शहरं
Join us  
Trending Stories
1
"१८ तासांचा प्रवास कशाला? बोलायचं तर थेट फोन करा"; ट्रम्प यांनी रद्द केला पाकिस्तान दौरा
2
होर्मुझमध्ये संघर्ष पेटणार! इराण म्हणाला, 'नाकेबंदी हटवली नाही, तर आता अमेरिकेला प्रत्युत्तर देणार"
3
अभिषेक-ईशानचा शानदार शो! वैभव सूर्यवंशीचं शतक व्यर्थ! RR च्या घरच्या मैदानात SRH नं मारली बाजी
4
वरातीत नाचला अन् जीव गमावला! पुण्यात चुलत भावानेच केला भावाचा गेम; कात्रजमधील हत्येने खळबळ
5
सिंधुदुर्गातील वाहनाना टोल मधून सुट मिळणार; पालकमंत्र्यांचे आश्वासन 
6
Vaibhav Suryavanshi Records : शतक एक, विक्रम अनेक! वैभव सूर्यवंशी अशी कामगिरी करणारा जगातील पहिला फलंदाज
7
इस्लामाबादमधील चर्चेपूर्वीच खळबळ! इराणचा अमेरिकेला सणसणीत टोला; म्हणाले "अब्रू वाचवण्यासाठी.."
8
'गिव्ह मी वन चान्स' फेम Karun Nair ट्रोल! ५ मिनिटांत श्रेयस अय्यरचे २ कॅच सोडले; चर्चा तर होणारच
9
Travel : जणू स्वर्ग पृथ्वीवरच आहे! 'या' व्हॅलीचे सौंदर्य पाहून मसुरी-नैनिताललाही विसरून जाल!
10
Vaibhav Suryavanshi : उत्तुंग फटकेबाजी! १५ वर्षीय वैभव सूर्यवंशीनं ३६ चेंडूत पेश केला शतकी नजराणा
11
लॅपटॉपचा Type-C पोर्ट आहे 'ऑल-इन-वन' बाहुबली; याचे भन्नाट फीचर्स वाचून तुम्हीही थक्क व्हाल
12
भयंकर! अखिलेश यादवांचा पुतळा जाळताना स्फोट; भाजपा आमदार अनुपमा जयस्वाल भाजल्या
13
Raghav Chadha : "घाबरुन नाही, तर हताश होऊन पक्ष सोडला"; राघव चड्ढांनी सांगितलं दिल्लीतील पराभवाचं कारण
14
DC vs PBKS : पंजाब किंग्स इज चेज मास्टर! दिल्ली कॅपिटल्सविरुद्धच्या विजयासह रचला नवा इतिहास
15
ना भांडण, ना ब्रेकअप! Gen Z च्याही पुढे गेली Gen Alpha; खऱ्या प्रेमापेक्षा 'AI गर्लफ्रेंड'ची क्रेझ
16
“तेलंगणने करून दाखवले, महाराष्ट्रात ST महामंडळाचे विलिनीकरण कधी करणार?”; काँग्रेसचा थेट सवाल
17
"महाराष्ट्राच्या व मराठी माणसाच्या उरावर बसवले जात असतील तर...", अमोल मिटकरींचा धीरेंद्र शास्त्रींवर घणाघात
18
बागेश्वर बाबा अडचणीत! शिवप्रेमींच्या भावना दुखावल्या प्रकरणी छत्रपती संभाजीनगरात तक्रार
19
४,४,४,४,४,४! प्रभसिमरन सिंगची तुफान फटकेबाजी; अजिंक्य रहाणे अन् पृथ्वी शॉच्या विक्रमाशी बरोबरी
20
Nithin Kamath : "माझ्या मुलाचा स्क्रीन टाईम दिवसाला फक्त ३० मिनिटं, तरीही..."; नितीन कामथ यांनी व्यक्त केली चिंता
Daily Top 2Weekly Top 5

भाजपच्या विरोधात दिग्रस, नेरमध्ये बंजारा बांधवांचा मोर्चा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 17, 2021 05:00 IST

मंगळवारी दुपारी १.३० वाजता बंजारा समाजातील महिला-पुरुष वसंतराव नाईक यांच्या पुतळ्याजवळ एकत्र जमल्यानंतर तेथून मोर्चाला प्रारंभ झाला. मानोरा चौक, शिवाजी चौक, जुना पेट्रोल पंप या मार्गाने मोर्चा तहसीलवर पोहोचला. तेथे तहसीलदार राजेश वजिरे यांच्या माध्यमातून मुख्यमंत्र्यांना मागण्यांचे निवेदन पाठविण्यात आले. पूजा चव्हाण मृत्यूप्रकरणात भाजपचे काही नेते चौकशीपूर्वीच संजय राठोड यांना बदनाम करण्याचे कटकारस्थान करत आहे.

ठळक मुद्देपूजा चव्हाण मृत्यूप्रकरणात बदनामी टाळा

 लोकमत न्यूज नेटवर्कदिग्रस/नेर : पूजा चव्हाण संशयास्पद मृत्यूप्रकरणात वनमंत्री संजय राठोड यांची नाहक बदनामी केली जात आहे. बदनामीचा हा प्रकार थांबविण्यात यावा, अशी मागणी करीत मंगळवारी दिग्रस व नेर तहसील कार्यालयावर मोर्चा काढण्यात आला. मंगळवारी दुपारी १.३० वाजता बंजारा समाजातील महिला-पुरुष वसंतराव नाईक यांच्या पुतळ्याजवळ एकत्र जमल्यानंतर तेथून मोर्चाला प्रारंभ झाला. मानोरा चौक, शिवाजी चौक, जुना पेट्रोल पंप या मार्गाने मोर्चा तहसीलवर पोहोचला. तेथे तहसीलदार राजेश वजिरे यांच्या माध्यमातून मुख्यमंत्र्यांना मागण्यांचे निवेदन पाठविण्यात आले. पूजा चव्हाण मृत्यूप्रकरणात भाजपचे काही नेते चौकशीपूर्वीच संजय राठोड यांना बदनाम करण्याचे कटकारस्थान करत आहे. भाजपच्या या षडयंत्राविरोधात व संजय राठोड यांच्या समर्थनार्थ दिग्रस व नेरमध्ये समाज बांधवांच्या वतीने निवेदन देण्यात आले.पूजा चव्हाण या तरुणीच्या मृत्यूबद्दल समाज माध्यमात जी उलटसुलट चर्चा होत आहे, ती अत्यंत निंदनीय आहे. तिच्या कुटुंबीयांनी आजपर्यंत कोणत्याही प्रकारची तक्रार दिलेली नाही. या  प्रकरणातील ऑडिओ क्लिप्सदेखील संशयास्पद आहे. केवळ राजकीय स्वार्थापोटी  या प्रकरणात राठोड यांना बदनाम केले जात असल्याचे निवेदनात नमूद आहे.संजय राठोड यांच्याविरुद्ध भाजपाने सुरू केलेल्या षडयंत्राची शहानिशा झाल्याशिवाय कोणतीही कार्यवाही होऊ नये. भाजपाकडून राजकीय  षडयंत्र रचून विदर्भातील नेतृत्वाला संपविण्याचा प्रयत्न चालविला आहे. याची जातीने चौकशी करावी व संजय राठोडांची बदनामी थांबवावी, अशी मागणी यावेळी करण्यात आली.        निवेदन देताना दिग्रस व नेरमधील विविध क्षेत्रातील बंजारा समाजातील  महिला, पुरूष तसेच विविध बंजारा संघटनांचे पदाधिकारी उपस्थित होते.

टॅग्स :Morchaमोर्चा