शहरं
Join us  
Trending Stories
1
मोठी बातमी: दहशतवादी हल्ल्यात भारताचा १ जवान शहीद, एकाची प्रकृती गंभीर, तर तिघं..
2
नरेंद्र मोदी हे आठवडामंत्री झाले आहेत, कारण...; शरद पवारांचा घणाघात
3
रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूने सहज जिंकला सामना, गुजरात टायटन्सला नमवून Mumbai Indians ला दिला धक्का 
4
२५ धावांत ६ विकेट्स ! RCB ने पायावर धोंडा मारला, जॉश लिटल GT चा नायक ठरला 
5
विराट कोहलीचा भीमपराक्रम! उत्तुंग षटकार पाहताच भारी होती अनुष्का शर्माची रिॲक्शन, Video
6
मोठी बातमी: लैंगिक शोषण आणि अपहरण प्रकरणात एचडी रेवन्ना यांना SITकडून अटक
7
विझण्यापूर्वी RCB ची फडफड! गुजरात टायटन्सविरुद्ध दाखवली 'पॉवर'; यंदाच्या पर्वात रचला इतिहास
8
अरे तुला फरक पडत नाही, मग कशाला उत्तर देतोस? सुनील गावस्कर संतापले, विराट कोहलीला सुनावले
9
PHOTOS : क्रिकेट म्हणजे जीवन आणि क्रिकेट हेच जीवन; IPL मध्ये जान्हवी कपूरचा जलवा!
10
'घेऊद्या तारीख, ईडीच्या प्रकरणात कुठे जामीन मिळतो'; न्यायाधिशांचे कोर्टरुमबाहेर धक्कादायक वक्तव्य
11
"अरविंद केजरीवालांनी वाराणसीतून नरेंद्र मोदींच्या विरोधात निवडणूक लढवावी"; सपा नेत्याची मागणी
12
मला धमक्या देऊ नका, मी मनात आणलं तर..., नारायण राणे यांचा उद्धव ठाकरेंना इशारा
13
पाकिस्तानच्या माजी मंत्र्यांकडून दुसऱ्यांदा राहुल गांधींचं कौतुक; भाजपानं घेरलं
14
IPL 2024 मधील दोन भारतीय स्टार गोलंदाज स्पर्धेत आता पुढे कदाचित नाही खेळू शकणार 
15
NSE Share : एकावर ४ बोनस शेअर्स, ९०००% डिविडंड; 'या' एक्सचेंजनं गुंतवणूकदारांना दिलं डबल गिफ्ट
16
"हार्दिक पांड्याबद्दल आदर दिसत नाही", इरफान पठाणकडून MI च्या कॅप्टनची बिनपाण्याने धुलाई
17
T20 World Cup : यजमान विडिंजने उतरवला तगडा संघ; IPL गाजवणाऱ्यांना संधी, नवे चेहरेही मैदानात!
18
रोहित शर्माबद्दल 'ती' अफवा पसरवली; आकाश चोप्रा भडकला, दिली संतप्त प्रतिक्रिया
19
कांदा निर्यातबंदी उठवण्याच्या निर्णयावर काँग्रेसची टीका, बाळासाहेब थोरात म्हणाले...
20
Kotak Mahindra Bank Q4: नफा वाढून ४१३३ कोटींवर, व्याजातून होणारी कमाई १३.३% वाढली

बेपत्ता मुलीचा मैत्रिणीच्या पित्यानेच केला घात

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 21, 2020 6:00 AM

पोफाळी पोलीस ठाण्यातील मुळावा येथील विद्यार्थिनी १२ मार्चपासून बेपत्ता होती. या मुलीला कुठल्याही परिस्थितीत जीवंत, सुरक्षित परत आणावे यासाठी पोलिसांनी सर्वतोपरी प्रयत्न सुरू केले. मात्र त्यांच्या प्रयत्नांना यश आले नाही. आठ वर्षाच्या विद्यार्थिनीच्या तिच्या मैत्रिणीच्या वडिलानेच घात केला. पाथरवाडी जंगलात गाडल्याची कबुली आरोपीने दिली.

ठळक मुद्देहातणीच्या विद्यार्थिनीचा मृतदेहच सापडला : पोलिसांचे शर्थीचे प्रयत्न ठरले निष्फळ

लोकमत न्यूज नेटवर्कयवतमाळ : पोफाळी पोलीस ठाण्यातील मुळावा येथील विद्यार्थिनी १२ मार्चपासून बेपत्ता होती. या मुलीला कुठल्याही परिस्थितीत जीवंत, सुरक्षित परत आणावे यासाठी पोलिसांनी सर्वतोपरी प्रयत्न सुरू केले. मात्र त्यांच्या प्रयत्नांना यश आले नाही. आठ वर्षाच्या विद्यार्थिनीच्या तिच्या मैत्रिणीच्या वडिलानेच घात केला. पाथरवाडी जंगलात गाडल्याची कबुली आरोपीने दिली. अखेर पोलिसांना विद्यार्थिनीचा कुजलेला मृतदेह शुक्रवारी हाती लागला.गजानन विठ्ठल भुरके (४०) रा. शांतीनगर मुळावा असे आरोपीचे नाव आहे. हातणी येथील आठ वर्षीय विद्यार्थिनी मुळावा येथील शाळेत शिकण्यासाठी येत होती. गुरुवार १२ मार्चला ही विद्यार्थिनी अचानक शाळेतून बेपत्ता झाली. तिची सायकल शाळेतच होती. तिच्या वडिलाने दिलेल्या तक्रारीवरून अपहरणाचा गुन्हाही पोफाळी पोलिसांनी दाखल केला. तक्रार मिळताच जिल्हा पोलीस अधीक्षकांनी सर्वच तपास पथकांना मुलीचा शोध घेण्याच्या कामात गुंतविले. या तपास पथकांनीही रात्रीचा दिवस करून विद्यार्थिनीचा शोध सुरू केला. मात्र मुलीला जीवंत व सुरक्षित आणण्यात पोलिसांना यश मिळाले नाही.पाथरवाडी जंगलात असा घडला थरारक घटनाक्रमगुरुवारी १२ मार्चला सकाळी १०.३० वाजताच्या सुमारास त्या विद्यार्थिनीला ओळखीतीलच एका व्यक्तीने दुचाकीवर बसवून नेले. पोलिसांना इतकी माहिती मिळाल्यानंतर त्यांनी त्या दिशेने तपास ुसुरू केला. सीसीटीव्ही फुटेज मिळताच आरोपी हा गजानन भुरके असल्याचे स्पष्ट झाले. त्यानंतर पोलिसांनी तांत्रिक दिशेने तपास सुरू केला. गजाननचे लोकेशन मिळताच त्याला रोहडा शेतशिवारातून अटक केली. पोलिसांनी कसून चौकशी केल्यानंतर आरोपी गजाननने गुन्ह्याची कबुली देत घटनाक्रमच सांगितला. मुलीवर दृष्कृत्य करण्याच्या उद्देशाने तिला पळवून नेले. पाथरवाडी जंगल परिसरात तिच्यासोबत दृष्कृत्य केले. पीडित मुलीने ही बाब घरी सांगू नये म्हणून तिचा गळा आवळून ठार मारले. नंतर तिचा मृतदेह जंगलात गाडल्याचे सांगितले. पोलिसांनी ते घटनास्थळ गाठून मृतदेह बाहेर काढला. या तपासात मुळावा येथील ग्रामस्थ व युवकांनी पोलिसांना मोलाचे सहकार्य केले.यवतमाळ मेडिकलच्या न्यायवैद्यकशास्त्र विभागातील डॉक्टरांची चमू घटनास्थळी पोहोचली. जागेवरच तिचे शवविच्छेदन करण्यात आले.या गुन्ह्याचा तपास पोलीस अधीक्षक एम. राज कुमार, अपर अधीक्षक नुरुल हसन, स्थानिक गुन्हे शाखा प्रमुख प्रदीप शिरस्कर यांच्या मार्गदर्शनात पोफाळी ठाणेदार कैलास भगत, पोलीस उपनिरीक्षक नीलेश शेळके, पोलीस उपनिरीक्षक श्रीकांत जिंदमवार, सचिन पवार, गोपाल वास्टर, मुन्ना आडे, गजानन डोंगरे, पंकज पातुरकर, उल्हास कुरकुटे, विशाल भगत, किशोर झेंडेकर, मो. जुनेद मो. ताज, सुरेंद्र वाकोडे, पंकज बेले, सय्यद साजीद, अजय डोळे, रुपेश पाली, योगेश डगवार, सायबर सेलचे प्रमुख अमोल पुरी, दिगांबर पिलावन, अजय निंबोळकर, रोशनी जोळगेकर, प्रगती कांबळे, रेवण जागृत, विठ्ठल मोकाडे, विशाल भगत, जय जाधव, रावसाहेब शेंडे, सुनील जाधव, प्रकाश बोंबले, श्याम लांडगे, मोहन काटे यांनी केला.फाशीच्या मागणीसाठी महिलांचा ठिय्याविद्यार्थिनीवर अत्याचार करून खून केल्याचे वृत्त परिसरात पसरताच जिजाऊ ब्रिगेडच्या महिलांनी शिळोणा घाटातच ठिय्या दिला. आरोपीला फाशीची शिक्षा देण्यात यावी, अशी मागणी महिलांनी केली.

टॅग्स :MurderखूनRapeबलात्कार