शहरं
Join us  
Trending Stories
1
Heatwave: देशात उष्णतेचा कहर, 'या' ६ राज्यात आग ओकतोय सूर्य, पुढील तीन दिवस घ्यावी लागेल काळजी!
2
तुमच्या मुलीच्या खात्यात येतील ६९,२७,५७८ रुपये, तुम्हाला या योजनेत किती करावी लागेल गुंतवणूक, पैसेही राहतील सुरक्षित
3
अमराठी रिक्षा, टॅक्सी चालकांना मराठी अनिवार्य कशी करावी?; महत्त्वपूर्ण बैठकीत आज होणार मंथन
4
‘मिसिंग लिंक’ मार्गावर कार, बसलाच एंट्री, टोलवाढ नाही; मुंबई-पुणे अंतर ६ किमीने कमी
5
आजचे राशीभविष्य - २७ एप्रिल २०२६, वडील व वडीलधार्‍यांकडून लाभ होईल, समाजात मान-प्रतिष्ठा वाढेल
6
एमआयडीसी मुख्यालय निविदेला पाचवी मुदतवाढ; ‘रतन टाटा उद्योग भवन’ प्रकल्पाला मिळणार वेग
7
कुजबुज! सत्ता नसूनही ठाकरेंची तारेवरची कसरत; गायकवाडांवरही होऊ शकते पुस्तक
8
मराठी अभिनेता झाला जुळ्या मुलांचा बाबा! लग्नाच्या ८ वर्षांनी पाळणा हलला, नावंही ठेवली खूपच खास
9
मेट्रो ६ मार्गासाठी पश्चिम रेल्वेवर ४२ मीटर स्टील स्पॅनची उभारणी; काय आहेत वैशिष्ट्ये?
10
‘रेलवन’वर बुकिंग फसले अन् वॉलेटमध्येच रक्कम अडकली; प्रवासी नाराज, पैसे परत देण्याची मागणी
11
२२ वर्षीय मुलीची क्रूर हत्या, अवघ्या ५ दिवसांत गुन्ह्याचा छडा; आरोपीला ठाण्यातून केली अटक
12
मुंबईकरांनो, तुम्ही रामभरोसे बाहेरचे पदार्थ खाताय..! महाराष्ट्रात एफडीए इन्स्पेक्टरची वानवा
13
आजारपण अन् आयुष्यभराची कमाई साफ; कुटुंब अडकते वर्षानुवर्षे कर्जाच्या खाईत, मध्यमवर्ग संकटात
14
‘त्यांना’ मराठीची परीक्षा देऊन पदवी घ्यायची नाही; परिवहन मंत्र्यांनी मांडली स्पष्ट भूमिका
15
तुम्ही रिक्षा-टॅक्सीवाल्यांची उपजीविका नष्ट करताय; मराठी सक्तीला शशांक राव यांचा आक्षेप
16
हम ‘आप’ के हैं कौन? सत्तेसाठी पक्ष फोडणे ही प्रवृत्ती लोकशाहीच्या आत्म्याला नख लावणारी
17
महामुंबईतील वॉटर मेट्रोला वेग! २६ टर्मिनल्स उभारणार; शहरांना नवे कनेक्शन, काय बदलणार?
18
पंतनं खिलाडूवृत्ती नाही जपली! Angkrish Raghuvanshi ची विकेट ठरली वादग्रस्त; नेमकं काय घडलं?
19
DCM शिंदेंनी केली ‘मिसिंग लिंक’च्या कामाची पाहणी; कोणत्या वाहनांना परवानगी अन् टोल किती?
20
भूषण गवई-धीरेंद्र शास्त्री भेटीवरून टीका, CM फडणवीसांनी सुनावले; म्हणाले, “श्याम मानव कोण?”
Daily Top 2Weekly Top 5

बाजारपेठा १७ मेपर्यंत बंदच

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 6, 2020 05:00 IST

कोरोनाची ही लढाई जिंकून यवतमाळ जिल्ह्याला रेड झोनमधून ग्रीन झोनमध्ये आणायचे आहे. एवढे दिवस कळ काढली आता आणखी ११ दिवस थांबा, असे आवाहन पालकमंत्र्यांनी केले. त्यांच्या आवाहनानुसार १७ मेपर्यंत यवतमाळ जिल्ह्यातील सर्व दुकाने, प्रतिष्ठाने बंद ठेवली जाणार असल्याची माहिती चेंबर ऑफ कॉमर्सचे अध्यक्ष अरुणभाई पोबारू यांनी ‘लोकमत’ला दिली.

ठळक मुद्देचेंबर ऑफ कॉमर्सच्या बैठकीतील निर्णय : बोअरवेल, मोबाईल दुरुस्तीला मुभा

लोकमत न्यूज नेटवर्कयवतमाळ : तिसरा लॉकडाऊन संपायला आता केवळ ११ दिवस आहेत. त्यामुळे या काळात संयम ठेऊन प्रशासनाला सहकार्य करावे, आपली प्रतिष्ठाने बंदच ठेवावीत, असे आवाहन जिल्ह्याचे पालकमंत्री संजय राठोड व जिल्हाधिकारी एम.डी. सिंह यांनी केले. या आवाहनाला चेंबर ऑफ कॉमर्स अ‍ॅन्ड इंडस्ट्रीजच्या पदाधिकाऱ्यांनी लगेच प्रतिसाद देत १७ मेपर्यंत आपली दुकाने बंद ठेवण्याचा निर्णय घेतला. मात्र यातून बोअरवेल आणि मोबाईल दुरुस्तीला सवलत देण्यात आली आहे. विशेष असे यवतमाळात दारूची दुकानेही बंदच राहणार आहे.उद्योग-व्यापार व व्यवसायातील बंदी उठवावी का या मुद्यावर चर्चा करण्यासाठी मंगळवारी चेंबर ऑफ कॉमर्सच्या पदाधिकाऱ्यांची ना. संजय राठोड यांनी बैठक बोलविली होती. या बैठकीला आमदार मदन येरावार, जिल्हा पोलीस अधीक्षक एम. राज कुमार, अतिरिक्त जिल्हाधिकारी सुनील महिंद्रीकर, निवासी उपजिल्हाधिकारी ललितकुमार वऱ्हाडे, चेंबर ऑफ कॉमर्सचे अध्यक्ष अरुणभाई पोबारू, उपाध्यक्ष राजेंद्र निमोदिया, राजेंद्र जैन, संजय अग्रवाल, राधाकृष्ण जाधवाणी, महेश मुंधडा आदी उपस्थित होते. या बैठकीत विविध विषयांवर चर्चा झाली.व्यापाºयांच्या मागण्यांवर आमदार मदन येरावार म्हणाले, कोरोनाची लक्षणे दिसत नाही, त्यामुळे दुकानात येणाºयांना कसे ओळखणार, गर्दी झाली तर दुकान मालक व इतरांनाही धोका होऊ शकतो, कोरोना संसर्गाची ही साखळी तोडण्यासाठी लॉकडाऊन संपेपर्यंत संयम ठेवणेच योग्य ठरेल.कोरोनाची ही लढाई जिंकून यवतमाळ जिल्ह्याला रेड झोनमधून ग्रीन झोनमध्ये आणायचे आहे. एवढे दिवस कळ काढली आता आणखी ११ दिवस थांबा, असे आवाहन पालकमंत्र्यांनी केले. त्यांच्या आवाहनानुसार १७ मेपर्यंत यवतमाळ जिल्ह्यातील सर्व दुकाने, प्रतिष्ठाने बंद ठेवली जाणार असल्याची माहिती चेंबर ऑफ कॉमर्सचे अध्यक्ष अरुणभाई पोबारू यांनी ‘लोकमत’ला दिली. अत्यावश्यक सेवेची व प्रशासनाने सूट दिलेली दुकाने मात्र नियोजित वेळेत सुरू राहणार आहे. बोअरवेल खोदण्याला मंजुरी देण्यात आली आहे. तर मोबाईल दुरूस्तीच्या दुकानालाही मंजुरी मिळाली आहे.व्यापाºयांकडून करांची वसुली करण्यास विरोधशासनाच्या सूचनांचे पालन करून जीवनावश्यक वस्तूंसोबत इतरही दुकाने सुरू करण्याची परवानगी द्यावी, एमआयडीसीमध्ये तीन पाळीत उद्योग सुरू करता यावे, व्यापाऱ्यांचे नुकसान झाल्याने पुढील काही महिने व्यापाऱ्यांकडून कर वसुली करू नये आदी मागण्या चेंबरच्यावतीने ठेवण्यात आल्या.पालकमंत्री म्हणाले, आणखी केवळ ११ दिवस द्यापालकमंत्री संजय राठोड यांनी कोरोनाचा प्रतिबंध करण्यासाठी आणखी ११ दिवस द्या, अशी विनंती केली. दीड महिन्यांपासून लॉकडाऊनमुळे उद्योग, व्यापार, व्यवसाय बंद आहेत. आता ११ दिवसांसाठी दुकाने उघडल्यास कोरोनाचा पुन्हा संसर्ग होण्याची भीती आहे. परजिल्ह्यातून आणि परराज्यातून मजुरांचे लोंढे मोठ्या प्रमाणात जिल्ह्यात येत आहेत. नागरिकांची गर्दी बाजारात मोठ्या प्रमाणात उसळत आहे. अशा स्थितीत कोरोनाचा प्रकोप वाढू शकतो.

टॅग्स :Marketबाजारcorona virusकोरोना वायरस बातम्या