शहरं
Join us  
Trending Stories
1
तामिळनाडूचा तिढा सुटला; 'टीव्हीके'ने जुळवले बहुमताचे समीकरण, विजय होणार नवे मुख्यमंत्री 
2
हरयाणा ते बंगाल : मोदींच्या नेतृत्वात ९ राज्यांत भाजपाचे मुख्यमंत्री; अस्तित्व नसलेल्या राज्यांत रोवले भक्कम पाय
3
रशिया-युक्रेनमध्ये ३ दिवसांचा युद्धविराम; ट्रम्प यांच्या मध्यस्थीला यश, १ हजार कैद्यांची अदलाबदल
4
पश्चिम बंगालमध्ये भाजप सरकार स्थापन, पंतप्रधानांसह एनडीएच्या २० मुख्यमंत्र्यांची उपस्थिती
5
हंटाव्हायरस : जहाज स्पेनला आज पोहोचेल; १४०हून अधिक प्रवासी आणि कर्मचारी
6
दिल्लीला हाय अलर्ट! आत्मघाती दहशतवादी हल्ल्याची शक्यता; BJP मुख्यालय, सरकारी कार्यालये रडारवर
7
लखनौमध्ये भाजप नेत्यावर गोळीबार, प्रकृती चिंताजनक; ट्रामा सेंटरबाहेर कार्यकर्त्यांची गर्दी
8
डोकं वापरा...! नेहराचा मास्टरस्ट्रोक अन् DSP सिराजनं वैभव सूर्यवंशीसमोर दाखवलं मॅजिक (VIDEO)
9
मोठी बातमी! खासदार सुप्रिया सुळे यांच्या कारला अपघात, मुंबई-पुणे एक्स्प्रेस वेवरील घटना
10
पश्चिम बंगालमध्ये ममता बॅनर्जी यांच्या TMC नं केली विरोधी पक्षनेत्याची घोषणा, कुणाला मिळाली जबाबदारी?
11
'करामती' खानच्या फिरकीची जादू; यशस्वीच्या नेतृत्वाखाली RR अपयशी, विक्रमी विजयासह GT नं मारली मुसंडी
12
उन्हाळ्यात कलिंगड खाणं पडलं महागात! बक्सरमध्ये एकाच कुटुंबातील ८ जणांना विषबाधा; आरोग्य विभाग अलर्टव
13
मुंबई-बंगळूरू ट्रेनचे फायनल टाइमटेबल आले, १३ मे रोजी सुरू; पुणे-मिरज मार्ग, स्लीपर वंदे भारत?
14
अखेर पेच सुटला! 'टीव्हीके' प्रमुख जोसेफ विजय उद्या मुख्यमंत्रीपदाची शपथ घेणार; असा गाठला बहुमताचा आकडा
15
Vaibhav Suryavanshi World Record: वैभव सूर्यवंशी जगात भारी! षटकारांच्या शतकासह १५ व्या वर्षी भीम पराक्रम
16
शपथविधी सुवेंदू अधिकारींचा, पण PM मोदी-DCM शिंदे भेटीची चर्चा; काय बोलले? सगळा तपशील समोर
17
सुवेंदू अधिकारी ते हिमंता बिस्व सरमा, भाजपने दुसऱ्या पक्षातून आलेल्या कोण कोणत्या नेत्यांना बनवलं थेट मुख्यमंत्री? बघा संपूर्ण यादी
18
खामेनेईंबद्दल अमेरिकन गुप्तचर यंत्रणेचा मोठा रिपोर्ट; ट्रम्प यांचे टेन्शन वाढले, सगळे दावे फोल!
19
अतरंगी फटका मारण्याच्या नादात शतक हुकलं; पण गिलनं सलग सातव्यांदा हा पराक्रम करून दाखवत रचला इतिहास
20
“पुढील २० वर्षे भाजपा पंजाबमध्ये पाय रोवू शकणार नाही”; अरविंद केजरीवाल यांची PM मोदींवर टीका
Daily Top 2Weekly Top 5

गाळ्यांचा होणार लिलाव

By admin | Updated: November 30, 2014 23:15 IST

वणी शहराचे हृदय म्हणून ओळखल्या जाणाऱ्या गांधी चौक व भाजी मंडीतील १६० गाळे नगरपरिषदेने गाळेधारकांकडून खाली करून घ्यावे व नगररचना विभागाकडून आवश्यक मूल्यांकन काढून संपूर्ण

वणी : वणी शहराचे हृदय म्हणून ओळखल्या जाणाऱ्या गांधी चौक व भाजी मंडीतील १६० गाळे नगरपरिषदेने गाळेधारकांकडून खाली करून घ्यावे व नगररचना विभागाकडून आवश्यक मूल्यांकन काढून संपूर्ण गाळ्यांचा जाहीर लिलाव करावा, असा आदेश जिल्हाधिकाऱ्यांनी नुकताच काढला. या आदेशामुळे नगरपरिषदेला कोट्यवधी रूपये प्राप्त होणार आहे. मात्र या प्रस्थापित गाळेधारकांमध्ये प्रचंड खळबळ उडाली आहे.
वणी नगरपरिषदेला ५७ वर्षांपूर्वी तत्कालीन मध्यप्रदेश शासनाने बाजार चौकासाठी येथील शिट क्र. १९ अ व १९ ब मधील २५, ५०० चौरस फूट जागा व भाजी मंडीसाठी शिट क्र. १९ सी मधील प्लॉट क्र. ८९/३ ही जागा वार्षीक मूल्यांकन लावून दिली होती. त्यावर नगरपरिषदेने त्यावेळी दुकान गाळे बांधून त्याचा मर्यादित काळासाठी लिलाव केला होता. त्यावेळी गाळ्यांचे ठरविलेले भाडे अत्यल्प होते. तेव्हापासून नगरपरिषदेने आकारलेले भाडेच गाळेधारक देत आहे. त्यामुळे गाळ्यांवर खर्च अधिक व उत्पन्न कमी, अशी स्थिती झाल्याने नगरपरिषदेला प्रचंड तोटा सहन करावा लागत आहे.
सध्या यापैकी बहुसंख्य गाळ्यांचे मूळ मालक आता हयात नाहीत. अनेकांनी गाळे परस्पर विकून टाकले. अनेकांनी जुन्या गाळ्यांची तोडफोड करून नवीन गाळे बांधले. काहींनी दुमजली गाळे बनविले. मात्र नगरपरिषद कुणावरही कारवाई करण्यास धजावत नव्हती. सध्या या जागेची किंमत १० हजार रूपये चौरस फूट आहे. अनेक व्यापाऱ्यांनी गाळ्यासमोरील जागा भाड्याने देऊन कमाई सुरू केली आहे. भाजी मंडीतील व्यापाऱ्यांनी तर २००१ पासून गाळ्यांचे भाडेच दिलेले नाही. यामुळे नगरपरिषदेचे प्रचंड नुकसान होत आहे.
नगरपरिषदेचे नुकसान लक्षात घेता स्विकृत नगरसेवक पी.के.टोंगे यांनी सदर गाळे नगरपरिषदेने पुन्हा लिलाव करावे, अशी मागणी केली होती. त्याबाबतचा ठरावही १७ सप्टेंबर २०१३ च्या विशेष सर्वसाधारण सभेत पारित करण्यात आला. परंतु मुख्याधिकाऱ्यांनी त्यावर कोणतीही कारवाई केली नाही. त्यामुळे टोंगे यांनी मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठात याचिका (क्र.१६१४/२०१४) दाखल केली. उच्च न्यायालयाने त्यावर १६ मार्च २०१४ ला आदेश करून अर्जदारास १५ दिवसांच्या आत जिल्हाधिकाऱ्यांकडे अपिल करावे व जिल्हाधिकाऱ्यांनी यांनी सहा आठवड्यात सदर निवेदनावर निर्णय घ्यावा, असे निर्देश दिले होते.
त्यानुसार टोंगे यांनी जिल्हाधिकाऱ्यांकडे अपिल दाखल केले. अर्जदाराच्या निवेदनावर जिल्हाधिकाऱ्यांनी मुख्याधिकाऱ्यांकडून अहवाल मागितला. मुख्याधिकाऱ्यांनी त्यावर वास्तविक अहवाल सादर केला. सदर १६० गाळ्यांचे नगर रचना विभागाकडून आवश्यक मूल्यांकन काढून गाळ्यांचा पुन्हा लिलाव केल्यास नगरपरिषदेचे उत्पन्न वाढेल, असे मत मुख्याधिकरयांनी अहवालात व्यक्त केले. त्यावर गाळेधारकांकडून मालकी हक्कामध्ये परस्पर बदल करणे, नगरपरिषदेची परवानगी न घेता बांधकाम करणे, वाढीव भाडे न भरणे, या सर्व बाबी गैरकारदेशीर असल्याचे जिल्हाधिकाऱ्यांनी स्पष्ट केले. शेवटी उच्च न्यायालयाच्या आदेशातील निर्देशानुसार जिल्हाधिकाऱ्यांनी आदेश पारीत केले. आता नगरपरिषद या आदेशाची अंमलबजावणी कशी व कदी करणार याकडे वणीकरांचे लक्ष लागले आहे. (स्थानिक प्रतिनिधी)