शहरं
Join us  
Trending Stories
1
पाकिस्तान निघाला अमेरिका-इराण शांतता करार घडवून आणायला, दोनच आठवड्यांत बसला २०० अब्जांचा फटका; शाहबाज यांना मोठा धक्का!
2
रिंकूची बॅटिंगसह फिल्डिंगमध्ये कमाल! LSG विरुद्ध सुपर ओव्हरमध्ये नरेन ठरला KKR च्या विजयाचा हिरो
3
शेअर्स मार्केट मध्ये मोठा परतावा देण्याच्या नावाखाली गंडा, फरार सागर कारिवडेकर अखेर ताब्यात
4
LSG vs KKR : नो बॉलचा ड्रामा! शमीनं शेवटच्या चेंडूवर सिक्सर मारला अन् सामन्यात सुपर ओव्हरचं ट्विस्ट
5
सूर्य कोपला, विदर्भात तापला! उष्णतेचा कहर; अकोल्यात देशातील सर्वाधिक ४६.९ अंश सेल्सिअस तापमान
6
बेलसर येथे ड्रेनेज टाकी साफ करताना तीन कामगारांचा गुदमरून मत्यू 
7
पाकिस्तानात 'अज्ञाता'चा पुन्हा थरार; लष्करचा टॉप कमांडर शेख युसूफ अफ्रिदीचा 'खातमा'! नेटवर्कला मोठा धक्का
8
LSG vs KKR : लखनौच्या मैदानात रिंकू सिंहचा 'मैं हूँ ना' शो! MS धोनीचा १५ वर्षांपूर्वीचा विक्रम मोडला
9
शिवाजी महाराज पूज्यनियच, माझ्या वक्तव्याचा विपर्यास केलागेला - धीरेंद्र शास्त्री
10
"फक्त जिम करून बॉलर होणार नाहीस, तर..." शमीच्या तालमीत कसा घडला मोहसिन खान?
11
बाजारात आली नवीन इलेक्ट्रिक कार, ६३० किमी रेंज, केवळ ९ मिनिटांत होईल फुल चार्ज! जबरदस्त आहेत फीचर्स
12
ट्रेनवर चढलेल्या युवकाचा विजेच्या धक्क्याने मृत्यू, ओएचई वायरला स्पर्श; विद्युत पुरवठा विस्कळीत, रेल्वे पोलिसांत गुन्हा दाखल
13
पंतनं खिलाडूवृत्ती नाही जपली! Angkrish Raghuvanshi ची विकेट ठरली वादग्रस्त; नेमकं काय घडलं?
14
DCM शिंदेंनी केली ‘मिसिंग लिंक’च्या कामाची पाहणी; कोणत्या वाहनांना परवानगी अन् टोल किती?
15
"महिलांना वर्षाला ३६०००, प्रत्येक घुसखोराला हाकलून लावणार अन् TMC..."; पंतप्रधान मोदींची मोठी घोषणा
16
भूषण गवई-धीरेंद्र शास्त्री भेटीवरून टीका, CM फडणवीसांनी सुनावले; म्हणाले, “श्याम मानव कोण?”
17
साई सुदर्शनचा जलवा; ऋतुराजची जिगरबाज खेळी व्यर्थ! चेपॉकच्या मैदानात गुजरातनं उडवला चेन्नईचा धुव्वा
18
जय श्रीराम! आता मुंबईतून अयोध्या गाठणे सुलभ, अमृत भारत ट्रेन सुरू होणार; पाहा, थांबे-वेळा
19
जयपूरच्या राजघराण्यातील 'सुपरकॉम्प्युटर'चा लंडनमध्ये लिलाव; १७व्या शतकातील यंत्र आजही कार्यरत...
20
आता ‘वंदे भारत बुलेट ट्रेन’ येणार, बंगळुरूत बांधणी; ICF-BEMLवर जबाबदारी, रेल्वेची मेगा योजना!
Daily Top 2Weekly Top 5

जिल्ह्याची मुख्य बाजारपेठ बंदच राहणार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 13, 2020 05:00 IST

निवासी उपजिल्हाधिकारी ललितकुमार वऱ्हाडे यांनी ‘लोकमत’ला सांगितले की, बुधवारपासून यवतमाळ शहरासह जिल्हाभरातील मुख्य बाजारपेठेतील सर्व प्रमुख दुकाने बंद राहतील. पाच दुकाने सुरु ठेवण्याचा निकष हा गल्लीबोळातील दुकानांसाठी राहणार आहे. मुख्य बाजारपेठेतील जीवनावश्यक वस्तूंच्या दुकानांना मात्र यातून सूट राहील. प्रशासनाने दिलेल्या वेळापत्रकानुसार ही दुकाने सुरू ठेवता येणार आहे.

ठळक मुद्देपाच दुकानांचा निकष गल्लीबोळासाठी : जीवनावश्यक वस्तूंची दुकाने कायम

लोकमत न्यूज नेटवर्कयवतमाळ : जिल्ह्यातील दुकाने ८ ते २ या वेळात सुरू ठेवण्याचा निर्णय प्रशासनाने घेतला होता. परंतु मंगळवारी खरेदीसाठी प्रचंड गर्दी झाल्याने कोरोनाचा संसर्ग पुन्हा वाढण्याच्या भीतीने हा निर्णय मागे घेण्यात आला आहे.निवासी उपजिल्हाधिकारी ललितकुमार वऱ्हाडे यांनी ‘लोकमत’ला सांगितले की, बुधवारपासून यवतमाळ शहरासह जिल्हाभरातील मुख्य बाजारपेठेतील सर्व प्रमुख दुकाने बंद राहतील. पाच दुकाने सुरु ठेवण्याचा निकष हा गल्लीबोळातील दुकानांसाठी राहणार आहे. मुख्य बाजारपेठेतील जीवनावश्यक वस्तूंच्या दुकानांना मात्र यातून सूट राहील. प्रशासनाने दिलेल्या वेळापत्रकानुसार ही दुकाने सुरू ठेवता येणार आहे. लॉकडाऊन काळात दुकाने केव्हा सुरू करायची, त्याचा वेळ काय याबाबत प्रशासनाकडून सातत्याने आदेशात फेरबदल होत असल्याने यवतमाळ शहर व जिल्हाभरातील व्यापारी, व्यावसायिक व नागरिकांमध्येसुद्धा प्रचंड संभ्रमाची स्थिती आहे. पाच दुकानांबाबतही असाच संभ्रम निर्माण झाला होता. परंतु सायंकाळी निवासी उपजिल्हाधिकारी ललितकुमार वऱ्हांडे यांनी हा संभ्रम दूर करीत पाच दुकानांचा निकष मुख्य बाजारपेठेसाठी नसल्याचे स्पष्ट केले. अर्थात मुख्य बाजारपेठेतील सर्व दुकाने (जीवनावश्यक वस्तू वगळता) बंदच राहणार आहे. बाजारपेठ उघडल्यानंतर अचानक उसळणारी गर्दी हे प्रमुख कारण त्यासाठी प्रशासनाने सांगितले आहे. प्रशासनाच्या या स्पष्टतेमुळे यापूर्वी कोणत्या प्रकारच्या दुकानाला कोणत्या दिवशी सुरु ठेवण्याची मुभा राहील हा मुख्य बाजारपेठेसाठी (गल्लीबोळातील दुकाने वगळता) आदेशही रद्द ठरला. प्रशासनाकडून आदेशात आणखी स्पष्टता अपेक्षित आहे.दूध विक्रीला सकाळी व सायंकाळी मुभादूध विक्रीला पूर्वी केवळ सकाळी ८ ते दुपारी २ या वेळेतच परवानगी होती. आता सकाळी व सायंकाळी दूध विक्री करता येणार आहे. सकाळी ८ ते २ व सायंकाळी ६ ते ८ या वेळेत फिरून विक्री करता येईल.

टॅग्स :corona virusकोरोना वायरस बातम्याMarketबाजार