शहरं
Join us  
Trending Stories
1
‘धर्मांतरासारखे प्रकार खपवून घेऊ नका’ मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचे पोलिसांना कडक निर्देश
2
Air Travel Rules: ...तर ‘त्या’ प्रवाशांना विमानात ‘नो एन्ट्री’, नव्या नियमांचा मसुदा तयार!
3
आजचे राशीभविष्य, १९ एप्रिल २०२६: शारीरिक व मानसिक आरोग्य उत्तम राहील, आर्थिक बाबीत सावध राहा!
4
आयत्या पिठावर रेघोट्या मारून राजकारण होत नाही; जनतेची कामे करा: एकनाथ शिंदे
5
Gold Rates: सोन्याचे दर खाली घसरतील की आणखी चढतील?
6
Supreme Court: घर मालकीहक्काचा निर्णय सोसायटी घेऊ शकत नाही : उच्च न्यायालय
7
Maharashtra Weather: अलर्ट! राज्यावर दुहेरी संकट, कडक उन्हासोबत अवकाळी पावसाचा शक्यता
8
जबरदस्तीने फोटो काढून अत्याचार अन् धर्मांतरास प्रवृत्त केल्याचा आरोप;  पंचवटी पोलिसांची मोठी कारवाई
9
केंद्रीय कर्मचाऱ्यांना गुड न्यूज; महागाई भत्ता २ टक्के वाढला; पेन्शनरांनाही होणार लाभ 
10
मुंबईत यकृत प्रत्यारोपणासाठी ८३७ रुग्ण वेटिंगवर, अवयवदानाबाबत पुन्हा जागरुकतेची आवश्यकता
11
Rahul Gandhi: ‘भारताचा आत्मा वाचवण्यासाठीच विधेयक रोखले!’- राहुल गांधी
12
खेळण्यातील कारचा वापर करून हल्ल्याचा कट, ४ संशयित दहशतवाद्यांना अटक
13
PM Modi: महिला आरक्षण रोखून विरोधकांनी पाप केले; त्यांना शिक्षा मिळणारच: पंतप्रधान मोदी
14
Iran fires on Indian ships: होर्मुजच्या सामुद्रधुनीमध्ये भारतीय जहाजांवर गोळीबार; इराणचे पुन्हा निर्बंध 
15
मोठी अपडेट! गोळीबारात एक जहाज होर्मुझमधून निसटले, इराणने भारताची १४ जहाजे रोखलेली
16
IPL 2026 : मलिंगाचा भेदक मारा; महागडा प्रफुलही शेवटी चमकला! CSK ला रोखत SRH नं मैदान मारलं
17
हा तर डिस्ट्रेस एड्रेस! पंतप्रधान मोदींच्या संबोधनावर काँग्रेसकडून पलटवार झाला; खर्गे म्हणाले, हताश होऊन पंतप्रधान...
18
आयुष म्हात्रेनं लंगडत लंगडत धाव घेतली; धोका पत्करुन डाव खेळला तोही फसला! पण खरंच याची गरज होती का?
19
भारतीय जहाजांवर हल्ला केल्यानंतर इराणची मोठी घोषणा; आता युद्ध संपेपर्यंत होर्मुझ ताब्यात ठेवणार...
20
"काल आमचे संख्याबळ कमी पडले, पण..."; महिला आरक्षणावरून PM मोदींचा निर्धार
Daily Top 2Weekly Top 5

आर्णीतून साडेआठ लाखांचे दागिने लंपास

By admin | Updated: January 15, 2016 03:09 IST

दोन सराफा दुकानाचे शटर वाकवून चोरट्यांनी सुमारे १८ किलो चांदीचे दागिने आणि सोन्याच्या ५०० बेसर असा...

दोन ज्वेलर्स फोडले : १८ किलो चांदी, ५०० बेसरआर्णी : दोन सराफा दुकानाचे शटर वाकवून चोरट्यांनी सुमारे १८ किलो चांदीचे दागिने आणि सोन्याच्या ५०० बेसर असा आठ लाख ६८ हजार रुपयांचा मुद्देमाल लंपास केल्याची घटना आर्णी येथे गुरुवारी सकाळी उघडकीस आली. लागून असलेली दोन ज्वेलर्स फोडल्याची माहिती शहरात होताच व्यापाऱ्यांमध्ये भीतीचे वातावरण पसरले आहे.येथील डॉ. बाबासाहेब आंबेडकर पुतळा परिसरात रोशनाअली मोहम्मद बैलीम यांचे न्यू साई ज्वेलर्स आणि अमन इस्ताक बैलीम यांचे सरकार ज्वेलर्स ही दोन सराफा दुकाने लागून-लागून आहेत. बुधवारी रात्री नेहमीप्रमाणे दोनही दुकाने बंद करून ते घरी गेले होते. गुरुवारी सकाळी दुकान उघडण्यासाठी आले असता शटर वाकलेले दिसून आले. आतमध्ये बघितले असता दुकानातील दागिन्यांचे डबे अस्ताव्यस्त पडल्याचे आढळून आले. दुसऱ्याही दुकानात हाच प्रकार दिसून आला. न्यू साई ज्वेलर्समधून चोरट्यांनी चांदीच्या तीन किलो मोठ्या पायल, फॅन्सी पायल दोन किलो, चांदीची मोठी तोरडी दोन किलो, चांदी कंगन जोड एक किलो, चांदीचे आकडे ५०० ग्रॅम, करंडी जोड ५०० ग्रॅम, चांदी ब्रासलेट ५०० ग्रॅम, देवी व गणपतीच्या मूर्ती ५०० ग्रॅम, लहान पायल, चांदीचे पेटी, अंगठी, जोडवे, कमरपट्टा, दिवे, ग्लास, चेन, घुंगरू, कानातील रिंग असे विविध प्रकारचे दागिने मिळून १८ किलो ८०० ग्रॅम चांदी लंपास केली. याची किंमत सात लाख ८९ हजार ६०० रुपये आहे. तर सरकार ज्वेलर्समधून सोन्याच्या ५०० नग बेसर, चांदीचा डब्बा, चांदीचे ग्लास, पायपट्टी, चांदीचे कडे, जोडवे, अंगठी आणि नगदी दोन हजार असा ७७ हजार रुपयांचा मुद्देमाल लंपास केला. याप्रकरणी आर्णी पोलीस ठाण्यात तक्रार दाखल करण्यात आली आहे. या चोरीने शहरात खळबळ उडाली असून आर्णी पोलीस चोरट्यांचा शोध घेत आहे. (शहर प्रतिनिधी)