शहरं
Join us  
Trending Stories
1
“छत्रपती शिवाजी महाराज कधी थकले नाहीत, झुकले नाहीत”; राऊतांचा धीरेंद्र शास्त्रींवर पलटवार
2
US Israel Iran War : अरबी समुद्रात अमेरिकेचा थरार! इराणचे तेल घेऊन जाणारे जहाज रोखले; आतापर्यंत ३७ जहाजे परत पाठवली
3
तमिळ अभिनेत्री अक्षया हरिहरनच्या नावे बोगस मतदान! पोलिंग बूथवर उडाली खळबळ; कोर्टात जाणार...
4
आपली बस, आपली सेवा…! ST प्रवाशांसाठी मोठे पाऊल; १ मे पासून ‘लालपरी’चे नवे अभियान होणार सुरू
5
दिल्ली विमानतळावर अपघात! २३२ प्रवाशांना घेऊन जाणाऱ्या स्विस एअरच्या विमानाच्या इंजिनला आग; ६ जण जखमी, धावपट्टी बंद
6
“लोकशाहीत हिंसाचाराला थारा नाही”; वॉशिंग्टन हॉटेल गोळीबार प्रकरणी PM मोदींची प्रतिक्रिया
7
“ST ग्रामीण भागाची जीवनवाहिनी, विलिनीकरणाबाबात महायुती सरकार गप्प का?”: विजय वडेट्टीवार
8
वॉशिंग्टन हॉटेल गोळीबार प्रकरण, ट्रम्प यांची मोठी प्रतिक्रिया; इराण युद्धाशी संबंध जोडत म्हणाले…
9
IPL मध्ये अडखणाऱ्या मुंबई इंडियन्ससाठी गुडन्यूज, ‘या’ सामन्यातून रोहित शर्मा करणार कमबॅक
10
त्याच हॉटेलमध्ये राष्ट्राध्यक्षांवर ४५ वर्षांपूर्वी झालेला गोळीबार; डोनाल्ड ट्रम्प थोडक्यात बचावले, पण...
11
पाकिस्तानने इव्हेंट बनवून ठेवला...! अमेरिका चर्चेसाठी जाणार नाही, दौरा रद्द; इराणचे परराष्ट्रमंत्री कधीचेच निघाले...
12
संरक्षण क्षेत्रात भारताची आघाडी! रशियाच्या जुन्या भागीदाराला मिळाली साथ; पुतिनही हैराण
13
अशोक खरातचे आणखी 'काळे कारनामे' उघड! ऑफिसबॉयनंतर कुकनेही उडवली झोप; फार्महाऊसमधील कृत्य एसआयटीच्या हाती
14
कोणत्याही क्षणी काश पटेल यांचे FBI संचालक पद जाणार? ट्रम्प प्रशासनामध्ये खळबळ, गच्छंतीची शक्यता
15
गोजुबावीत अजितदादांच्या प्रतिमेसमोर अघोरी पूजा, 'टाचण्या टोचलेले लिंबू'; अमोल मिटकरींच्या ट्विटने मोठी खळबळ
16
Credit Card : क्रेडिट कार्ड वापरताय? गरजेपेक्षा जास्त खर्च करणं पडेल महागात; थेट Income Tax ची नोटीस येण्याची शक्यता
17
साप्ताहिक राशीभविष्य: ७ राशींना शानदार, उत्साह वाढेल; पद-पैसा-चांगला लाभ, पण आरोग्य सांभाळा!
18
अमेरिकेची ‘माइन हंटिंग’ मोहीम! इराणकडून समुद्रतळात पेरलेले पाणसुरुंग काढण्याचे ट्रम्प यांचे आदेश
19
माओवाद्यांकडून सशस्त्र क्रांतीचाच पुनरुच्चार! ‎'देवजी'ला ठरवले गद्दार: आत्मसमर्पण धोरणावर पत्रकातून आगपाखड 
20
हैदराबादहून चेन्नईला जाणाऱ्या चारमीनार एक्स्प्रेसला लागली आग, प्रवाशांनी धावत्या ट्रेनमधून मारल्या उड्या   
Daily Top 2Weekly Top 5

महावितरण कर्मचाऱ्यांच्या निवासस्थानांची दुरवस्था

By admin | Updated: November 16, 2014 22:55 IST

येथील विद्युत उपकेंद्रात कार्यरत कर्मचाऱ्यांसाठी महावितरणे येथे निवासस्थाने बांधली आहेत. मात्र या निवासस्थानांच्या बांधणीनंतर त्यांची दुरुस्ती व देखभाल करण्याकडे दुर्लक्ष झाल्याने आता

घोन्सा : येथील विद्युत उपकेंद्रात कार्यरत कर्मचाऱ्यांसाठी महावितरणे येथे निवासस्थाने बांधली आहेत. मात्र या निवासस्थानांच्या बांधणीनंतर त्यांची दुरुस्ती व देखभाल करण्याकडे दुर्लक्ष झाल्याने आता ही निवासस्थाने जीर्ण झाली आहे. परिणामी कर्मचाऱ्यांना तेथे वास्तव्य करणे कठीण झाले आहे.येथे महावितरणचे ३३ के.व्ही. क्षमतेचे विद्युत उपकेंद्र आहे़ महावितरणचे कनिष्ठ अभियंता कार्यालयही येथे आहे. या केंद्रातून परिसरातील जवळपास २0 ते २५ गावांना वीज पुरवठा केला जातो. त्यामुळे हे उपकेंद्र परिसरासाठी अत्यंत महत्त्वाचे आहेत. त्यासाठीच येथे कर्मचाऱ्यांना राहण्यासाठी महावितरणतर्फे निवासस्थाने बांधण्यात आली होती. त्यात कर्मचाऱ्यांनी वास्तव्य करून ग्राहकांना योग्य सेवा द्यावी, अशी अपेक्षा होती.महावितरणने येथे निवासस्थाने बांधली क्री, मात्र नंतर त्यांच्या दुरुस्ती आणि डागडुजीकडे दुर्लक्ष केले. तरीही जीर्ण झालेल्या या निवासस्थानांमध्ये काही कर्मचारी कसेबसे वास्तव्य करीत आहे़ तथापि गेल्या कित्येक वर्षांपासून या निवासस्थानांची दुरूस्ती न झाल्यामुळे ही निवासस्थाने आता भकास झाली आहे. त्यांचा मूळ चेहराच गायब झाला आहे. काही निवासस्थानांच्या खिडक्यांच्या काचा फुटलेल्या असून प्रसाधन गृहांची प्रचंड दुरवस्था झाली आहे. या प्रसाधन गृहांमधून आता दुर्गंधी पसरत आहे़ त्याचा त्रास आजूबाजूला राहणाऱ्या कर्मचाऱ्यांना होत आहे. महावितरणच्या या निवासस्थानांसभोवताल घाणीचे साम्राज्य पसरले आहे़ या घाणीची दुर्गंधी सुटल्याने त्यात वास्तवय करणाऱ्या कर्मचाऱ्यांच्या कुटुंबियांचे आरोग्य धोक्यात सापडले आहे. त्यांचे कुटुंबिय जीव मुठीत धरून तेथे वास्तव्य करीत आहे. विशेष म्हणजे या निवासस्थानांच्या दुरूस्तीसाठी दरवर्षी निधी येत असल्याचे समजते. तथापि हा कोणत्या निवासस्थानांच्या दुरुस्तीवर अथवा डागडुजीवर खर्च केला जातो, हे एक कोडेच आहे. त्यामुळे हा निधी नेमका जातो कुठे, असा प्रश्न निर्माण झाला आहे. याबाबत आता महावितरणच्या वरिष्ठांनीच तपासणी करण्याची गरज आहे. (वार्ताहर)