शहरं
Join us  
Trending Stories
1
मोठी बातमी! लोकसभेत महिला आरक्षण विधेयक फेटाळले; २११ खासदारांनी विरोधात मतदान केले 
2
"ये गलत आंकडा बता रहे हैं...!", लोकसभेत अखिलेश यादव यांनी अमित शाह यांना टोकलं; नेमकं काय घडलं?
3
इराणची मोठी घोषणा! होर्मुझची सामुद्रधुनी सर्वांसाठी खुली केली, पण...; एवढेच दिवस...
4
काँग्रेस आमदाराला जन्मठेप! भाजप नेत्याच्या हत्येप्रकरणी न्यायालयाचा ऐतिहासिक निकाल
5
इस्रायलचे हल्ले आता जागतिक सुरक्षेसाठी मोठा धोका! तुर्कीच्या परराष्ट्र मंत्र्यांचा इशारा; जगाला केले हे आवाहन...
6
डिग्रीपेक्षा 'स्किल' महत्त्वाची! घरबसल्या कमवा ₹1 लाख; आजच शिका ‘या’ 5 हाय डिमांड स्किल्स
7
Travel : राजवाडा, बोटींग आणि रंगीबेरंगी कारंजे… कोकणचं 'स्वित्झर्लंड' तुम्ही पाहिलंय का?
8
भर दुपारी बँक ऑफ महाराष्ट्रवर सशस्त्र दरोडा; २० मिनिटांत ३५ लाख लुटून नेले, मॅनेजरलाही मारहाण
9
"पंतप्रधान आणि मला तर पत्नीच नाही...!" राहुल गांधी संसदेत नेमकं काय बोलले? पिकला एकच हशा
10
ट्रम्पच्या नाकावर टिच्चून...! तीन महिन्यांपासून कच्च्या तेलासाठी हा देश आसुसलेला, रशियाचा टँकर पोहोचला
11
"उंदीर-झुरळांसोबत राहावं लागलं, गंभीर आजार झाला"; सोनाली राऊतचे 'बिग बॉस मराठी'च्या टीमवर गंभीर आरोप; म्हणाली...
12
"हे लज्जास्पद कृत्य आहे, कारण हे महिलांच्या नावावर केले जात आहे", राहुल गांधींच्या भाषणातील दहा मुद्दे
13
राहुल गांधींच्या अडचणी वाढणार! दुहेरी नागरिकत्व प्रकरणात उच्च न्यायालयाने दिले एफआयआर दाखल करण्याचे आदेश
14
समुद्रातील थरार! अमेरिकेचा वेढा तोडून पाकिस्तानचे जहाज सुसाट; होर्मुजमध्ये नेमकं काय घडलं?
15
लोकसभेत ३ विधेयक पास करण्यासाठी सरकारकडे पुरेसे संख्याबळ नाही?; जाणून घ्या 'नंबर गेम' 
16
निदा खान टीसीएसमध्ये एचआर नाही, तर या पदावर होती...; वकिलांचा दावा, कुटुंब म्हणतेय ती गर्भवती...
17
Latest Marathi News LIVE Updates: देशातील महिला बघताहेत, त्यांच्या रस्त्यातील अडथळा कोण आहेत? अमित शाहांचा घणाघात
18
सावधान! फोनपासून दूर होताच अस्वस्थ होता? स्क्रीन तुम्हाला वेळेआधीच बनवतेय म्हातारं
19
ट्रम्प यांचे लाडके मुनीर तेहरानमध्ये काय करतायत? अमेरिकेसाठी हेरगिरी की नव्या 'सुप्रीम लीडर'शी भेट? चर्चांना उधाण
20
"हे विधेयक देशाचा राजकीय नकाशा बदलण्यासाठी; एससी, एसटी आणि ओबीसी विरोधी", राहुल गांधींचा सरकारवर आरोप
Daily Top 2Weekly Top 5

बीडीओंच्या बनावट स्वाक्षरीवर उचलले पैसे

By admin | Updated: October 5, 2014 23:13 IST

गटविकास अधिकाऱ्याची बनावट स्वाक्षरी करून बँकेतून सव्वादोन लाख रुपये उचलल्याचा प्रताप एका ग्रामसेवकाने केला. निवडणूक काळात सुरू असलेल्या चेकपोस्ट नाक्यावरील तपासणीत हे बिंग फुटले.

सव्वादोन लाख : ग्रामसेवकाचा प्रतापआर्णी : गटविकास अधिकाऱ्याची बनावट स्वाक्षरी करून बँकेतून सव्वादोन लाख रुपये उचलल्याचा प्रताप एका ग्रामसेवकाने केला. निवडणूक काळात सुरू असलेल्या चेकपोस्ट नाक्यावरील तपासणीत हे बिंग फुटले. तोपर्यंत गटविकास अधिकाऱ्यांनाही आपल्या खात्यातून पैसे काढल्याचा थांगपत्ता नव्हता. हा प्रकार आर्णी तालुक्यातील म्हसोला पहूरच्या ग्रामसेवकाने केला असून त्याच्याविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे.निर्मल भारत अभियानांतर्गत तालुक्यातील म्हसोला पहूर नस्करी या गावासाठी मोठ्या प्रमाणात निधी आला आहे. हा निधी काढण्यासाठी गटविकास अधिकाऱ्याची लेखी परवानगी घ्यावी लागते. मात्र तेथील ग्रामसेवक ए.एस. निळे यांनी गटविकास अधिकारी चंद्रकांत बंड यांची बनावट स्वाक्षरी केली आणि बँकेतून दोन लाख ३० हजार रुपये काढले. या प्रकाराची साधी कुणकुणही गटविकास अधिकाऱ्यांना नव्हती. मात्र निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर शहराबाहेर चेकपोस्ट तयार करण्यात आले. त्या ठिकाणी वाहनाची तपासणी करत असताना ग्रामसेवकाच्या कारमध्ये ९२ हजारांची रोकड आढळून आली. चौकशी केली असता त्याने उडवाउडवीची उत्तरे दिली. मात्र नंतर सखोल चौकशीअंती हा प्रकार उघडकीस आला. त्यावरून गटविकास अधिकारी चंद्रकांत बंड यांनी आर्णी पोलीस ठाण्यात तक्रार दिली. त्यावरून ग्रामसेवक निळे यांच्याविरुद्ध विविध कलमान्वये गुन्हा दाखल केला. सदर रक्कम २५ ते ३० सप्टेंबरदरम्यान काढल्याचे या तक्रारीत म्हटले आहे. (शहर प्रतिनिधी)