शहरं
Join us  
Trending Stories
1
पाकिस्तानात 'अज्ञाता'चा पुन्हा थरार; लष्करचा टॉप कमांडर शेख युसूफ अफ्रिदीचा 'खातमा'! नेटवर्कला मोठा धक्का
2
DCM शिंदेंनी केली ‘मिसिंग लिंक’च्या कामाची पाहणी; कोणत्या वाहनांना परवानगी अन् टोल किती?
3
"महिलांना वर्षाला ३६०००, प्रत्येक घुसखोराला हाकलून लावणार अन् TMC..."; पंतप्रधान मोदींची मोठी घोषणा
4
भूषण गवई-धीरेंद्र शास्त्री भेटीवरून टीका, CM फडणवीसांनी सुनावले; म्हणाले, “श्याम मानव कोण?”
5
साई सुदर्शनचा जलवा; ऋतुराजची जिगरबाज खेळी व्यर्थ! चेपॉकच्या मैदानात गुजरातनं उडवला चेन्नईचा धुव्वा
6
जय श्रीराम! आता मुंबईतून अयोध्या गाठणे सुलभ, अमृत भारत ट्रेन सुरू होणार; पाहा, थांबे-वेळा
7
जयपूरच्या राजघराण्यातील 'सुपरकॉम्प्युटर'चा लंडनमध्ये लिलाव; १७व्या शतकातील यंत्र आजही कार्यरत...
8
आता ‘वंदे भारत बुलेट ट्रेन’ येणार, बंगळुरूत बांधणी; ICF-BEMLवर जबाबदारी, रेल्वेची मेगा योजना!
9
महाराष्ट्र बोर्ड १२ वीचा निकाल कोणत्याही क्षणी! डिजीलॉकरवर 'Coming Soon' चे संकेत; निकाल पाहण्यासाठी 'हे' डिटेल्स ठेवा तयार
10
हरभजन सिंगविरोधात रोष, भाजपत प्रवेश केला म्हणून घरावर लिहिलं 'गद्दार'; बघा VIDEO
11
‘आप’ने दणके द्यायला सुरुवात केली; हरभजन सिंगची सुरक्षा काढली, पंजाब मान सरकारची नाराजी उघड
12
“छत्रपती शिवाजी महाराज कधी थकले नाहीत, झुकले नाहीत”; राऊतांचा धीरेंद्र शास्त्रींवर पलटवार
13
आपली बस, आपली सेवा…! ST प्रवाशांसाठी मोठे पाऊल; १ मे पासून ‘लालपरी’चे नवे अभियान होणार सुरू
14
“लोकशाहीत हिंसाचाराला थारा नाही”; वॉशिंग्टन हॉटेल गोळीबार प्रकरणी PM मोदींची प्रतिक्रिया
15
“ST ग्रामीण भागाची जीवनवाहिनी, विलिनीकरणाबाबात महायुती सरकार गप्प का?”: विजय वडेट्टीवार
16
वॉशिंग्टन हॉटेल गोळीबार प्रकरण, ट्रम्प यांची मोठी प्रतिक्रिया; इराण युद्धाशी संबंध जोडत म्हणाले…
17
Ruturaj Gaikwad चा संघर्ष संपला! CSK संकटात असताना पुणेकराचा ‘वन मॅन आर्मी’ शो
18
एकनिष्ठ राहिलेले...! मायक्रोसॉफ्ट जुन्या-जाणत्यांना नोकरीवरून काढणार; नोकरी सोडा नाहीतर स्वेच्छानिवृत्ती घ्या... 
19
बँकेतून काढलेले १५ लाख घरी ठेवले आणि नंतर जमा केले; आयकर विभागाने कर लावला, महिलेने दाद मागितली...
20
Vaibhav Suryavanshi Injury : विक्रमी सेंच्युरीनंतर वैभव सूर्यवंशी दुखापतग्रस्त; तो पुढील सामन्यात खेळणार का?
Daily Top 2Weekly Top 5

‘मजीप्रा’ सर्वच आघाड्यांवर थंड

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 19, 2020 05:00 IST

निळोणा आणि चापडोह या दोन प्रकल्पातून यवतमाळ शहरवासीयांची तहान भागविली जाते. सुदैवाने या दोनही प्रकल्पामध्ये पुरेसे पाणी असल्याने शहरवासीयांची टंचाईतून मुक्तता झाली आहे. पण प्राधिकरणाच्या नियोजनशून्यतेमुळे कृत्रिम पाणीटंचाईचा झटका नागरिकांना बसत आहे. पाच दिवसाआड होणारा पाणीपुरवठा १२ दिवसांवर पोहोचला आहे.

ठळक मुद्देपाणीपुरवठा विस्कळीत : नवीन योजनांच्या कामांची गती संथ

लोकमत न्यूज नेटवर्कयवतमाळ : महाराष्ट्र जीवन प्राधिकरण यवतमाळ शहरात सर्वच आघाड्यांवर संथ आहे. अनियमित पाणीपुरवठा सुरू आहे. नवीन योजनांच्या कामांची कासवगती आहे.निळोणा आणि चापडोह या दोन प्रकल्पातून यवतमाळ शहरवासीयांची तहान भागविली जाते. सुदैवाने या दोनही प्रकल्पामध्ये पुरेसे पाणी असल्याने शहरवासीयांची टंचाईतून मुक्तता झाली आहे. पण प्राधिकरणाच्या नियोजनशून्यतेमुळे कृत्रिम पाणीटंचाईचा झटका नागरिकांना बसत आहे. पाच दिवसाआड होणारा पाणीपुरवठा १२ दिवसांवर पोहोचला आहे.यवतमाळ शहरासाठी अमृत योजनेंतर्गत बेंबळाचे पाणी आणण्याची सर्कस अजूनही सुरूच आहे. २९ एप्रिल २०१७ रोजी या कामाचा कार्यादेश झाला. २७ आॅक्टोबर २०१९ पर्यंत ही योजना पूर्ण करायची होती. ३०० कोटींची योजना पूर्ण होणे तर दूर अजूनही पाईपच्या टेस्टींगवरच आहे.बेंबळा प्रकल्प ते टाकळी फिल्टर प्लांटपर्यंत १८ किलोमीटर एक हजार मिमीचे पाईप टाकले गेले. परंतू सद्यस्थितीत केवळ १२ किलोमीटरचे टेस्टींग झाले आहे. सहा किलोमीटरसाठी दिवसं मोजावे लागत आहे. पाईप फुटले नसल्याचे समाधान प्राधिकरणाला आहे. मात्र फिटिंगमधील दोष काढताना नाकीनऊ येत आहे. टाकळी ते मजीप्रा कार्यालयापर्यंत आठ किलोमीटर पाईपलाईन टाकण्यात आली. या पाईपचेही टेस्टींग पूर्ण झालेले नाही. स्थानिक कंत्राटदारांकडून ही कामे करून घेतली जात आहे. अनुभवाची वाणवा त्यांच्याकडे आहे.भूमिगत गटार योजनेच्या कामाने यवतमाळ शहरातील काही भागांची दैना केली आहे. सुस्थितीतील आणि चकचकीत रस्ते फोडून काढले. इथपर्यंत ठीक आहे, पण गटार योजनेच्या कामाविषयी साशंकताच आहे. पाण्याचा अतिशय कमी वापर, वाहतुकीच्या रस्त्यापेक्षा खोल किंवा उथळ भागावर असलेले गडर अपघाताला निमंत्रण देणारे ठरत आहे. काही ठिकाणी तर चेंबर आतापासूनच फुटायला सुरुवात झाली आहे.योजनांसाठी कोट्यवधी रुपयांचा खर्च केला जात आहे. लोकांचा त्रास कमी व्हावा यासाठी योजना हाती घेण्यात आल्या असल्या तरी त्या विद्यमान स्थितीत तरी डोकेदुखी ठरत आहे. योजनांना गती देण्याची गरज नागरिकांमधून व्यक्त करण्यात येत आहे.रस्त्यांची वाट लागू नये म्हणजे झालेअमृत योजनेंतर्गत यवतमाळ शहरात पाईपचे जाळे विणण्यात आले. पाईपलाईन टाकलेल्या ठिकाणचे रस्ते गुळगुळीत झाले. मात्र पाईप लिकेज निघाल्यास या रस्त्यांवर पुन्हा भगदाड पडण्याची भीती आहे. नागरिकांच्या घरापर्यंत ११० एमएमचे पाईप अंथरले जात आहे. परंतु अजूनही काही भागात ते पोहोचले नाही. काही लोकांना जुन्या तर काहींना नवीन पाईपलाईनवरून पाणी पुरवठा होत आहे.लॉकडाऊननंतर बेंबळाच्या कामाला अधिक गती देवून लवकरच पंपिंग सुरू केले जाईल. भूमिगत गटार योजनेच्या कामात कुठलेही दोष नाही. सर्व कामे व्यवस्थित होत आहे.- सुरेश हुंगे, कार्यकारी अभियंता, मजीप्रा, यवतमाळ

टॅग्स :Waterपाणी