शहरं
Join us  
Trending Stories
1
PM मोदींशी १ तास नेमकी काय चर्चा झाली? CM फडणवीसांनी दिली सगळी माहिती; म्हणाले, “कर्जमाफी...”
2
Sonam Wangchuk: थेट सोनम वांगचूक यांना अटक, लडाख हिंसाचार प्रकरणात पोलिसांची मोठी कारवाई
3
बँकिंग क्षेत्राला हादरवणारी बातमी! ३८ भारतीय बँकांचा डेटा लीक; पगार ट्रान्सफर, लोनचे हफ्ते सगळेच...
4
जीएसटी कपातीचा उलटा फेरा! वह्या, पुस्तके महागणार; शिक्षणासोबत काय खेळ केला पहा...
5
सिमेंटची गोणी ४२५ वरून ३७५ रुपयांवर! पण, कंपन्या करू शकतात चलाखी? ग्राहकांना लाभ मिळणार का?
6
"तो काय बोलतो तुम्हाला तरी कळतं का?", भार्गवला हिणावणाऱ्यांना भावाचं सणसणीत उत्तर, म्हणाला...
7
बिहारमध्ये महिला मंडळ खूश...! 'लाडकी बहीण नाही', सुरू करण्यात आली ही खास योजना; खात्यात धडा-धड जमा झाले 10-10 हजार; PM मोदी म्हणाले...
8
कार, आयफोन आणि विदेशवारीचे आमिष देऊन करत होता विद्यार्थिनींची निवड! चैतन्यानंदवर आणखी गंभीर आरोप
9
"दुर्गा मातेला प्रार्थना करतो की, निवडणुकीनंतर असे सरकार बनावे जे..."; बंगालमध्ये नेमकं काय म्हणले अमित शाह?
10
Amazon.in च्या 'ग्रेट सेव्हिंग्ज सेलिब्रेशन' स्टोअरफ्रंटसह GST बचतीचा धमाका
11
तू परत आलास..?? IND vs PAK Final वरून पाकिस्तानची खिल्ली उडवणाऱ्या भन्नाट मीम्सचा पाऊस
12
Vodafone-Idea च्या शेअरमध्ये मोठी घसरण, AGR प्रकरणाची पुढील सुनावणी ६ ऑक्टोबरला
13
“STकडे १३ हजार एकर लँड बँक, NAREDCOने विकासात योगदान द्यावे”; प्रताप सरनाईक यांचे आवाहन
14
पोस्ट ऑफिसची गॅरंटी! फक्त ₹५० लाखांचा विमाच नाही, 'या' स्कीममध्ये मिळतात टॅक्स आणि कर्जाचे फायदे
15
“PM केअर फंडातून राज्याचा शेतकरी कर्जमुक्त करा”: राऊत, ठाकरे गट बळीराजासाठी रस्त्यावर उतरणार
16
'लडाख हिंसाचार' प्रकरणी आता मोदी सरकार 'अ‍ॅक्शन मोड'वर! दिल्लीहून एक दूत पाठवला; उपराज्यपालांनी बैठक बोलावली
17
झोमॅटोद्वारे हॉटेल मालकाने २१,००० रुपयांच्या १०७ ऑर्डर बनवून दिल्या, हातात किती शिल्लक राहिले... तुम्हीच पहा...
18
३० वर्षांनी केंद्र त्रिकोण राजयोग: ८ राशींना वक्री शनि करेल मालामाल, बक्कळ पैसा; चौपट लाभ!
19
'सर्व दोष माझ्यावर टाकण्यात आले, तर...'; सोनम वांगचुक यांनी परदेशी निधीवर स्पष्टच सांगितले
20
Navratri 2025: देवीचे वाहन सिंह आणि लक्ष्मीचे घुबड का? त्यामागे आहे महत्त्वपूर्ण कारण!

महावितरणचा वीज ग्राहकांना एकत्र बिलाचा ‘शॉक’

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 24, 2020 07:00 IST

कोरोनामुळे दोन महिने मोबाईलवरच सरासरी बिल पाठविले गेले. ते काहींना मिळाले तर काहींना मेसेजच आला नाही. आता अचानक मोठ्या रकमेचे बिल आल्याने नागरिकांचा गोंधळ उडाला आहे.

ठळक मुद्देमहावितरणची मासिक ६६८० कोटींच्या महसूल वसुलीसाठी धडपडदेयक सुधारणेसाठी वितरण केंद्रांवर गर्दी

राजेश निस्ताने ।लोकमत न्यूज नेटवर्कयवतमाळ : महाराष्ट्र राज्य वीज महावितरण कंपनीची मासिक सहा हजार ६८० कोटी रुपयांच्या महसुलासाठी धडपड सुरू आहे. जून महिन्यात अचानक एकत्र बिल दिले गेल्याने ग्राहकांना जोरदार शॉक बसला आहे. त्यामुळेच देयक दुरूस्तीसाठी, ग्राहकांनी वितरणच्या केंद्रांवर गर्दी केली.जून महिन्याचे विद्युत देयक हाती पडताच राज्यभरातील वीज ग्राहकांना मोठा धक्का बसला. कारण हे बिल अव्वाच्या सव्वा वाटते आहे. कोरोनामुळे दोन महिने मोबाईलवरच सरासरी बिल पाठविले गेले. ते काहींना मिळाले तर काहींना मेसेजच आला नाही. आता अचानक मोठ्या रकमेचे बिल आल्याने नागरिकांचा गोंधळ उडाला आहे. जाब विचारण्यासाठी गेलेल्या ग्राहकांना वितरणकडून समाधानकार उत्तरही मिळत नाही. देयकाचा हप्ता पाडून देऊ, मात्र एक पैसाही कमी होणार नाही अशी सरसकट भूमिका महावितरणकडून घेतली जात आहे.

वार्षिक ८० हजार कोटींचा महसुलकोरोना व लॉकडाऊनमुळे उद्योग-व्यवसाय ठप्प आहेत. लाखो नोकऱ्या गेल्या आहेत. नागरिकांच्या जीवनमरणाचा प्रश्न निर्माण झाला आहे. महावितरणला मात्र आपल्या मासिक महसूल वसुलीचे वेध लागले आहेत. आयोगाने १ एप्रिल २०२० पासून लागू केलेल्या नव्या वीज दरानुसार महावितरणला वीज बिलातून वार्षिक ८० हजार १६३ कोटी एवढ्या महसुलाची आवश्यकता आहे. एक लाख दहा हजार ६२२ दशलक्ष युनिट विजेच्या विक्रीतून हा महसूल मिळणार आहे. या विजेचा सरासरी दर ७ रुपये २५ पैसे प्रति युनिट असा आहे. त्यातून मासिक सहा हजार ६८० कोटींच्या वीज बील महसुली वसुलीसाठी महावितरणने जादा बिलाची आकारणी केल्याचा संशय ग्राहकांना आहे.

म्हणे, उन्हाळ्यात जादा वीज वापरएकत्र व जादा बिलाचे महावितरणकडून समर्थन केले जात आहे. उन्हाळ्यामुळे एप्रिल, मे महिन्यात विजेचा वापर जास्त असतो, लॉकडाऊनमुळे सर्व लोक घरात होते, सर्व उपकरणे सुरू होती, विजेचा वापर अधिक होता, आयोगाने नवे दर लागू केले, या काळात नियमित रिडींग घेऊन ग्राहकांना देयके मिळाली नाहीत, सरासरी देयके भरली गेली नाहीत, आता काही ग्राहकांना तीन महिन्याचे देयक एकत्र भरावे लागत आहेत. त्यातून वीज बिल जादा आल्याचा संभ्रम निर्माण झाला असल्याचे महावितरण सांगत आहे.ग्राहकांना दिलेली विजेची देयके अचूक आहेत. एकत्र रिडींगमुळे जास्त युनिट वापराच्या स्लॅबनुसार देयक आले असेल तर अशा ग्राहकांना या स्लॅबचा लाभ बिलात दिला जाईल.- अनिल कांबळे, मुख्य जनसंपर्क अधिकारी, महावितरण, मुंबई.

टॅग्स :electricityवीज