5:302020-05-29T05:00:40+5:30

धरणातून गाळ उपसण्यासाठी पाटबंधारे विभागाने १०० ब्रासच्या तीन परवानगी दिल्या आहे. या ठिकाणी धरणात ३० ते ४० टिप्पर गाळ नेण्यासाठी सारख्या येरझारा मारताहेत. त्याकरिता ६ जेसीबी धरणात उतरविण्यात आले आहे. एक वाहन ८ ते १० येरझारा मारते. यातून संपूर्ण रस्ता क्षतीग्रस्त झाला. हा गाळ शेतकऱ्यांच्या शेतात न जाता निम्मा गाळ दारव्हा आणि यवतमाळच्या दिशेने दररोज वळता होत आहे.

On the mud brick kiln in the name of agriculture | शेतीच्या नावाने गाळ वीटभट्टीवर

शेतीच्या नावाने गाळ वीटभट्टीवर

Next
ठळक मुद्देमातीची साठवणूक : गोकी धरणातील गाळ चालला दारव्हा, यवतमाळकडे

लोकमत न्यूज नेटवर्क
यवतमाळ : शेतकऱ्यांच्या नावावर वीटभट्टी चालकांनी मातीचे मोठ्या प्रमाणात उत्खनन सुरू केले आहे. क्षमतेपेक्षा अधिक गाळाची ने-आण होत आहे. यातून शासनाच्या तिजोरीला फटका बसला आहे. तहसील प्रशासनाने याची दखल घेण्याची मागणी नागरिकांकडून होत आहे.
दारव्हा तालुक्यातील गोकी प्रकल्पात मोठ्या प्रमाणात गाळ आहे. हा गाळ शेतजमिनीसाठी सुपीक आहे. मात्र मोजक्याच शेतकऱ्यांना गाळ काढता आला. व्यापाऱ्यांनी या गाळावर आपली नजर वळविली आहे. विटभट्टीकरिता शेतकऱ्याच्या नावावर अर्धा गाळ वळता केला आहे. शहराबाहेर हा गाळ डम्प केला जात आहे.
धरणातून गाळ उपसण्यासाठी पाटबंधारे विभागाने १०० ब्रासच्या तीन परवानगी दिल्या आहे. या ठिकाणी धरणात ३० ते ४० टिप्पर गाळ नेण्यासाठी सारख्या येरझारा मारताहेत. त्याकरिता ६ जेसीबी धरणात उतरविण्यात आले आहे. एक वाहन ८ ते १० येरझारा मारते. यातून संपूर्ण रस्ता क्षतीग्रस्त झाला. हा गाळ शेतकऱ्यांच्या शेतात न जाता निम्मा गाळ दारव्हा आणि यवतमाळच्या दिशेने दररोज वळता होत आहे.

तहसीलदार येणार असल्याची पूर्वसूचना
गोकी प्रकल्पाच्या बुडीत क्षेत्रातील अवैध उत्खननाचा मुद्दा माध्यमातून चर्चेला आल्यानंतर दारव्हाचे प्रभारी तहसीलदार संजय जाधव यांनी अकस्मात या उत्खननावर धाड घालण्याचा प्रयत्न केला. मात्र तहसीलदार साहेब येणार याची पूर्वसूचना उत्खनन करणाºयांना मिळाल्याने ते सावध झाले होते. उत्खननासाठी वापरणारे जेसीबी व ट्रक परिसरातच उभे होते. मात्र ही वाहने सोडून चालक व मालक तेथून पसार झाले होते. तहसीलदारांना केवळ खोदलेला परिसर व उभी असलेली वाहने हेच पाहावयास मिळाले. आता यात तहसीलदारांकडून कोणावर काय कारवाई होते, याकडे परिसरातील ग्रामस्थांचे लक्ष लागले आहे.

परवानगी केवळ ४०० ब्रासचीच
गोकी प्रकल्पातून ४०० ब्रास गाळ काढण्याला परवानगी कार्यकारी अभियंत्यांनी दिली आहे. या परवानगीच्या आधारे ३१ मेपर्यंत हा गाळ काढण्याच्या सूचना संबंधितांना प्रभारी तहसीलदारांनी दिल्या आहेत. यासाठी शेतकऱ्यांचे नाव पुढे करण्यात आले आहे. दोन वीटभट्टी चालकांना १६० रूपये ब्रासप्रमाणे गाळ नेण्यास मुभा आहे. या भागात ३० ते ४० टिप्पर आणि सहा जेसीबी गाळ काढण्याचे काम करीत आहे. याबाबत प्रशासनाला अंधारात ठेवण्यात आले आहे.

मी मंडळ अधिकाऱ्याला पाहणीसाठी पाठविले होते. त्याने दोन जेसीबी आणि काही वाहन असल्याचे म्हटले. त्यातही एक जेसीबी बंद असल्याचे सांगितले. मी प्रत्यक्ष जाऊन पाहणी केली. त्याठिकाणी मोठ्या प्रमाणात वाहने दिसली. मात्र वाहनचालक पसार झाले होते.
- संजय जाधव,
प्रभारी तहसीलदार, दारव्हा

दरवर्षी ५०० ब्रासपर्यंत परवानगी जाते. यावर्षी कोरोनामुळे त्यात घट झाली. ४०० ब्रासला परवानगी दिली. नव्याने ९०० ब्रास उत्खननासाठी अर्ज आले आहेत. त्याची परवानगी बाकी आहे. पाटबंधारे विभाग परवानगी देते तोच व्यक्ती माती उचलत आहे किंवा नाही याची जबाबदारी तहसीलची आहे.
- अशोक डगवार, शाखा अभियंता, गोकी प्रकल्प, यवतमाळ

Web Title: On the mud brick kiln in the name of agriculture

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.

टॅग्स :Farmerशेतकरी