शहरं
Join us  
Trending Stories
1
चर्चा की ढोंग? इराणच्या कार्गो शिपवर अमेरिकेचा ताबा; डोनाल्ड ट्रम्प यांची थेट युद्धभूमीवर नजर!
2
Video: "गेट आउट"! भाजपाच्या मोर्च्यासाठी वाहतूक रोखली; महिला भडकली, थेट गिरीश महाजनांवर ओरडली...
3
पेट्रोलची कटकट मिटणार? आता गाड्या अल्कोहोलवर धावणार! इंधन टंचाईवर असा आहे सरकारचा 'E85' मास्टर प्लॅन
4
२०० पारच्या लढाईत KL Rahul पुन्हा अपयशी! अभिषेक शर्मानं फिल्डिंगमध्येही दाखवला क्लास
5
इस्लामाबाद चर्चा २.० पूर्वी डोनाल्ड ट्रम्प यांच्याकडून इराणच्या जनतेचं कौतुक, पण...! युएस-इराण युद्ध पुन्हा भडकणार?
6
अभिषेक शर्मा ठरला जगात भारी! टी-२० क्रिकेटमध्ये अशी कामगिरी करणारा तो पहिलाच
7
केरळमध्ये फटाका कारखान्यात मोठा स्फोट; १३ जणांचा मृत्यू, अनेक गंभीर जखमी
8
Abhishek Sharma Century : अभिषेक शर्माचा शतकी धमाका! किंग कोहलीसह 'या' दिग्गजांच्या विक्रमाची बरोबरी
9
वसई तहसीलला पुन्हा लाचेचे 'ग्रहण'; ७ लाखांची लाच स्वीकारताना खासगी इसम ताब्यात
10
‘अजितदादांच्या अपघाताबाबत इतरांप्रमाणे माझ्याही मनात शंका’, प्रचाराच्या सांगतेवेळी सुनेत्रा पवार यांचं मोठं विधान
11
कौटुंबिक वादातून दुहेरी हत्याकांड : कर्जाचे २० हजार आणि अपत्य नसण्याचा टोमणा; सख्ख्या भावाने संपवले आयुष्य
12
उपजिल्हाधिकारी पदाच्या नाेकरीचे आमिष दाखवून दोन कोटींचा गंडा; पोलिसांनी केली अटक
13
'लादेनला जी म्हणतात आणि मोदींना दहशतवादी संबोधतात', खर्गेंच्या वक्तव्याविरोत भाजपा आक्रमक
14
SRH vs DC : नागपूरकरामुळे ईशान किशन गोंधळला! अक्षर पटेलनंही व्यक्त केली मनातील खंत; नेमकं काय घडलं?
15
केडीएमसीच्या महासभेकडे शिंदे सेनेच्या बहुतांश नगरेसवकांची पाठ; महत्वाच्या विषयावरील चर्चे दरम्यान अनुपस्थिती
16
LIC मध्ये नोकरीची सुवर्णसंधी! ज्युनिअर असिस्टंट पदांसाठी भरती जाहीर; पदवीधरांना मिळणार वार्षिक ५ लाखांपर्यंत पॅकेज
17
मोठा घोटाळा! वैष्णो देवीच्या कोट्यवधी भक्तांची घोर फसवणूक, ₹५५० कोटींच्या चांदीची किंमत केवळ ३० कोटी; समोर आला विचित्र प्रकार
18
शरद पवार पुन्हा रुग्णालयात दाखल; बारामती पोटनिवडणूक दरम्यान पोस्ट लिहून केलं आवाहन
19
केजीएमयूमध्ये खळबळ: १२वी पास तरूण बनला 'डॉक्टर'; बनावट लेटरहेडचा वापर करून रचला मोठा डाव!
20
"राजकारणात काम करणाऱ्या महिला, नेत्यांसोबत बेड…"; पप्पू यादव यांच्या विधानावर नोटिस जारी, खासदारकी धोक्यात? 
Daily Top 2Weekly Top 5

मनसेचे संस्थापक ‘राज’ ३0 सप्टेंबरला वणीत

By admin | Updated: September 27, 2014 23:23 IST

महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे संस्थापक राज ठाकरे येत्या ३० सप्टेंबरला वणीत दाखल होत आहे. मनसेचे वणी विधानसभा क्षेत्राचे उमेदवार राजू उंबरकर यांच्या प्रचाराचा नारळ ते वणीत फोडणार आहे.

वणी : महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे संस्थापक राज ठाकरे येत्या ३० सप्टेंबरला वणीत दाखल होत आहे. मनसेचे वणी विधानसभा क्षेत्राचे उमेदवार राजू उंबरकर यांच्या प्रचाराचा नारळ ते वणीत फोडणार आहे.मनसेचे उमेदवार राजू उंबरकर यांनी शुक्रवारीच आपला उमेदवारी अर्ज निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांकडे दाखल केला आहे. शुक्रवारी लक्षवेधक मिरवणुकीने त्यांनी उमेदवारी दाखल केली. ही मिरवणूक शहरातील विविध मार्गाने फिरून निवडणूक निर्णय अधिकारी कार्यालयासमोर पोहोचली होती. आता येत्या ३० सप्टेंबरला उंबरकर यांच्या प्रचारार्थ खुद्द पक्षाचे संस्थापक राज ठाकरे वणीत येत आहे. त्यांचे ३0 सप्टेंबरला सकाळी १0.३0 वाजताच्या सुमारास वणीत आगमन होणार आहे. त्यानंतर ते जाहीर सभेला संबोधित करणार आहे. या जाहीर सभेचे स्थळ अद्याप निश्चित झाले नाही. यापूर्वी एकदा राज ठाकरे यांनी वणीला भेट दिली होती. त्यावेळी त्यांनी येथील विश्रामभवनात पक्षाचे वणी विधानसभा क्षेत्रातील पदाधिकारी, कार्यकर्ते यांच्याशी संवाद साधला होता. त्यावेळी त्यांची एक झलक बघण्यासाठी प्रचंड जनसमुदाय गोळा झाला होता. येथील टिळक चौकात काही काळ थांबून त्यांनी जनतेला अभिवादन केले होते. त्याचवेळी त्यांनी वणीत विधानसभा निवडणुकीच्या वेळी येण्याची ग्वाही दिली होती. त्यानंतर आता पुन्हा ते एकदा वणीत येणार असल्याचे मनसेकडून सांगण्यात आले. त्यांच्या या भेटीची वणीकरांना प्रचंड उत्सुकता लागली आहे. (कार्यालय प्रतिनिधी)राज सभेने उठणार वादळविधानसभा निवडणुकीसाठी विदर्भात बहुदा पहिल्यांदाच राज ठाकरे वणीत दाखल होणार आहे. निवडणूक काळातील विदर्भातील ही त्यांची बहुदा पहिलीच सभा असणार आहे. विदर्भातील मनसे उमेदवारांच्या प्रचाराचा ते वणीतून शुभारंभ करण्याची शक्यता आहे. त्यामुळे या सभेला विशेष महत्व लाभण्याची शक्यता आहे. त्यासाठीच ही सभा यशस्वी करण्याकरिता मनसेचे पदाधिकारी कामी लागले आहेत. या सभेत ते ‘हो हे शक्य आहे’, या आपल्या विकासाच्या ‘ब्ल्यू प्रिंट’बद्दल काय बोलणार, याबद्दल उत्सुकता लागून आहे. राज्याच्या सर्वांगीण विकासाबाबत ते मतप्रदर्शन करण्याची शक्यता आहे. त्यामुळे या ‘राज’ सभेने वणी विधानसभा क्षेत्रातील राजकीय वातावरण ढवळून निघून परिवर्तनाचे मोठे ‘वादळ’ उठण्याची शक्यता वर्तविली जात आहे.