शहरं
Join us  
Trending Stories
1
"१८ तासांचा प्रवास कशाला? बोलायचं तर थेट फोन करा"; ट्रम्प यांनी रद्द केला पाकिस्तान दौरा
2
होर्मुझमध्ये संघर्ष पेटणार! इराण म्हणाला, 'नाकेबंदी हटवली नाही, तर आता अमेरिकेला प्रत्युत्तर देणार"
3
अभिषेक-ईशानचा शानदार शो! वैभव सूर्यवंशीचं शतक व्यर्थ! RR च्या घरच्या मैदानात SRH नं मारली बाजी
4
वरातीत नाचला अन् जीव गमावला! पुण्यात चुलत भावानेच केला भावाचा गेम; कात्रजमधील हत्येने खळबळ
5
सिंधुदुर्गातील वाहनाना टोल मधून सुट मिळणार; पालकमंत्र्यांचे आश्वासन 
6
Vaibhav Suryavanshi Records : शतक एक, विक्रम अनेक! वैभव सूर्यवंशी अशी कामगिरी करणारा जगातील पहिला फलंदाज
7
इस्लामाबादमधील चर्चेपूर्वीच खळबळ! इराणचा अमेरिकेला सणसणीत टोला; म्हणाले "अब्रू वाचवण्यासाठी.."
8
'गिव्ह मी वन चान्स' फेम Karun Nair ट्रोल! ५ मिनिटांत श्रेयस अय्यरचे २ कॅच सोडले; चर्चा तर होणारच
9
Travel : जणू स्वर्ग पृथ्वीवरच आहे! 'या' व्हॅलीचे सौंदर्य पाहून मसुरी-नैनिताललाही विसरून जाल!
10
Vaibhav Suryavanshi : उत्तुंग फटकेबाजी! १५ वर्षीय वैभव सूर्यवंशीनं ३६ चेंडूत पेश केला शतकी नजराणा
11
लॅपटॉपचा Type-C पोर्ट आहे 'ऑल-इन-वन' बाहुबली; याचे भन्नाट फीचर्स वाचून तुम्हीही थक्क व्हाल
12
भयंकर! अखिलेश यादवांचा पुतळा जाळताना स्फोट; भाजपा आमदार अनुपमा जयस्वाल भाजल्या
13
Raghav Chadha : "घाबरुन नाही, तर हताश होऊन पक्ष सोडला"; राघव चड्ढांनी सांगितलं दिल्लीतील पराभवाचं कारण
14
DC vs PBKS : पंजाब किंग्स इज चेज मास्टर! दिल्ली कॅपिटल्सविरुद्धच्या विजयासह रचला नवा इतिहास
15
ना भांडण, ना ब्रेकअप! Gen Z च्याही पुढे गेली Gen Alpha; खऱ्या प्रेमापेक्षा 'AI गर्लफ्रेंड'ची क्रेझ
16
“तेलंगणने करून दाखवले, महाराष्ट्रात ST महामंडळाचे विलिनीकरण कधी करणार?”; काँग्रेसचा थेट सवाल
17
"महाराष्ट्राच्या व मराठी माणसाच्या उरावर बसवले जात असतील तर...", अमोल मिटकरींचा धीरेंद्र शास्त्रींवर घणाघात
18
बागेश्वर बाबा अडचणीत! शिवप्रेमींच्या भावना दुखावल्या प्रकरणी छत्रपती संभाजीनगरात तक्रार
19
४,४,४,४,४,४! प्रभसिमरन सिंगची तुफान फटकेबाजी; अजिंक्य रहाणे अन् पृथ्वी शॉच्या विक्रमाशी बरोबरी
20
Nithin Kamath : "माझ्या मुलाचा स्क्रीन टाईम दिवसाला फक्त ३० मिनिटं, तरीही..."; नितीन कामथ यांनी व्यक्त केली चिंता
Daily Top 2Weekly Top 5

पोषण आहाराकडे विद्यार्थ्यांची पाठ

By admin | Updated: May 29, 2015 00:16 IST

शालेय पोषण आहार योजनेंतर्गत शालेय विद्यार्थ्यांना उन्हाळी सुटीमध्येसुद्धा खिचडीचे वितरण व्हायला पाहिजे.

पुसद : शालेय पोषण आहार योजनेंतर्गत शालेय विद्यार्थ्यांना उन्हाळी सुटीमध्येसुद्धा खिचडीचे वितरण व्हायला पाहिजे. शासनाच्या या योजनेचे सध्या तीनतेरा वाजले आहे. शाळेत विद्यार्थीच नाही. त्यामुळे खिचडी खाणार कोण, असा प्रश्न उपस्थित होत आहे.शासन आदेशानुसार जिल्ह्यात सध्या दुष्काळी परिस्थिती असल्यामुळे उन्हाळी सुटीतही मुलांना खिचडीचे वाटप करण्यात यावे, या योजनेची अंमलबजावणी करण्यासाठी शाळांनी नियोजन करून शिक्षकांना जबाबदारी दिली आहे. खिचडीचे वाटप न केल्यास संबंधितांवर कारवाई करण्याचे आदेशही शासनाने दिले.१ मे रोजी परीक्षेचा निकाल लागल्यानंतर विद्यार्थी शाळेत आलेच नाही. मे महिन्याच्या पहिल्या आठवड्यात काही ठिकाणी २० ते ३० टक्के विद्यार्थी उपस्थित होते. मात्र त्यानंतर कोणत्याही शाळेत खिचडी शिजलीच नाही. हे चित्र पुसद तालुक्यात सर्वच ठिकाणी पाहायला मिळते. तर शहरातील शाळांमध्ये परीक्षा संपल्यानंतर विद्यार्थी निकालाच्या दिवशी शाळेत गेले. नंतर त्यांनी मात्र कडाक्याच्या उन्हामुळे शाळेकडे पाठ फिरविली. दीड महिन्यापासून शहरातील शाळांमध्ये खिचडी शिजलीच नाही. ही वस्तुस्थिती आहे. उल्लेखनीय म्हणजे उन्हाळ्याच्या दिवसात विद्यार्थी सुट्यांमुळे शाळेत येत नाही. अनेक विद्यार्थी पालकांसोबत बाहेरगावी जातात. तर कडक उन्हामुळे पालकही मुलांना केवळ खिचडीसाठी शाळेत पाठविणे टाळतात. असे असताना शासनाकडून मात्र विद्यार्थ्यांना खिचडी वाटप करण्याचे आदेश आहे. जिल्ह्यातील दुष्काळी परिस्थिती पाहता शासनाच्या या आदेशाला कोणत्याही शिक्षक संघटनेने विरोध केला नाही. ग्रामपंचायतचे पदाधिकारी, शिक्षण समित्यांचे पदाधिकारी, पंचायत समिती व जिल्हा परिषदेचे लोकप्रतिनिधी यांनीसुद्धा शासनाला वस्तुस्थिती अवगत करून दिली नाही. सध्या परिस्थिती शाळेत विद्यार्थीच नसल्यामुळे खिचडी शिजत नसली तरीदेखील खिचडी शिजविणाऱ्या महिला उपस्थित आहे. जवळपास सर्व शाळांमध्ये खिचडी शिजविण्यासाठी दोन ते तीन महिला नियुक्त केलेल्या आहे. या महिलांना एक ते दोन हजार रुपये महिना द्यावा लागतो. तेव्हा त्यांच्या दोन महिन्यांचे वेतन कोठून आणायचे, हा प्रश्न शिक्षकांसमोर उभा आहे. या महिलांना वेतन द्यायचे असल्यास विद्यार्थ्यांची ३० ते ४० टक्के उपस्थिती असणे अनिवार्य आहे. असे अधिकारीस्तरावर सांगितल्या जाते. जर कुणी चुकीची माहिती देवून वेतन काढले तर त्यावर कारवाई होवू शकते. त्यामुळे आपण विद्यार्थीच नसल्याने त्यांची पटसंख्या शून्य दाखवत असल्याचे शिक्षकांनी सांगितले. (तालुका प्रतिनिधी)