शहरं
Join us  
Trending Stories
1
Vaibhav Suryavanshi : फक्त १६ चेंडू खेळला अन् हवा करून गेला! वर्ल्ड रेकॉर्ड थोडक्यात हुकला, पण...
2
मोठी बातमी : भाजपचं धक्कातंत्र! विधान परिषद निवडणुकीसाठी ५ जणांची यादी जाहीर, कुणाला मिळाली संधी?
3
नांदेड विमानतळ परिसरात ‘गूढ गोलाकार वस्तू’! उडती तबकडी की साधा बलून?
4
पोलीस आयुक्तांचा धडाकेबाज निर्णय, एकाच दिवसात ४० शस्त्र परवाने रद्द 
5
मंत्री उदय सामंत अंतरवाली सराटीत मनोज जरांगे यांच्या भेटीला, एक तास चर्चा; कारण काय?
6
बाबासाहेबांनी ध्वनी प्रदूषणाचे कधीच समर्थन केले नसते, हायकोर्टाने समाजाला विचार व तत्वज्ञानाची जाणिव करून दिली
7
निवडणूक संपताच पेट्रोल-डिझेल महागणार? केंद्र सरकारनं दिलं मोठं स्पष्टीकरण! काय होणार?
8
नागपूर भाजप शहराध्यक्ष तिवारींचा मोबाईल हॅक, आरोपींकडून लोकांना पैशांची मागणी
9
PBKS vs RR : वैभव-यशस्वीचा धमाका; फरेरा-दुबेचा फिनिशिंग टच! राजस्थानने रोखला पंजाबचा विजयरथ
10
भाजपचे धक्कातंत्र, विदर्भातून प्रस्थापितांऐवजी सहकारतज्ज्ञ संजय भेंडेंना संधी; ‘मायक्रो प्लॅनर’ म्हणून आहे ओळख
11
१ मे पासून खिशाला कात्री! बँकिंगसह 'हे' मोठे नियम बदलणार; गॅस सिलिंडर स्वस्त होणार की महागणार?
12
PBKS vs RR : 'वंडर बॉय' वैभव सूर्यवंशीनं धु धु धुतलं! मग अर्शदीपनं लो फुलटॉसवर हिशोब केला चुकता
13
‘मुंबई-पुणे एक्स्प्रेस वे’ मिसिंग लिंकवर किती स्पीडने जाता येणार?; वेगमर्यादेची नियमावली आली!
14
विदर्भात १ मे पर्यंत पावसाळी ढग; पारा खाली येणार, पण उष्णतेची तीव्रता कायम राहणार
15
गुजरातमध्ये BJPचा डंका! १५ महानगरपालिकांवर कमळ फुलले; आप-काँग्रेस आपटले, कुणाला किती जागा?
16
PBKS vs RR: परफेक्ट सेटअप! १५० kmph वेगवान चेंडूसह पुन्हा प्रियांश आर्यवर भारी पडला जोफ्रा (VIDEO)
17
"हे 'सेल्फ रेडिकलायझेशन'चं प्रकरण, जिहाद करायचा म्हणजे..."; मिरा रोड हल्ल्यासंदर्भात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस स्पष्टच बोलले
18
इराण-अमेरिका युद्धात UAE चा मोठा निर्णय; OPEC आणि OPEC+ गटातून बाहेर पडणार
19
म्हाडाच्या २६४० घरांच्या लॉटरीला मुदतवाढ; १४ मे पर्यंत अर्ज सादर करण्याची मुदत
20
१३६३५७ घन मीटर क्षमता, गायब होते LNG टँकर जहाज; अचानक भारताजवळ दिसले, महिनाभर कुठे होते?
Daily Top 2Weekly Top 5

पुणे, मुंबईतून आलेल्या तीन हजार नागरिकांवर नजर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 25, 2020 05:01 IST

पुणे आणि मुंबईतून आतापर्यंत ३ हजार नागरिक जिल्ह्यात परतले आहेत. हा आकडा १० हजारांच्या आसपास जाण्याचा अंदाज आहे. शिक्षण आणि नोकरीच्या शोधात गेलेले हे नागरिक गावात परतत आहेत. आता त्यांनी इतरत्र न फिरण्याच्या सूचना जिल्हाधिकाऱ्यांनी दिल्या असून त्यांच्यावर लक्ष ठेवण्याचे निर्देश पोलीस पाटलांना दिले आहेत. त्यांच्यावर २४ तास पाळत ठेवली जाणार आहे. त्यांच्यात कोरोनाचे लक्षण दिसले तर तत्काळ आरोग्य यंत्रणेशी संपर्क साधण्याच्या सूचना आहेत.

ठळक मुद्देसंख्या दहा हजारांवर असण्याची शक्यता : ग्रामीण भागात शोध घेण्यासाठी दोन हजार पथकांची निर्मिती

लोकमत न्यूज नेटवर्कयवतमाळ : पुणे, मुंबईत कोरोनाचा फैलाव वाढला आहे. या भागातून आता नागरिकांचे लोेंढे स्वगृही यवतमाळ जिल्ह्यात परतत आहेत. या नागरिकांमध्ये कोरोनाची लक्षणे दिसण्याची दाट शक्यता आहे. यामुुळे परजिल्ह्यातून येणाऱ्या नागरिकांवर पाळत ठेवण्याचे आदेश जिल्हाधिकारी एम. डी. सिंह यांनी प्रशासनाला दिले आहे.पुणे आणि मुंबईतून आतापर्यंत ३ हजार नागरिक जिल्ह्यात परतले आहेत. हा आकडा १० हजारांच्या आसपास जाण्याचा अंदाज आहे. शिक्षण आणि नोकरीच्या शोधात गेलेले हे नागरिक गावात परतत आहेत. आता त्यांनी इतरत्र न फिरण्याच्या सूचना जिल्हाधिकाऱ्यांनी दिल्या असून त्यांच्यावर लक्ष ठेवण्याचे निर्देश पोलीस पाटलांना दिले आहेत. त्यांच्यावर २४ तास पाळत ठेवली जाणार आहे. त्यांच्यात कोरोनाचे लक्षण दिसले तर तत्काळ आरोग्य यंत्रणेशी संपर्क साधण्याच्या सूचना आहेत.त्या दृष्टीेने आरोग्य विभागाची यंत्रणाही सर्वेक्षणासाठी उतरली आहे. गावपातळीवर बाहेर ठिकाणावरून येणाºया नागरिकांची आकडेवारी गोळा केली जात आहे. आर्णीमध्ये दोन हजार ३३४ आणि महागाव तालुक्यात एक हजार ४४ नागरिकांची नोंद आरोग्य विभागाने केली आहे. यातील काही नागरिकांची आरोग्य तपासणी झाली आहे.आरोग्य विभागाने हाती घेतलेल्या सर्वेक्षणात आशा, अंगणवाडीताई, आरोग्य विभागाचे कर्मचारी आहेत. यासोबतच गावात कोण आले आणि त्यांच्या प्रकृती कशी आहे, यावर पोलीस पाटील पाळत ठेवणार आहे. त्याकरिता दोन हजार पथकांची निर्मिती केली आहे.सर्वेक्षणादरम्यान कोरोनाशी संबंधित ‘ट्रॅव्हल हिस्ट्री’ आढळल्यास तशा व्यक्तींची माहिती तत्काळ तालुका यंत्रणेकडे पाठविली जात आहे. अशा व्यक्तीशी वैद्यकीय अधिकारी संपर्क करतात आणि त्यांची तपासणी करून गावातच क्वारंटाईन करण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत. यामध्ये तालुका स्तरावर आयसोलेशन वॉर्ड आणि फॅसिलेटेड क्वारंटाईन केंद्र तयार करण्यात आले आहे. या ठिकाणी अशा व्यक्तींची व्यवस्था करण्यात येणार आहे. परदेशातून आले १६० नागरिकजिल्ह्यात परदेशातून आलेल्या नागरिकांची संख्या १६० झाली आहे. आता विमानसेवाच ठप्प झाल्याने ही संख्या सध्याच वाढण्याची शक्यता नाही. या सर्वांना आरोग्य विभागाच्या यंत्रणेने क्वारंटाईन केले आहे. त्यांच्या हातावर शिक्का मारण्यात आला आहे. परजिल्ह्यातून आलेल्या व्यक्तींच्या हातावर क्वारंटाईनचा शिक्का राहणार नसल्याचे स्पष्ट करण्यात आले आहे.क्वारंटाईन नागरिकांची संख्या १०५ वरजिल्ह्यात क्वारंटाईन व्यक्तींची संख्या १०५ वर पोहचली आहे. आयसोलेशन वॉर्डातील ६ पैकी दोन व्यक्तींना आता सुटी देण्यात आली. तर आयसोलेशन वॉर्डात नव्याने दोन व्यक्ती समाविष्ट झाल्या आहेत. यामुळे आयसोलेशन वॉर्डातील व्यक्तींची संख्या पुन्हा सहावर पोहचली आहे. तीन पॉझिटिव्ह रूग्णांच्या प्रकृतीत सुधारणा होत आहे. तर ६२ व्यक्तींना घरी सोडण्यात आले आहे.४९ व्यक्तींवर फौजदारी कारवाईसंचारबंदीनंतरही गावात फिरणाऱ्या व्यक्ती आढळल्या. अत्यावश्यक सेवेव्यतिरिक्तची दुकाने उघडल्या गेलीत. काही ठिकाणी दारू आणि खर्रा विक्री करताना व्यावसायिक आढळले. अशा ४९ व्यक्तींवर फौजदारी कारवाई करण्यात आली.संचारबंदी असूनही बाजारात गर्दीअत्यावश्यक वस्तू आणण्याच्या नावाखाली नागरिकांनी बाजारात गर्दी केल्याचे चित्र मंगळवारी पहायला मिळाले. दुपारपर्यंत हे चित्र कायम होते. दुपारनंतर पोलिसांनी अशा नागरिकांना चोप देणे सुरू केले. त्यानंतर बाजारपेठेतील गर्दी कमी झाली.प्रत्यक्ष दराच्या तीनपट अधिक एमआरपीकोरोनाच्या दहशतीमुळे मास्क, सॅनिटायझर विक्री वाढली असून काही ठिकाणी त्यातही लूट सुरू आहे. अनेक ठिकाणी सॅनिटायझरच्या बॉटलवर १७५ रुपये एमआरपी नमूद आहे. प्रत्यक्षात ही बॉटल अवघ्या ५० रुपयात विकली गेली. यावरून किंमतीच्या दोन ते तीनपट अधिक एमआरपी मालावर नमूद केली जात असल्याचे स्पष्ट होते. हे सॅनिटायझर बनावट तर नाही ना अशी शंकाही व्यक्त केली जाऊ लागली आहे. अनेक ठिकाणी सॅनिटायझरचा साठा संपला आहे. ही कृत्रिम टंचाई निर्माण केली गेली असण्याची शक्यताही वर्तविली जात आहे.

टॅग्स :corona virusकोरोना वायरस बातम्या