शहरं
Join us  
Trending Stories
1
युद्धाची तयारी की ढासळणारी अर्थव्यवस्था? रशियानं २२ टन सोने विकले; जागतिक बाजारपेठेत खळबळ
2
Top Marathi News LIVE Updates: विधानपरिषदेसाठी भाजपाने नावं पाठवली, मविआकडून उद्धव ठाकरेंचं नाव आघाडीवर
3
'रशियासोबत अमेरिकेनं जे केलं ते आपल्यासोबत..,' म्हणून अनेक देश वाढवताहेत आपला सुवर्ण साठा; प्रकरण काय?
4
९ तासांत २ बलात्कार अन् १ हत्या, आधी मित्राच्या बायकोवर बळजबरी मग...; आरोपी राहुलचं सत्य उघड
5
केंद्रीय मंत्री पीयूष गोयल यांच्या हस्ते ‘भारत टॅक्सी’ ॲपचा शुभारंभ
6
Mumbai: धारावीच्या ‘नॉन स्लम’ बिल्डिंगमधील रहिवाशांना ५०० चौरस फुटांचे घर
7
Menstrual Health: अंगावर पांढरे पाणी जाते, सतत ओल आणि खाज? ५ घरगुती उपाय, त्रास अंगावर काढू नका...
8
IPL 2026: संजू सॅमसनच्या शतकाचे शशी थरूर यांच्याकडून इंग्रजी कवितेतून कौतुक, वाचा मराठी अर्थ
9
इराणने ट्रम्प यांना दाखवला भारताचा स्वर्ग! हिंदीत झापले, म्हणाले, 'बकवास बंद करें, इंडिया आकर देखें'"
10
"तुझा बॉयफ्रेंड आहे का? इतकी नटून-थटून येतेस"; TCS मधील महिलेला आला भयंकर अनुभव
11
'एकरकमी पैसे घ्या आणि नोकरी सोडा' Microsoft नं हजारो कर्मचाऱ्यांना का म्हटलं असं?
12
मराठीच्या अनिवार्यतेसाठी सरकारचं निर्णायक पाऊल; वाहनचालकांसाठीच्या ‘या’ नियमांत करणार मोठे बदल 
13
मुंबईसह राज्यात फक्त आठ महिन्यांत २० हजार एक्स्टसी गोळ्यांची विक्री
14
मराठी सक्तीवरून शिंदेसेनेत २ गट, संजय निरुपमांचा थेट विरोध; "७० टक्के रिक्षाचालक परप्रांतीय..."
15
मंत्र्यांच्या पगारात कपात, कर्मचाऱ्यांची चांदी! प्रलंबित पेन्शनसाठी 'या' सरकारचा ऐतिहासिक निर्णय
16
काळाचा क्रूर घाला! लग्नाचा वाढदिवस साजरा केला अन् दोनच दिवसांत सुखी संसाराचा डाव उधळला
17
८ महिने ८ दिशांनी चौफेर चौपट लाभ, लक्षणीय नफा; अनपेक्षित पैसा, १० राशींबाबत मोठी भविष्यवाणी!
18
गुरु शुक्र युती २०२६: १२ वर्षांनी जुळून येतोय 'गजलक्ष्मी राजयोग'! गुरू शुक्र युती 'या' राशींसाठी सुवर्णकाळ!
19
मार्कशीट गहाण ठेवून ऑनलाईन गेममध्ये जिंकला ५ लाख; राहुल मीणाबाबत खळबळजनक खुलासा
20
महाराष्ट्रात ‘मराठी’ अनिवार्य हे कायमच लक्षात असू द्या; अमित ठाकरेंचा मध्य रेल्वे प्रशासनाला इशारा
Daily Top 2Weekly Top 5

मनसेच्या प्रचारात महिलांची मुसंडी

By admin | Updated: September 21, 2014 00:04 IST

महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या विधानसभा उमेदवाराच्या समर्थनार्थ आता महिलांनी चांगलीच मुसंडी मारली आहे. मनसेच्या लोकप्रतिनिधी, महिला पदाधिकाऱ्यांनी शहरात शनिवारपासून घरोघरी पोहोचून

वणी : महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या विधानसभा उमेदवाराच्या समर्थनार्थ आता महिलांनी चांगलीच मुसंडी मारली आहे. मनसेच्या लोकप्रतिनिधी, महिला पदाधिकाऱ्यांनी शहरात शनिवारपासून घरोघरी पोहोचून मतदारांशी संपर्क सुरू केला आहे. विधानसभा निवडणुकीची घोषणा होताच सर्वच पक्ष उमेदवाराच्या शोधात आहेत. महायुती आणि आघाडीचे अद्याप जागा वाटप झाले नाही. मात्र मनसेने निवडणूक घोषित होताच थेट प्रचाराचे रणशिंग फुंकले आहे. नुकतीच बाजोरिया लॉनमध्ये मनसेने निवडक पदाधिकारी, कार्यकर्त्यांची बैठक घेतली. या बैठकीपासून मनसेचे पदाधिकारी, कार्यकर्ते चांगलेच ‘चार्ज’ झाले आहे. गावागावांत बैठकांचे सत्र सुरू झाले आहे. त्यातच शनिवारपासून मनसेच्या महिला लोकप्रतिनिधी, पदाधिकाऱ्यांनी प्रचारात मुसंडी मारली आहे.मनसेच्या नगराध्यक्ष प्रिया लभाने, नगरसेविका गीता सूर, इंदिरा पारखी आदींसह राजू उंबरकर यांच्या पत्नीने पक्षाच्या प्रचारार्थ आजपासून शहरात सुरूवात केली. त्यांच्यासोबत मनसेचे शहराध्यक्ष कोनप्रतिवार आणि इतर पदाधिकारी वणी शहरातील घरोघरी पोहोचत आहेत. पक्षाचे ध्येयधोरण, समस्या, विकासाचा मापदंड, जनतेच्या अपेक्षा, मूलभूत समस्यांवर उपाय आदींबाबत ही महिला मंडळी मतदारांना बोलके करीत आहेत. त्यांच्या समस्या जाणून घेत आहे. महिलांचा हा जत्था आज वणीत अनेक घरी पोहोचला. त्यामुळे विधानसभा निवडणूक मनसेने चांगलीच मनावर घेतल्याचे स्पष्ट होत आहे. मनसेच्या लोकप्रतिनिधी आणि पक्ष पदाधिकाऱ्यांनी निवडणुकीचा जागर सुरू केल्याने मतदारही त्यांच्याकडे उत्सुकतेने बघत आहे. महिला प्रचारार्थ फिरत असल्याने एक वेगळेच वलय निर्माण झाले आहे. मनसेचे नगरपरिषद, जिल्हा परिषद आणि पंचायत समितीमधील लोकप्रतिनिधी प्रचारात सहभागी झाले आहे. खुद्द उंबरकर आता ग्रामीण भागात नव्याने भेटीगाठी घेऊन जनतेच्या समस्या ऐकून घेत आहे. त्या सोडविण्यासाठी प्रयत्नांची पराकाष्ठा करण्याची ग्वाही देत आहे. (कार्यालय प्रतिनिधी)