शहरं
Join us  
Trending Stories
1
‘टाइम’च्या यादीत सुंदर पिचाई, विकास खन्नांसह रणबीर कपूर, डोनाल्ड ट्रम्प, पोप लिओ, जिनपिंग यांचा समावेश
2
कायदा माहीत नव्हता, या सबबीवर आयटीआर न भरण्याच्या विलंबला माफी मिळणार नाही !
3
लेबनाॅन, इस्रायलदरम्यान ४० वर्षांनंतर शांतता चर्चा, दोन्ही देशांमध्ये अद्याप करार झाला नसल्याचे अमेरिकेने केले स्पष्ट
4
‘एनसीए’मध्ये जायला खेळाडू घाबरतात, मुनाफ पटेलचे खळबळजनक विधान
5
आरोग्य, निसर्ग संवर्धनासह ९ सामूहिक प्रतिज्ञा करा, नरेंद्र माेदींचं आवाहन
6
खासदार राघव चड्ढा यांची 'झेड प्लस' सुरक्षा हटवली
7
तुर्कस्थानातील शाळेत विद्यार्थ्याचा गोळीबार; ९ जण ठार
8
अनिल अंबानी प्रकरणात मोठी घडामोड! विश्वासू सहकाऱ्याला ईडीने ठोकल्या बेड्या
9
जागतिक व्यापारावर टांगती तलवार! इराणची तिन्ही समुद्र मार्ग बंद करण्याची धमकी; अमेरिकेच्या नाकेबंदीला नाकेबंदीनेच उत्तर
10
IPL 2026: भुवीसह रसीखला 'सलाम'! विराटची 'इम्पॅक्टफुल' खेळी; LSG ला पराभूत करत RCB टॉपला
11
देशाला अंधारात बुडवून मुनीर इराणला, शाहबाज सौदीला...! पाकिस्तान सरकारने मागितली जनतेची माफी...
12
१०० टक्के फिट नसतानाही जबरदस्त इम्पॅक्ट; पण किंग कोहलीचं अर्धशतक हुकल्यावर अनुष्काचा चेहरा पडला
13
धक्कादायक! 'बॉडी मसाज'च्या नावाखाली अंगावर नाचला; लातूरमध्ये तरुणाचा मणका सरकला, एकावर गुन्हा दाखल
14
वाराणसीत स्मार्ट मीटरचा कहर! २ युनिट वापराचे आले २००० बिल; दाद मागणाऱ्याची वीजच कापली, ग्रामीण भागातील जनता संतप्त
15
IPL 2026 Catch of Tournament : लढवय्या पंतसमोर सॉल्टचा रुबाब! अफलातून झेलसह लुटली मैफील (VIDEO)
16
Pune Water Supply: पुणे शहरात गुरुवारी पाणी येणार; टँकर चालकांच्या संपामुळे 'पाणीपुरवठा बंद' पुढे ढकलला
17
'इराण आणि अमेरिकेमध्ये चर्चा सुरू आहे का, पाकिस्तानची आता भूमिका काय?', परराष्ट्र मंत्र्यांनी दिले उत्तर
18
इराणचे जहाज अचानक गुजरातच्या किनाऱ्यावर! भारतीय रिफायनरींचा तेल खरेदीस नकार; काय आहे नेमके कारण?
19
इराणवर हल्ला केला अन् अंदाज चुकला, "अपेक्षाच केली नव्हती...", ट्रम्प यांचा खळबळजनक दावा
20
Rishabh Pant Injured : अरे देवा; हे काय घडलं? हेजलवूडच्या वेगवान चेंडूवर रिषभ पंत जायबंदी; मैदान सोडण्याची आली वेळ
Daily Top 2Weekly Top 5

आयुष्य ‘लाॅक’; पेट्रोल दरवाढ ‘अनलाॅक’

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 15, 2021 05:00 IST

गत ३० वर्षांमध्ये पेट्रोलने शंभरी गाठली आहे. जागतिक बाजारात वाढलेले दर, त्यावर लागणारा वॅट आणि विविध सेस यामुळे केंद्र शासनाने निर्धारित केलेल्या एकूण दरावर प्रभाव पडून पेट्रोलच्या किमती वाढल्या आहे. यामुळे पेट्रोलच्या दरावर आर्थिक बोजा पडून याच्या किमती १०० रुपयापर्यंत जाऊन पोहोचल्या आहे. हे दर केंद्र शासन आणि राज्य शासनाने सध्याच्या काळात तरी नियंत्रणात आणायची नितांत आवश्यकता आहे.

ठळक मुद्दे३० वर्षांत लीटरमागे ८६ रुपयांची वाढ !

लोकमत न्यूज नेटवर्कयवतमाळ : जागतिक बाजारात पेट्रोल आणि डिझेलच्या किमती काही प्रमाणात वाढल्या. मात्र, त्यावर टॅक्सच मोठ्या प्रमाणात आकारले जात आहे. यामधून पेट्रोलच्या किमती आणि डिझेलच्याही किमती वाढत आहे. गेल्या ३० वर्षांमध्ये या दरामध्ये ८६ रुपयांची दरवाढ झाली आहे. महागाईचा हा आकडा सर्वसामान्यांना परवडणारा नाही. आता गाडी चालविताना चार वेळेस विचार करावा लागतो. यापेक्षा सायकल चालविलेली बरी, असे म्हणण्याची वेळ अनेकांवर आली आहे. वाढत्या किमती नियंत्रणात न ठेवल्याने महागाईचा सामना सर्वसामान्यांना करावा लागत आहे. यानंतरही केंद्र शासन आणि राज्य शासन याबाबत कुठलाही निर्णय घेताना दिसत नाही. यामधून सर्वसामान्यांनाच मार्ग काढावा लागत आहे. १०० रुपयांवर पेट्रोल गेल्याने अनेकांना धक्का बसला आहे.

तेलाच्या किमतीपेक्षा टॅक्स जास्तगत ३० वर्षांमध्ये पेट्रोलने शंभरी गाठली आहे. जागतिक बाजारात वाढलेले दर, त्यावर लागणारा वॅट आणि विविध सेस यामुळे केंद्र शासनाने निर्धारित केलेल्या एकूण दरावर प्रभाव पडून पेट्रोलच्या किमती वाढल्या आहे. यामुळे पेट्रोलच्या दरावर आर्थिक बोजा पडून याच्या किमती १०० रुपयापर्यंत जाऊन पोहोचल्या आहे. हे दर केंद्र शासन आणि राज्य शासनाने सध्याच्या काळात तरी नियंत्रणात आणायची नितांत आवश्यकता आहे.

पुन्हा सायकलवर फिरावे लागणार

केंद्र शासनाने तेलाच्या किमती नियंत्रित करण्याची नितांत आवश्यकता आहे. सर्वच बाजूने महागाई वाढत आहे. अशा परिस्थितीत पेट्रोलचे दर वाढल्याने सर्वसामान्यांना गाडी चालविताच येणार नाही. अशामध्ये सायकलच चालवायची का? - जितेश नवाडे

वाढलेल्या पेट्रोलच्या दराने सर्वसामान्य नागरिकांचे कंबरडे मोडले आहे. अनेकांना लाॅकडाऊन असल्यामुळे या दरवाढीची कल्पनाच नाही. वाढत्या महागाईत पेट्रोलचे वाढते दर चिंताजनक आहे. यावर केंद्र शासनाने नियंत्रण ठेवायला हवे. - काैस्तुभ शिर्के

लाॅकडाऊनने रोजगार गेला. महागाईने खिशात होते-नव्हते सर्व पैसे खर्च झाले. आता घर चालवायचे कसे हा प्रश्न आहे. पेट्रोल घेण्यासाठी कर्ज काढावे लागण्याची वेळ आहे. केंद्र आणि राज्य शासनाने वाढलेल्या दराची जबाबदारी घेऊन सर्वसामान्यांना दिलासा द्यायला हवा, तरच जगणे सुकर होईल.- आशिष सोमण

 

टॅग्स :Petrolपेट्रोल