शहरं
Join us  
Trending Stories
1
पाकिस्तान निघाला अमेरिका-इराण शांतता करार घडवून आणायला, दोनच आठवड्यांत बसला २०० अब्जांचा फटका; शाहबाज यांना मोठा धक्का!
2
रिंकूची बॅटिंगसह फिल्डिंगमध्ये कमाल! LSG विरुद्ध सुपर ओव्हरमध्ये नरेन ठरला KKR च्या विजयाचा हिरो
3
शेअर्स मार्केट मध्ये मोठा परतावा देण्याच्या नावाखाली गंडा, फरार सागर कारिवडेकर अखेर ताब्यात
4
LSG vs KKR : नो बॉलचा ड्रामा! शमीनं शेवटच्या चेंडूवर सिक्सर मारला अन् सामन्यात सुपर ओव्हरचं ट्विस्ट
5
सूर्य कोपला, विदर्भात तापला! उष्णतेचा कहर; अकोल्यात देशातील सर्वाधिक ४६.९ अंश सेल्सिअस तापमान
6
बेलसर येथे ड्रेनेज टाकी साफ करताना तीन कामगारांचा गुदमरून मत्यू 
7
पाकिस्तानात 'अज्ञाता'चा पुन्हा थरार; लष्करचा टॉप कमांडर शेख युसूफ अफ्रिदीचा 'खातमा'! नेटवर्कला मोठा धक्का
8
LSG vs KKR : लखनौच्या मैदानात रिंकू सिंहचा 'मैं हूँ ना' शो! MS धोनीचा १५ वर्षांपूर्वीचा विक्रम मोडला
9
शिवाजी महाराज पूज्यनियच, माझ्या वक्तव्याचा विपर्यास केलागेला - धीरेंद्र शास्त्री
10
"फक्त जिम करून बॉलर होणार नाहीस, तर..." शमीच्या तालमीत कसा घडला मोहसिन खान?
11
बाजारात आली नवीन इलेक्ट्रिक कार, ६३० किमी रेंज, केवळ ९ मिनिटांत होईल फुल चार्ज! जबरदस्त आहेत फीचर्स
12
ट्रेनवर चढलेल्या युवकाचा विजेच्या धक्क्याने मृत्यू, ओएचई वायरला स्पर्श; विद्युत पुरवठा विस्कळीत, रेल्वे पोलिसांत गुन्हा दाखल
13
पंतनं खिलाडूवृत्ती नाही जपली! Angkrish Raghuvanshi ची विकेट ठरली वादग्रस्त; नेमकं काय घडलं?
14
DCM शिंदेंनी केली ‘मिसिंग लिंक’च्या कामाची पाहणी; कोणत्या वाहनांना परवानगी अन् टोल किती?
15
"महिलांना वर्षाला ३६०००, प्रत्येक घुसखोराला हाकलून लावणार अन् TMC..."; पंतप्रधान मोदींची मोठी घोषणा
16
भूषण गवई-धीरेंद्र शास्त्री भेटीवरून टीका, CM फडणवीसांनी सुनावले; म्हणाले, “श्याम मानव कोण?”
17
साई सुदर्शनचा जलवा; ऋतुराजची जिगरबाज खेळी व्यर्थ! चेपॉकच्या मैदानात गुजरातनं उडवला चेन्नईचा धुव्वा
18
जय श्रीराम! आता मुंबईतून अयोध्या गाठणे सुलभ, अमृत भारत ट्रेन सुरू होणार; पाहा, थांबे-वेळा
19
जयपूरच्या राजघराण्यातील 'सुपरकॉम्प्युटर'चा लंडनमध्ये लिलाव; १७व्या शतकातील यंत्र आजही कार्यरत...
20
आता ‘वंदे भारत बुलेट ट्रेन’ येणार, बंगळुरूत बांधणी; ICF-BEMLवर जबाबदारी, रेल्वेची मेगा योजना!
Daily Top 2Weekly Top 5

आईच्या खुन्याला विवाहित तरुणीने यमसदनी धाडले

By admin | Updated: November 4, 2016 02:00 IST

घरा शेजारील बाभळीच्या झाडाच्या वादातून महिलेचा खून झाला. या खुनाचे प्रकरण मागे घ्यावे म्हणून आरोपीचा दबाव होता.

तिवसा येथील घटना : प्रकरण मागे घेण्यासाठी होता दबावसोनखास : घरा शेजारील बाभळीच्या झाडाच्या वादातून महिलेचा खून झाला. या खुनाचे प्रकरण मागे घ्यावे म्हणून आरोपीचा दबाव होता. अखेर हा दबाव झुगारत या वृद्धेच्या विवाहित मुलीने त्या खुनातील आरोपीला यमसदनी धाडली. ही घटना यवतमाळ-दारव्हा रोडवरील तिवसा गावात बुधवारी सायंकाळी घडली. लाडखेड पोलीस ठाण्यात या प्रकरणी खुनाचा गुन्हा नोंदविण्याची प्रक्रिया सुरू होती. बाळू थावरू चव्हाण (२३) रा.तिवसा ता.यवतमाळ असे मृताचे नाव आहे. पाच महिन्यांपूर्वी तिवसा येथे बाभळीच्या झाडावरून बाळूचा शेजारी राहणाऱ्या उर्मिला यशवंत धवने (५०) या महिलेसोबत वाद झाला. या वादात मारहाणीत उर्मिला ठार झाली. या प्रकरणी बाळू चव्हाणविरुद्ध लाडखेड पोलिसांनी खुनाचा गुन्हा दाखल करून त्याला अटक केली. दरम्यान, तो जामिनावर सुटून आला. त्यानंतर खुनाचे प्रकरण मागे घ्यावे म्हणून उर्मिलाची मुलगी रंजना सीताराम राठोड (३०) रा.तिवसा हिच्यावर दबाव आणत होता. या दबावातूनच गेल्या काही दिवसांपासून या दोघांमध्ये खटके उडत होते. बुधवारी सायंकाळी पुन्हा त्यांच्यात वाद झाला. त्याचे पर्यवसान मात्र रक्तरंजीत भांडणात झाले. रागाच्या भरात रंजनाने काठीने बाळूला जबर मारहाण केली. काठीचा घाव बाळूच्या वर्मी बसल्याने तो गंभीर जखमी झाला. त्याला यवतमाळ व नंतर नागपूर येथे उपचारासाठी दाखल करण्यात आले. मात्र गुरुवारी सकाळी त्याचा मृत्यू झाला. या प्रकरणी बुधवारी लाडखेड पोलिसांनी रंजनाविरुद्ध प्राणघातक हल्ल्याचा गुन्हा दाखल केला होता. गुरुवारी बाळूचा मृत्यू झाल्याने तिच्याविरुद्ध खुनाचा गुन्हा नोंदविण्याची प्रक्रिया सुरू होती. ठाणेदार नरेश रणधीर, फौजदार रवी वावळे, जमादार गजानन शेजूळकर तपास करीत आहे. या घटनेने गावात खळबळ उडाली आहे. (वार्ताहर)