शहरं
Join us  
Trending Stories
1
TCS प्रकरणातील मास्टरमाइंड HR निदा खान महाराष्ट्रातून पसार?; 'या' ३ राज्यांत पोलीस पथके रवाना
2
संसदेत लोकशाहीवरून जुंपली! "कुणी इंदिरा गांधींप्रमाणे पंतप्रधान मोदींची खुर्ची...!"; प्रियंकांच्या 'त्या' विधानावर कंगना रणौत यांचा पलटवार
3
गेम ओव्हर! नगरसेवकपद धोक्यात असलेल्या सहर शेख ‘वानखेडे’वर; इन्स्टा स्टोरीतून कुणाला डिवचले?
4
Top Marathi News LIVE Updates: मी असतो तर आरोपींना फाशी दिली असती- अमित ठाकरे
5
टिकली किंवा गंध लावण्यावर बंदी, पण हिजाबला परवानगी? लेन्सकार्टच्या ड्रेस कोड वादावर पियुष बन्सल यांचं स्पष्टीकरण; म्हणाले...
6
संसदेतील महाचर्चेतच मध्यरात्री लागू झाला महिला आरक्षण कायदा २०२३; सरकारने जारी केले नोटिफिकेशन
7
१४ वर्षीय मुलीची हत्या? प्रसिद्ध गायकाला पोलिसांनी केली अटक, मनोरंंजन विश्वात खळबळ
8
मुलींचे अश्लील व्हिडीओ काढणाऱ्या अयानला पोलिसांनीच भरवला केक;'बॉस'चा टी-शर्ट घालून भररस्त्यात वाढदिवस साजरा
9
Nida Khan : "आमची मुलगी प्रेग्‍नेंट, तिला मुद्दाम अडकवलं जातंय"; निदा खानच्या पालकांचा खळबळजनक दावा
10
६ मिनिटं वाचन केल्याने ६८% नी मानसिक तणाव कमी होतो, पण वाचनाची आवड लावायची कशी?
11
MI vs PBKS: मैदान मुंबईचं अन् दहशत पंजाबची! श्रेयस अय्यरच्या संघानं वानखेडेवर रचला मोठा इतिहास
12
IPL 2026: ५ सामने, ० विकेट्स! MIचा हुकूमी एक्का जसप्रीत बुमराहचा 'फ्लॉप शो'; 'हे' आहे कारण
13
नवग्रह काही वाकडं करू शकणार नाही, उलट अपार लाभ-भरभराट होईल; अक्षय्य तृतीयेला ‘हे’ दान करा!
14
कर्जात बुडालेले लोक आता घेताहेत सोन्यावर कर्ज, बुडण्याची भीती वाढली
15
सोन्या-चांदीच्या दरात किरकोळ तेजी; पाहा २४K, २२K, १८K सोन्याचा तुमच्या शहरातील दर 
16
सांगली हादरली! पत्नीला घरात ठेवण्याच्या हट्टापायी आईची हत्या; वडील घरी नसताना मुलाचे क्रूर कृत्य
17
भारतासमोर नवं आव्हान, तेल कुठून आणायचं?; रशिया-इराण तेल निर्बंधावरील सूट अमेरिकेने हटवली
18
केवळ ४ वर्षांपर्यंत भरावा लागेल प्रीमिअम, नंतर मिळणार १ कोटींचं बेनिफिट; कोणती आहे LIC ची ही स्कीम?
19
कोण आहे सीताराम बाबा? ज्यांनी भाजपा आमदाराला जोरजोरात ठोसे मारले अन् ढकलून दिलं, Video व्हायरल
20
डोनाल्ड ट्रम्प स्वतः इराणशी शांतता चर्चा करणार? म्हणाले, “मी पाकिस्तानात जाण्यास तयार”
Daily Top 2Weekly Top 5

मनदेव तलाव गाळाने भरला

By admin | Updated: June 4, 2017 01:11 IST

आर्णी मार्गावरील मनदेव आणि हिवरी दरम्यान असलेला मनदेव तलाव गाळाने भरला आहे. मागील ४५ ते ५० वर्षांपासून या तलावाचे खोलीकरणच झाले नाही.

लोकमत न्यूज नेटवर्कहिवरी : आर्णी मार्गावरील मनदेव आणि हिवरी दरम्यान असलेला मनदेव तलाव गाळाने भरला आहे. मागील ४५ ते ५० वर्षांपासून या तलावाचे खोलीकरणच झाले नाही. या तलावाची साठवण क्षमता कमी झाल्याने उन्हाळ्यात केवळ डबके राहातात. परिणामी सिंचन आणि वन्य प्राण्यांसाठी पिण्याच्या पाण्याचा प्रश्न निर्माण झाला आहे.या तलावाची साठवण क्षमता केवळ २५ ते ३० टक्के राहिली आहे. हा तलाव घाटाखाली असल्याने वन्यजीवांना महामार्ग ओलांडून तलावावर जावे लागत नाही. त्यामुळे अपघात होत नाही. वेळोवेळी डागडुजी आणि खोलीकरणाचे काम झाल्यास हा तलाव आजही सिंचन, वन्य प्राण्यांची तहान भागविण्यासाठी उपयोगी पडतो. या तलावातून जवळपास २०० हेक्टर सिंचन क्षमता निर्मितीच्यावेळेस निश्चित करण्यात आली होती. प्रत्यक्षात थोड्याफार क्षेत्रातच सिंचन शक्य झाले. लाखो रुपये खर्च करून तयार झालेला हा तलाव नामशेष होण्यापूर्वी त्याचे पुनरूज्जीवन करणे काळाची गरज आहे. तलावाचे खोलीकरण करून योग्य सुशोभीकरण केल्यास पर्यटन विकासालाही वाव आहे. या माध्यमातून वनविभागाला उत्पन्नाचा एक नवीन स्रोतही मिळू शकतो. तलावावर विविध तसेच विदेशी पक्षीसुद्धा आढळल्याच्या नोंदी काही पक्षीप्रेमींकडे आहेत. या सर्व बाबी डोळ्यासमोर ठेवून तलावाच्या विकासाची गरज निर्माण झाली आहे.वनविभागाने नाकारली परवानगीसिंचनासाठी संजीवनी ठरत असलेल्या या तलावाची खोली वाढविण्यासाठी शेतकऱ्यांनी स्वखर्चाने गाळ काढण्याचा निर्णय घेतला. मात्र वनविभागाने याला परवानगी नाकारली. विकासाच्यादृष्टीने लोकांनी पुढाकार घेतलेल्या कामातही वनविभागाकडून नियम दाखविले जात आहे. याविषयी नागरिकांमध्ये रोष आहे.