व्यापाऱ्यांचे धान्य अद्याप शेडमध्येच

By Admin | Updated: May 14, 2014 02:10 IST2014-05-13T00:15:12+5:302014-05-14T02:10:26+5:30

शेतकऱ्यांचा शेतमाल ठेवण्यासाठी शेड रिकामे करून द्या, असा येथील बाजार समितीच्या प्रशासकाने दिलेला आदेश व्यापाऱ्यांनी झिडकारला.

Merchants are still in the shed | व्यापाऱ्यांचे धान्य अद्याप शेडमध्येच

व्यापाऱ्यांचे धान्य अद्याप शेडमध्येच

ंयवतमाळ : शेतकर्‍यांचा शेतमाल ठेवण्यासाठी शेड रिकामे करून द्या, असा येथील बाजार समितीच्या प्रशासकाने दिलेला आदेश व्यापार्‍यांनी झिडकारला. हमाल नसल्याचे कारण यामागे व्यापार्‍यांनी सांगितले असले तरी, या मागे त्यांची खेळी असल्याचे सांगितले जाते.

यवतमाळ कृषी उत्पन्न बाजार समितीच्या लिलावगृहात व्यापार्‍यांनी शेतमाल ठेवला. हा माल बाहेर काढण्यासाठी त्यांना दोन दिवसांची मुदत बाजार समितीच्या प्रशासकांनी दिली होती. यानंतरही व्यापार्‍यांनी आपला शेतमाल बाहेर काढला नाही. सोमवार आणि मंगळवार हे दोन दिवस खरेदी-विक्री बंद ठेवण्याचे आदेशही प्रशासकांनी काढले होते. त्यामुळे बाजार समिती आज बंद होती. बदच्या काळात लिलावगृहातील पोत्यांच्या गंज्या व्यापार्‍यांनी हटविणे अपेक्षित होते. मात्र व्यापारी बाजार समितीकडे फिरकलेच नाही.

लिलावगृहातील माल उचलायचाच नाही यावर व्यापारी ठाम राहिले. यासाठी त्यांनी हमालांचा ढाल म्हणून वापर केला. व्यापार्‍यांच्या या खेळीवर प्रशासक काय निर्णय घेतात यावर बाजार समितीचा लिलाव विसंबुन राहणार आहे.

प्रशासक, व्यापारी आणि हमाल यांच्यात पडलेली संघर्षाची ठिणगी आता उग्ररूप धारण करीत आहे. लिलाव बंद असल्याने शेतमाल विक्रीसाठी येणार्‍या शेतकर्‍यांची त्यात मुस्कटदाबी होण्याची दाट शक्यता आहे. शेतमाल घेऊन आल्यानंतर त्यांना आल्या पावली परत जाण्याशिवाय मार्ग राहणार नाही. याचा कुठलाही विचार प्रशासक आणि अन्य घटकांनी केल्याचे दिसून येत नाही.प्रत्येक वेळी शेतकरीच संघर्षात भरडला जातो. ऐरवी शेतकर्‍यांविषयी जिव्हाळ्याचा आव आणणार्‍या सामाजिक संघटना यावेळी गप्प का, असा प्रश्नही या निमित्ताने उपस्थित होत आहे.

(शहर वार्ताहर)

 

Web Title: Merchants are still in the shed