शहरं
Join us  
Trending Stories
1
मोठी अपडेट! गोळीबारात एक जहाज होर्मुझमधून निसटले, इराणने भारताची १४ जहाजे रोखलेली
2
हा तर डिस्ट्रेस एड्रेस! पंतप्रधान मोदींच्या संबोधनावर काँग्रेसकडून पलटवार झाला; खर्गे म्हणाले, हताश होऊन पंतप्रधान...
3
आयुष म्हात्रेनं लंगडत लंगडत धाव घेतली; धोका पत्करुन डाव खेळला तोही फसला! पण खरंच याची गरज होती का?
4
भारतीय जहाजांवर हल्ला केल्यानंतर इराणची मोठी घोषणा; आता युद्ध संपेपर्यंत होर्मुझ ताब्यात ठेवणार...
5
"काल आमचे संख्याबळ कमी पडले, पण..."; महिला आरक्षणावरून PM मोदींचा निर्धार
6
संजू सॅमसनमध्ये दिसली MS धोनीची झलक; यशस्वी रिव्ह्यूसह CSK ला मिळवून दिली अभिषेकची विकेट
7
"स्त्री सर्व काही विसरू शकते, पण...!" महिला आरक्षण विधेयक पाडल्यावरून पंतप्रधान मोदी संतापले, भ्रूण हत्या संबोधले
8
"तुम्हीच परवानगी दिली आणि आता गोळीबार करताय?" भारतीय कॅप्टनचा इराणच्या नेव्हीकडून विश्वासघात,रेडिओवरील थरार समोर
9
Abhishek Sharma Fastest Fifty : अभिषेकची वादळी खेळी! रैना, ईशानला मागे टाकत वैभव सूर्यवंशीची बरोबरी
10
"विरोधकांनी राजकारण करून विधेयक मंजूर होऊ दिले नाही...", महिला आरक्षणावरून पंतप्रधान मोदींची टीका
11
'जग अर्णव' थोडक्यात बचावले; भारत संतापला, इराणच्या राजदूताला बजावले समन्स
12
IPL 2026 : मिलरचा किलर फिनिशिंग टच! RCB विरुद्धच्या रंगतदार सामन्यात DC नं अखेरच्या षटकात मारली बाजी
13
Akshaya Tritiya 2026 Wishes: अक्षय्य तृतीयेच्या हार्दिक शुभेच्छा, मराठी Messages, Images, Whatsapp Status शेअर करत साजरा करा अक्षय्य तृतीयेचा सण
14
"मम्मी, मी पास झाले..."; दहावी पास होताच लेकीने आईला केला फोन; Video पाहून व्हाल भावुक
15
इराणकडून भारतीय जहाजांवरच गोळीबार? टँकर VLCC माघारी परतला, होर्मुझमध्ये काय घडले...
16
कर्नाटकात 'बर्ड फ्लू'चा शिरकाव! बेंगळुरूमधील पोल्ट्री फार्ममध्ये H5N1 विषाणूचा प्रादुर्भाव; हजारो कोंबड्यांना पुरले
17
राज्यात 20 ते 22 एप्रिल दरम्यान वादळी पावसाची शक्यता, 'या' जिल्ह्यांना इशारा, शेतकऱ्यांना आवाहन 
18
"अभी तो मैं जवान हूँ..." फिटनेस किंग कोहलीची कमाल! २१ मीटर धावत येऊन KL राहुलच्या खेळीला लावला ब्रेक
19
क्रूरतेचा कळस! सख्ख्या भावावर कुऱ्हाडीने वार; मृतदेहाचे केले ९ तुकडे, थरकाप उडवणारी घटना
20
मोठी कारवाई! नोएडा हिंसाचार प्रकरणातील मास्टरमाइंड आदित्य आनंदला तामिळनाडूतून अटक
Daily Top 2Weekly Top 5

जीवन प्राधिकरणात निविदांशिवाय कामे

By admin | Updated: August 31, 2015 02:15 IST

आवश्यक त्याचवेळी आणि अधिकाराच्या मर्यादेतच निविदांशिवाय कामे करण्याची मुभा आहे.

भ्रष्टाचाराला प्रोत्साहन : अधिकाऱ्यांकडून लावली जात आहे नियमाला वाटयवतमाळ : आवश्यक त्याचवेळी आणि अधिकाराच्या मर्यादेतच निविदांशिवाय कामे करण्याची मुभा आहे. असे असताना महाराष्ट्र जीवन प्राधिकरणाच्या येथील कार्यालयाने हे सर्व नियम पायदळी तुडवत कामे करण्याचा सपाटा लावला आहे. या प्रकारात भ्रष्टाचाराला वाव मिळत आहे. मात्र वरिष्ठ अधिकारीच नियम तोडत असल्याने आवर घालणार कोण, हा प्रश्न निर्माण झाला आहे. कोट्यवधी रुपयांची वसुली थकीत असल्याने महाराष्ट्र जीवन प्राधिकरणाची आर्थिक स्थिती दयनीय झाली आहे. अशा स्थितीत विकासाची कामे बाजूला ठेवली जात आहे. परंतु काही कामांसाठी या विभागाने हात मोकळे सोडले आहे. कुठल्याही प्रकारच्या निविदा न काढता मर्जीतील लोकांना कामे वाटप केली जात आहे. अर्थात हा आकडा खूप मोठा नसला तरी पाच लाखांपर्यंतचा निश्चितच आहे. अत्यंत गरजेच्यावेळी केवळ २५ हजार रुपये खर्च करण्याचा अधिकार स्थानिक पातळीवरील अधिकाऱ्यांना आहे. तर दुसरीकडे चार ते पाच लाख रुपयांची कामे आणि तीही अतिआवश्यक नसताना निविदांशिवाय वाटली जात आहे. शहरात नळासंबंधीचा प्रश्न निर्माण झाल्यास खर्चाचा अधिकार नाही, अशी ओरड केली जाते. तर दुसरीकडे लाखो रुपयांची कामे काढली जात आहे. अलिकडेच या विभागाने कार्यालयाच्या आवारातील विविध कामे हाती घेतली. ही कामे किती रकमेत करावी, याचा कुठलाही करार केला नाही. जेवढी रक्कम लागेल तेवढी मंजूर करू, या मुद्यावर काम हाती घेण्यात आले. सदर काम सोपविताना कुठलीही स्पर्धा झाली नाही. एकाच व्यक्तीकडे काम देण्यात आले. त्यामुळे यासाठी संबंधित कंत्राटदाराच्या मनमानीनुसार खर्च मंजूर केला जाणार असल्याचे सांगण्यात येते. निविदा मागविल्या असत्या तर निश्चितच प्राधिकरणाच्या तिजोरीतील काही रक्कम वाचली असती. पण अधिकारीच यासाठी फारसे इच्छुक नसल्याने शासकीय प्रक्रिया डावलून कामे वाटण्यात आली. आता या प्रकरणी वरिष्ठस्तरावरून चौकशी केली जाणार असल्याची माहिती आहे. यावर काय कारवाई होते याकडे लक्ष लागले आहे. (वार्ताहर)