शहरं
Join us  
Trending Stories
1
"१८ तासांचा प्रवास कशाला? बोलायचं तर थेट फोन करा"; ट्रम्प यांनी रद्द केला पाकिस्तान दौरा
2
होर्मुझमध्ये संघर्ष पेटणार! इराण म्हणाला, 'नाकेबंदी हटवली नाही, तर आता अमेरिकेला प्रत्युत्तर देणार"
3
अभिषेक-ईशानचा शानदार शो! वैभव सूर्यवंशीचं शतक व्यर्थ! RR च्या घरच्या मैदानात SRH नं मारली बाजी
4
वरातीत नाचला अन् जीव गमावला! पुण्यात चुलत भावानेच केला भावाचा गेम; कात्रजमधील हत्येने खळबळ
5
सिंधुदुर्गातील वाहनाना टोल मधून सुट मिळणार; पालकमंत्र्यांचे आश्वासन 
6
Vaibhav Suryavanshi Records : शतक एक, विक्रम अनेक! वैभव सूर्यवंशी अशी कामगिरी करणारा जगातील पहिला फलंदाज
7
इस्लामाबादमधील चर्चेपूर्वीच खळबळ! इराणचा अमेरिकेला सणसणीत टोला; म्हणाले "अब्रू वाचवण्यासाठी.."
8
'गिव्ह मी वन चान्स' फेम Karun Nair ट्रोल! ५ मिनिटांत श्रेयस अय्यरचे २ कॅच सोडले; चर्चा तर होणारच
9
Travel : जणू स्वर्ग पृथ्वीवरच आहे! 'या' व्हॅलीचे सौंदर्य पाहून मसुरी-नैनिताललाही विसरून जाल!
10
Vaibhav Suryavanshi : उत्तुंग फटकेबाजी! १५ वर्षीय वैभव सूर्यवंशीनं ३६ चेंडूत पेश केला शतकी नजराणा
11
लॅपटॉपचा Type-C पोर्ट आहे 'ऑल-इन-वन' बाहुबली; याचे भन्नाट फीचर्स वाचून तुम्हीही थक्क व्हाल
12
भयंकर! अखिलेश यादवांचा पुतळा जाळताना स्फोट; भाजपा आमदार अनुपमा जयस्वाल भाजल्या
13
Raghav Chadha : "घाबरुन नाही, तर हताश होऊन पक्ष सोडला"; राघव चड्ढांनी सांगितलं दिल्लीतील पराभवाचं कारण
14
DC vs PBKS : पंजाब किंग्स इज चेज मास्टर! दिल्ली कॅपिटल्सविरुद्धच्या विजयासह रचला नवा इतिहास
15
ना भांडण, ना ब्रेकअप! Gen Z च्याही पुढे गेली Gen Alpha; खऱ्या प्रेमापेक्षा 'AI गर्लफ्रेंड'ची क्रेझ
16
“तेलंगणने करून दाखवले, महाराष्ट्रात ST महामंडळाचे विलिनीकरण कधी करणार?”; काँग्रेसचा थेट सवाल
17
"महाराष्ट्राच्या व मराठी माणसाच्या उरावर बसवले जात असतील तर...", अमोल मिटकरींचा धीरेंद्र शास्त्रींवर घणाघात
18
बागेश्वर बाबा अडचणीत! शिवप्रेमींच्या भावना दुखावल्या प्रकरणी छत्रपती संभाजीनगरात तक्रार
19
४,४,४,४,४,४! प्रभसिमरन सिंगची तुफान फटकेबाजी; अजिंक्य रहाणे अन् पृथ्वी शॉच्या विक्रमाशी बरोबरी
20
Nithin Kamath : "माझ्या मुलाचा स्क्रीन टाईम दिवसाला फक्त ३० मिनिटं, तरीही..."; नितीन कामथ यांनी व्यक्त केली चिंता
Daily Top 2Weekly Top 5

नगरपरिषदांवर महिलाराज

By admin | Updated: October 6, 2016 00:18 IST

थेट जनतेतून निवडल्या जाणाऱ्या नगराध्यक्षपदाची आरक्षण सोडत आज मुंबईत निघाली.

दहापैकी सात महिला : राजकीय पक्षांच्या व्यूहरचनेला प्रारंभयवतमाळ : थेट जनतेतून निवडल्या जाणाऱ्या नगराध्यक्षपदाची आरक्षण सोडत आज मुंबईत निघाली. जिल्ह्यातील १० पैकी सात ठिकाणी नगराध्यक्षपद महिलांसाठी आरक्षित झाले. त्यामुळे गत काही महिन्यांपासून गुडघ्याला बाशिंग बांधून असलेल्या इच्छुकांचा चांगलाच हिरमोड झाला. जिल्ह्यातील केवळ वणीचे नगराध्यक्षपद खुले असल्याने इच्छुकांच्या उड्या पडणार आहे, तर पांढरकवडा आणि नेर नगरपरिषदेची निवडणूक पुढील टप्प्यात होणार आहे. येत्या नोव्हेंबर-डिसेंबरमध्ये नेर आणि पांढरकवडा वगळता यवतमाळ, पुसद, दिग्रस, वणी, घाटंजी, दारव्हा, उमरखेड आणि आर्णी येथे सार्वत्रिक निवडणूक होत आहे. यावेळी थेट जनतेतून नगराध्यक्ष निवडला जाणार आहे. त्यामुळे सर्वांनाच नगराध्यक्षपदाचे औत्सुक्य होते. मात्र अद्याप आरक्षण जाहीर न झाल्याने सर्वच इच्छुक ताटकळत होते. बुधवारी मुंबईत ही आरक्षण सोडत जाहीर करण्यात आली. त्यात महिलांनी बाजी मारली. निवडणूक होणाऱ्या आठ नगरपरिषदांसह नेर आणि पांढरकवडा येथील नगराध्यक्ष पदाचेही आरक्षण यावेळी जाहीर करण्यात आले. आरक्षणात दहापैकी सात ठिकाणी आता नगराध्यक्षपदी महिला विराजमान होणार आहे. लगेच निवडणूक होणाऱ्या आठपैकी पाच ठिकाणी महिलांना संधी मिळणार आहे. केवळ वणी, दारव्हा आणि उमरखेड येथेच पुरूषांना लढता येणार आहे. त्यात दारव्हा व उमरखेड येथील नगराध्यक्षपद अनुसूचित जातीसाठी आरक्षित झाले आहे. वणी येथील नगराध्यपद खुले आहे. तेथे गेली पाच वर्षे महिलांनाच संधी मिळाली होती. आता पुरूषांनाही लढता येणार आहे.यवतमाळच्या नगराध्यक्ष पदावर अनेकांचा डोळा होता. केवळ त्यांना आरक्षण जाहीर होण्याची प्रतीक्षा होती. मात्र येथील नगराध्यक्षपद खुल्या प्रवर्गातील महिलेसाठी आरक्षित झाल्याने अनेक पक्षांना उमेदवारांची शोधाशोध करावी लागणार आहे. पुसद आणि घाटंजी येथील नगराध्यक्ष पदही खुल्या प्रवर्गातील महिलेसाठी आरक्षित झाले आहे. दिग्रसचे नगराध्यक्षपद नागरिकांच्या मागास प्रवर्गातील महिलेसाठी, तर आर्णीचे नगराध्यक्षपद अनुसूचित जमातीच्या महिलेसाठी आरक्षित झाले आहे. याशिवाय पुढील टप्प्यात निवडणूक होणाऱ्या नेर आणि पांढरकवडा येथील नगराध्यक्षपद खुल्या प्रवर्गातील महिलेसाठी आरक्षित ठेवण्यात आले आहे. दिवसभर आरक्षणाच्या विषयावरच सर्वत्र चर्चा दिसत होती. (शहर प्रतिनिधी)इच्छुकांचा झाला हिरमोडनिवडणूक होऊ घातलेल्या आठ नगरपरिषदांमध्ये अनेक इच्छुकांनी कंबर कसली होती. मात्र आरक्षणाने त्यांचा हिरमोड झाला. यवतमाळात विद्यमान नगराध्यक्ष सुभाष राय यांच्यासह माजी नगराध्यक्ष बाळासाहेब चौधरी, जिल्हा परिषदेचे माजी सदस्य अरूण राऊत आदींनी निवडणूक लढविण्याची तयारी दर्शविली होती. मात्र आरक्षणाने त्यांना झटका बसला. नगराध्यक्षपद महिलेसाठी आरक्षित झाल्याने आता सर्वच पक्षांना महिला उमेदवारांची शोधाशोध करावी लागणार आहे. दारव्हा येथे नगरपरिषद स्थापनेपासून प्रथमच अनुसूचित जातीसाठी पद आरक्षित झाल्याने समीकरण बिघडणार आहे. मात्र अनुसूचित जाती प्रवर्गातील इच्छुकांमध्ये उत्साह संचारला आहे. या आरक्षणामुळे राजकीय पक्षांनाही नव्याने व्यूहरचना करावी लागणार आहे.