शहरं
Join us  
Trending Stories
1
तुम्हाला राजकारणात मुलं होत नाही, त्यात आमचा दोष काय?; उद्धव ठाकरेंचा घणाघात
2
"स्मृती इराणींना निवडणुकीनंतर गोव्यात पाठवणार, गांधी परिवार कोणाला घाबरत नाही"
3
रिकामे झाले, दुसरीकडे काम, भाजपचा फॉर्म्युला; अनेक नेत्यांना दुसऱ्या मतदारसंघात पाठवले
4
...म्हणून काँग्रेसने राहुल गांधींना अमेठी ऐवजी रायबरेलीतून दिली उमेदवारी, असं आहे मतांचं गणित
5
आरक्षणाची मर्यादा ७३ टक्के करणार, शेतकऱ्यांना कर्जमाफी देऊ; राहुल गांधी यांची पुण्यातील सभेत घोषणा
6
संविधान बदलणार बाेलले अन् पक्षाने तिकीट कापले; विश्वेवर हेगडे-कागेरी यांना उमेदवारी
7
मोबाइल चोरी नाहीच; पण, मृत्यूचे गूढ कायम; विशाल पवार संशयास्पद मृत्यू प्रकरण
8
PPF Vs NPS: रिटायरमेंटसाठी कोणता प्लान ठरेल बेस्ट? 'हे' आहेत पीपीएफ आणि एनपीएसचे फायदे
9
एकनाथ खडसेंच्या प्रवेशाला विरोध कशाला असेल ? वार्तालापात विनाेद तावडे यांनी मांडली भूमिका
10
भाजप अन् काँग्रेससमोर ‘पिंचहिटर’चे आव्हान ; पठाणच्या ‘एन्ट्री’मुळे देशाच्या नजरा
11
Wipro चे संस्थापक अझीम प्रेमजी बँकिंग क्षेत्रात उतरणार; 'या' बँकेतील हिस्सा खरेदी करण्याच्या तयारीत
12
पहिल्या भाषणानंतर बाळासाहेबांनी दिलेला 'तो' सल्ला राज ठाकरेंनी कायम लक्षात ठेवला
13
अमेठीत २५ वर्षांत प्रथमच मैदानात नसेल गांधी घराणे; बालेकिल्ल्यातून काॅंग्रेसने उमेदवार बदलला, भाजप नेत्यांचे टीकास्त्र
14
उद्धव यांच्या आजारपणात मोदी करायचे विचारपूस ; पंतप्रधानांच्या विधानावर राजकीय टोलेबाजी सुरू
15
Akshaya Tritiya 2024: चैत्रगौरीला निरोप देताना कुंकवाची पावलं काढा आणि 'पुनरागमनायच' म्हणा; कारण...
16
खासदारांना डावलून आमदार रिंगणात, नव्या चेहऱ्यांमुळे चुरस; रणनीती ठरणार का यशस्वी?
17
'ही' साऊथ अभिनेत्री, जी प्रेमासाठी बनली वयानं २७ वर्ष मोठ्या असलेल्या माजी CM ची दुसरी पत्नी
18
आजचे राशीभविष्य - ४ मे २०२४; आज आपणास खूप मोठा आर्थिक लाभ होईल
19
रावसाहेब दानवे षटकार मारणार ? जालन्यात चुरशीची लढाई, भाजपचा वरचष्मा; मविआ कमकुवत!
20
तिकीट तर कापले, आता पुनर्वसनाचा प्रश्न, महायुतीने १२ विद्यमान खासदारांना बसवले घरी

गॅस कटरने एटीएम फोडणाऱ्या टोळीचा म्होरक्या जेरबंद

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 14, 2021 5:00 AM

२ ऑक्टोबरला एटीएम फोडल्याची घटना घडल्यानंतर राळेगाव पोलीस व एलसीबीचे पथक कामाला लागले. एलसीबीचे पथकाने शंभर किलोमीटर परिसरातील दुकाने, खासगी निवासस्थान, टोल प्लाझा येथील सीसीटीव्ही कॅमेरांचे फुटेज तपासले. त्यात एक कार क्र.एचआर-५१-बीवाय-४०९६ संशयास्पदरीत्या फिरताना आढळली. दरम्यान कळंब पोलीस ठाण्यात ऑक्सिजन सिलिंडर चोरी गेल्याची तक्रार दाखल झाली. त्यातही त्याच कारचा वापर झाल्याचे निष्पन्न झाले. पोलिसांनी या कारचा माग काढणे सुरू केले.

लोकमत न्यूज नेटवर्कयवतमाळ : राळेगाव येथील बॅंक ऑफ इंडियाचे एटीएम गॅस कटरने फोडून त्यातून आठ लाख ६९ हजार रुपयांची रोख लंपास केली. ही घटना २ ऑक्टोबरला घडली होती. आंतरराज्यीय टोळीच्या म्होरक्याला थेट हरियाणातून रोख रकमेसह पोलिसांनी अटक केली. इतर चार आरोपी पसार झाले आहे. लियाकत अली दिनमोहंमद (४०) रा. पिनगाव ता. पुन्हाना, जि. मुंह, राजस्थान असे अटक करण्यात आलेल्या मास्टर माईंडचे नाव आहे. उत्तर प्रदेश, हरियाणा व राजस्थान या तीन राज्यांत आरोपींचा कसोशीने शोध घेण्यात आला. मात्र उर्वरित सदस्य पसार होण्यात यशस्वी झाले. असा लागला सुगावा २ ऑक्टोबरला एटीएम फोडल्याची घटना घडल्यानंतर राळेगाव पोलीस व एलसीबीचे पथक कामाला लागले. एलसीबीचे पथकाने शंभर किलोमीटर परिसरातील दुकाने, खासगी निवासस्थान, टोल प्लाझा येथील सीसीटीव्ही कॅमेरांचे फुटेज तपासले. त्यात एक कार क्र.एचआर-५१-बीवाय-४०९६ संशयास्पदरीत्या फिरताना आढळली. दरम्यान कळंब पोलीस ठाण्यात ऑक्सिजन सिलिंडर चोरी गेल्याची तक्रार दाखल झाली. त्यातही त्याच कारचा वापर झाल्याचे निष्पन्न झाले. पोलिसांनी या कारचा माग काढणे सुरू केले.  तांत्रिक माहितीच्या सहाय्याने ती कार व चोरी करणारी टोळी हरियाणा राज्यातील असल्याचे निष्पन्न झाले. पोलिसांनी थेट टोल नाक्याचे फुटेज तपासात हरियाणा राज्य गाठले. त्यापूर्वी उत्तर प्रदेश, राजस्थान येथेही आरेापींचा शोध घेतला. त्यातून या टोळीतील मास्टर माईंडला हरियाण पोलिसांच्या मदतीने अटक केली. या टोळीने विविध राज्यामध्ये एटीएम फोडण्याचे गुन्हे केले आहेत. आरोपीकडून रोख एक लाख ५० हजार रोखेसह ११ लाख ६० हजार ५०० रुपयांचा मुद्देमाल जप्त केला. ही कारवाई पोलीस अधीक्षक डॉ. दिलीप पाटील भुजबळ, अपर अधीक्षक डॉ. खंडेराव धरणे, एलसीबीचे निरीक्षक प्रदीप परदेशी, राळेगाव ठाणेदार संजय चौबे, सहायक निरीक्षक अमोल मुडे, गणेश वानरे, उपनिरीक्षक भगवान पायघन, योगेश रंधे, जमादार गोपाल वास्टर, बबलू चव्हाण, सलमान शेख, सुधीर पिदूरकर, सायबर सेलचे सहायक निरीक्षक अमोल पुरी, पंकज गिरी, रोशनी जोगळेकर यांनी ही कारवाई केली. तपास पथकाला बक्षीस - उत्कृष्ट कामगिरी केल्याबद्दल तपास पथकाला ५० हजारांचे रोख बक्षीस, अधिकाऱ्यांना सीनोट्स तर कर्मचाऱ्यांना गुड रिमार्क देण्यात आला. पोलीस अधीक्षकांनी एटीएम संदर्भाने झालेल्या दोन्ही गुन्ह्यांच्या कामगिरीबाबत सायबर सेल व इतर पथकांचे कौतुक केले.

 

टॅग्स :Crime Newsगुन्हेगारीPoliceपोलिस