कुपोषणाचे प्रमाण वाढले

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 30, 2020 05:00 AM2020-06-30T05:00:00+5:302020-06-30T05:01:00+5:30

कोरोना आणि लॉकडाऊनमुळे अनेकांचा रोजगार गेला. यातून दारिद्र्य रेषेखालील नागरिकांच्या वाट्याला उपासमार आली. नेमके याच कुटुंबातील बालके कुपोषित आहेत. या बालकांना पोषण आहार उत्तम पद्धतीने मिळावा म्हणून गरोदर आणि स्तनदा मातांना अंगणवाडीतून पोषण आहार दिला जात होता. आता कोरोनामुळे अंगणवाड्याच बंद आहेत.

Malnutrition increased | कुपोषणाचे प्रमाण वाढले

कुपोषणाचे प्रमाण वाढले

Next
ठळक मुद्दे३१५ बालके : आहारच नाही

लोकमत न्यूज नेटवर्क
यवतमाळ : जिल्ह्यात अलिकडे वाढलेले कुपोषण रोखण्यासाठी शासनाने आता थेट मातांच्या बँक खात्यात बालकांच्या पोषण आहाराची रक्कम टाकण्याचा निर्णय घेतला आहे. त्यामुळे बालके सुदृढ होऊन कुपोषण नियंत्रणात येण्याची अपेक्षा व्यक्त केली जात आहे.
कोरोना आणि लॉकडाऊनमुळे अनेकांचा रोजगार गेला. यातून दारिद्र्य रेषेखालील नागरिकांच्या वाट्याला उपासमार आली. नेमके याच कुटुंबातील बालके कुपोषित आहेत. या बालकांना पोषण आहार उत्तम पद्धतीने मिळावा म्हणून गरोदर आणि स्तनदा मातांना अंगणवाडीतून पोषण आहार दिला जात होता. आता कोरोनामुळे अंगणवाड्याच बंद आहेत. यावर तोडगा म्हणून अमृत आहार योजनेतून स्तनदा आणि गरोदर मातांसाठी थेट निधीची योजना हाती घेतली आहे. यामध्ये स्तनदा आणि गरोदर मातांच्या खात्यात दर दिवसाच्या भोजनाचे ३५ रूपये वळते केले जात आहे. हा निधी अमृत आहार योजनेतून महिलांच्या खात्यात वळता झाला आहे. त्याकरिता १२ प्रकल्पातील ७१५ अंगणवाड्यांची निवड करण्यात आली. पाच हजार ४७३ माता या योजनेच्या लाभार्थी आहेत. कुपोषण मुक्तीसाठी ३१५ बालकांना स्तनदा मातांमुळे पोषण आहार मिळणार आहे. तर त्यापेक्षा मोठ्या बालकांना सकस आहार असणारे धान्य घरपोच दिले जात आहे. यातून कुपोषणावर मात होईल, असा विश्वास प्रशासनाला आहे.

तपासणीनंतरच कळणार वास्तव
कुपोषण मुक्तीसाठी बालकांना आहार देत आहे. यातून बालकांचे वजन वाढले काय, तो कुपोषणाच्या बाहेर आला काय, याबाबतचे वास्तव तपासणी अहवालानंतर उघड होईल. या तपासणीकडे नजरा आहे.

Web Title: Malnutrition increased

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.