शहरं
Join us  
Trending Stories
1
लोकसभेतील ५४३ जागांसाठी का लागू होऊ शकत नाही महिला आरक्षण, सरकार अन् विरोधकांचे दावे काय?
2
PM नरेंद्र मोदी आज रात्री ८.३० वाजता देशाला संबोधित करणार; महिला आरक्षणावर बोलण्याची शक्यता
3
UPI द्वारे सतत पैसे भरल्यानं तुमचा Credit Score कमी होतो का; काय आहे यामागचं सत्य?
4
Strait of Hormuz Closed : जगाची चिंता वाढणार! इराणने होर्मुझची सामुद्रधुनी पुन्हा केली बंद; तेलाचा पुरवठा विस्कळीत; महागाईचा भडका उडणार?
5
पैसे, दागिने, लॉटरीची हाव... पुतणीने बॉयफ्रेंडच्या मदतीने काढला काकीचा काटा; 'अशी' झाली पोलखोल
6
अक्षय्य तृतीयेपूर्वी सोनं स्वस्त; खरेदीदारांना दिलासा, जाणून घ्या १८ ते २४ कॅरेटपर्यंतचे सोन्याचे आजचे दर
7
Danish Khan : "माझा मुलगा निर्दोष, त्याला..."; TCS धर्मांतर प्रकरणातील आरोपी दानिशच्या आईचा धक्कादायक दावा
8
अरब देशांत अडकलेल्यांसाठी खुशखबर! इराणने उघडली हवाई हद्द; मायदेशी परतण्याचा मार्ग मोकळा
9
कर्नाटकला विजेचा झटका! वीज दरात झाली वाढ, आता सर्वसामान्यांचे बजेट कोलमडणार
10
Bank of Maharashtra Robbery: दिवसाढवळ्या बँक ऑफ महाराष्ट्र बँकवर दरोडा; गोळीबार करत लाखो रुपये आणि सोनंही पळवलं!
11
उडू शकत नाही तरीही ऑस्ट्रेलियन 'इमू' एवढ्या लांब अयोध्येत कसा पोहोचला?; वन विभागही हैराण
12
Aaditya Thackeray : "गैरमार्गाने विजय मिळवण्यासाठीचे फेररचना विधेयक, राजकीय हेतूने..."; आदित्य ठाकरेंचा निशाणा
13
DA Hike: केंद्रीय कर्मचाऱ्यांसाठी आनंदाची बातमी, डीए वाढला; मंत्रिमंडळाचं शिक्कामोर्तब, किती वाढणार सॅलरी?
14
कधीकाळी चेंडूच्या वेगाने दहशत निर्माण करणारा 'हा' गोलंदाज आज ICU मध्ये देतोय मृत्यूशी झुंज
15
पालक पनीर , कढई पनीर, शाही पनीर...; तुम्हाला काय आवडतं? व्हिडिओ पाहिल्यानंतर खाणं सोडून द्याल!
16
खारेगाव टोलनाक्यावर भीषण अपघात; ट्रकच्या धडकेत भांडुपमधील दाम्पत्याचा जागीच मृत्यू
17
इराण-इस्रायल युद्धामुळे जग हादरलं! ५० अब्ज डॉलर्सचं कच्चं तेल नष्ट, भारतावरही मोठा परिणाम
18
७८ मेल, २२ फोन कॉल... धर्मांतरासाठी WhatsApp ग्रुपचा वापर; चॅटिंगमधून धक्कादायक खुलासा
19
मध्य रेल्वेवर आज मध्यरात्री १० तासांचा विशेष ब्लॉक
20
आता जनगणना करायला घरी 'गर्लफ्रेंड' येणार; नगरपालिकेचे फर्मान वाचून सोशल मीडियात मीम्स व्हायरल
Daily Top 2Weekly Top 5

बाजार समितीत शेतकर्‍याला मारहाण

By admin | Updated: May 24, 2014 23:58 IST

येथील बाजार समितीच्या धान्य बाजार यार्डात हरभरा विक्रीस आणणार्‍या एका शेतकर्‍यास हरभरा खरेदी करणार्‍या एजन्सीच्या लोकांनी मारहाण केल्याची घटना घडली. या बाबत तिघांविरोधात गुन्हे

घाटंजी : येथील बाजार समितीच्या धान्य बाजार यार्डात हरभरा विक्रीस आणणार्‍या एका शेतकर्‍यास हरभरा खरेदी करणार्‍या एजन्सीच्या लोकांनी मारहाण केल्याची घटना घडली. या बाबत तिघांविरोधात गुन्हे दाखल करण्यात आले.

जरूर येथील संजय महादेव जीवतोडे या शेतकर्‍याने १२ मे रोजी २५७ कट्टे हरभरा घाटंजी बाजार समितीमध्ये विक्रीस आणला. त्या दिवशी ग्रेडरने ग्रेडींग करून तो पास केला. म्हणून जीवतोडेनी तो हरभरा बाजार समितीमध्ये ठेवला. मालाचा काटा आज होईल. उद्या होईल या आशेने तो येथे चकरा मारू लागला. या सोबत इतर शेतकर्‍यांचासुद्धा माल होता. या सर्व ५0-६0 कास्तकारांनी माल केव्हा खरेदी करणार म्हणून २0 मे मंगळवारी उठाव केला व सहाय्यक निबंधकास बोलाविले. त्यावेळी सचिवाने खरेदी करण्याची परवानगी १९ मे सोमवारपर्यंतच होती, असे सांगितले. यावर निबंधकांनी १५-२0 दिवसापासून येथे पडून असलेला हरभरा का खरेदी केला नाही, या प्रश्नाला सचिव व प्रशासक उत्तर देवू शकले नाही.

निबंधकांनी त्वरित हरभरा खरेदी करण्याच्या सूचना दिल्या. त्यानंतर एक-दोन दिवसाची मुदत वाढवून खरेदीस प्रारंभ झाला. २१ मे रोजी रंजित बोबडे यांनी जीवतोडे यांना हरभरा गाळण्यास सांगितले. हरभरा मजूर लावून गाळण्यात आला. नंतर त्या हरभर्‍यात डाळ आहे, असे कारण देत तो खरेदी करण्यास नकार दिला. यातून वाद झाला.

जीवतोडे यांनी दिलेल्या तक्रारीनुसार रंजित बोबडे (५0) यांनी थापड बुक्क्यांनी मारहाण केली. त्यांचा मुलगा रितेश (१९) याने अलि शिवीगाळ करून मारहाण केली. तर नीलेश प्रकाश हांडे (३५) यांनी दगडाने खांद्यावर व उजव्या चाळ्यावर मारले. त्यामुळे संजय जीवतोडे जखमी झाले. पोलिसात तक्रार दाखल करण्यात आली. त्यावरून भादंवि ३२४, २१९, ५0४, ५0६, ३४ नुसार वरील तिघांविरुद्ध गुन्हे दाखल करण्यात आले.

शासकीय हमी भावाने खरेदी करण्यासाठी येथील रंजित बोबडे यांच्या विकास गंगा संस्थेअंतर्गत नवजीवन आणि यशोधरा अँग्रो प्रॉड्स कंपनीतर्फे दिली. येथील एसएएफसी नोडल कंपनीसाठी हरभरा खरेदी करीत होती. परंतु २१ मे रोजी दुपारनंतर पुन्हा खरेदी बंद झाली असून अजूनही बाजार यार्डात सातशे ते आठशे क्विंटल हरभरा खरेदीच्या प्रतीक्षेत पडून आहे. शेतकरी हवालदिल झाले आहे. (तालुका प्रतिनिधी)