शहरं
Join us  
Trending Stories
1
मोठी अपडेट! गोळीबारात एक जहाज होर्मुझमधून निसटले, इराणने भारताची १४ जहाजे रोखलेली
2
हा तर डिस्ट्रेस एड्रेस! पंतप्रधान मोदींच्या संबोधनावर काँग्रेसकडून पलटवार झाला; खर्गे म्हणाले, हताश होऊन पंतप्रधान...
3
आयुष म्हात्रेनं लंगडत लंगडत धाव घेतली; धोका पत्करुन डाव खेळला तोही फसला! पण खरंच याची गरज होती का?
4
भारतीय जहाजांवर हल्ला केल्यानंतर इराणची मोठी घोषणा; आता युद्ध संपेपर्यंत होर्मुझ ताब्यात ठेवणार...
5
"काल आमचे संख्याबळ कमी पडले, पण..."; महिला आरक्षणावरून PM मोदींचा निर्धार
6
संजू सॅमसनमध्ये दिसली MS धोनीची झलक; यशस्वी रिव्ह्यूसह CSK ला मिळवून दिली अभिषेकची विकेट
7
"स्त्री सर्व काही विसरू शकते, पण...!" महिला आरक्षण विधेयक पाडल्यावरून पंतप्रधान मोदी संतापले, भ्रूण हत्या संबोधले
8
"तुम्हीच परवानगी दिली आणि आता गोळीबार करताय?" भारतीय कॅप्टनचा इराणच्या नेव्हीकडून विश्वासघात,रेडिओवरील थरार समोर
9
Abhishek Sharma Fastest Fifty : अभिषेकची वादळी खेळी! रैना, ईशानला मागे टाकत वैभव सूर्यवंशीची बरोबरी
10
"विरोधकांनी राजकारण करून विधेयक मंजूर होऊ दिले नाही...", महिला आरक्षणावरून पंतप्रधान मोदींची टीका
11
'जग अर्णव' थोडक्यात बचावले; भारत संतापला, इराणच्या राजदूताला बजावले समन्स
12
IPL 2026 : मिलरचा किलर फिनिशिंग टच! RCB विरुद्धच्या रंगतदार सामन्यात DC नं अखेरच्या षटकात मारली बाजी
13
Akshaya Tritiya 2026 Wishes: अक्षय्य तृतीयेच्या हार्दिक शुभेच्छा, मराठी Messages, Images, Whatsapp Status शेअर करत साजरा करा अक्षय्य तृतीयेचा सण
14
"मम्मी, मी पास झाले..."; दहावी पास होताच लेकीने आईला केला फोन; Video पाहून व्हाल भावुक
15
इराणकडून भारतीय जहाजांवरच गोळीबार? टँकर VLCC माघारी परतला, होर्मुझमध्ये काय घडले...
16
कर्नाटकात 'बर्ड फ्लू'चा शिरकाव! बेंगळुरूमधील पोल्ट्री फार्ममध्ये H5N1 विषाणूचा प्रादुर्भाव; हजारो कोंबड्यांना पुरले
17
राज्यात 20 ते 22 एप्रिल दरम्यान वादळी पावसाची शक्यता, 'या' जिल्ह्यांना इशारा, शेतकऱ्यांना आवाहन 
18
"अभी तो मैं जवान हूँ..." फिटनेस किंग कोहलीची कमाल! २१ मीटर धावत येऊन KL राहुलच्या खेळीला लावला ब्रेक
19
क्रूरतेचा कळस! सख्ख्या भावावर कुऱ्हाडीने वार; मृतदेहाचे केले ९ तुकडे, थरकाप उडवणारी घटना
20
मोठी कारवाई! नोएडा हिंसाचार प्रकरणातील मास्टरमाइंड आदित्य आनंदला तामिळनाडूतून अटक
Daily Top 2Weekly Top 5

जातविहीन समाज व्यवस्थेसाठी कायदा आवश्यक

By admin | Updated: March 2, 2015 02:10 IST

जातविहीन समाज रचना ही डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची संकल्पना होती. तो मानवतेचा लढा होता. जातीच्या बंधनातून मुक्त होण्याचा हा लढा महात्मा फुलेंनी सुरू केला.

यवतमाळ : जातविहीन समाज रचना ही डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची संकल्पना होती. तो मानवतेचा लढा होता. जातीच्या बंधनातून मुक्त होण्याचा हा लढा महात्मा फुलेंनी सुरू केला. तो पुढे शाहू महाराजांनी चालविला आणि त्या लढ्याला बाबासाहेबांनी कायदेशीर स्वरूप दिले, असे मत अ‍ॅड़ प्रकाश आंबेडकर यांनी ‘लोकमत’जवळ व्यक्त केले. पांढरकवडा येथील जनपतकर गुरूजींच्या सत्कार सोहळ््याला आले असता ते यवतमाळातील विश्रामगृहात शनिवारी दुपारी पत्रकारांशी बोलत होते. अ‍ॅड़ आंबेडकर म्हणाले जातीने आम्हाला कधीही प्रतिष्ठा दिली नाही. जोपर्यंत इथल्या जाती नष्ट होत नाही तोपर्यंत हा देश उभा राहू शकत नाही. आपल्याला आता नव्या टप्प्याची सुरूवात करावी लागेल. त्यासाठी येथील जात नष्ट होण्याची गरज आहे. या लढ्याला किती दिवस लागतील हे आपण सांगू शकत नाही. ज्या दिवशी भावनिक बाबासाहेबांबरोबर वैचारिक बाबासाहेब सांगायला प्रारंभ होईल, त्यादिवशी आंबेडकरी चळवळ विकसीत होईल. जातीबाबात बोलताना ते म्हणाले, जातीव्यवस्था आपल्या मनात एवढी भिनली आहे की, जे जातीचे नाहीत त्यांच्या बाबतीत आपण एकतर न्युट्रल राहतो, विराध करतो किंवा व्देष करतो. आज स्वातंत्र्य असले तरी देशबांधवात आपुलकीची भावना दिसत नाही. जातीय राजकीय नेतृत्व संपणार आहे. पार्टीच्या विरोधात भूमिका शेवटचा नेता म्हणून अटलबिहारी वाजपेयींचा उल्लेख करता येईल. राजकीय व्यवस्थेत नव्या पिढीला नव्या सामाजिक आशयाचा अजेंडा मांडायला आम्ही तयार असून, त्यासाठी जात नसावी हे आमचे पहिले पाऊल असेल. कायद्याने स्त्री-पुरूष समान असूनही महिलांनी आज प्रत्येक क्षेत्रात स्वत:ला सिद्ध केले आहे. संशोधन क्षेत्रात खास करून महिलांचा दबदबा आहे. तसेच अ‍ॅथलेटीक्स आणि राजकीय, सामाजिक क्षेत्रातही त्यांचे भरिव योगदान राहिले आहे. अनेक कुटुंबांची ओळख त्या महिलेच्या कतृत्वामुळे आहे. त्यानंतरही पुरूषप्रधान संस्कृतीमुळे पाल्यांना बापाचीच जात लावली जाते. प्रेमविवाह करणाऱ्या मुलांसाठी जातीचा कॉलम वगळण्यात यावा. राष्ट्रीय स्वयंसेवक संघ, विश्व हिंदू परिषद, बजरंग दल इत्यादी संघटनांनीही या प्रश्नावर स्वत:ची भूमिका स्पष्ट केली तर चर्चा घडून येईल. विचारांची घुसळण होऊन दिशा ठरेल. यासाठी सर्वांनी प्रयत्न करण्याची गरज असल्याचे अ‍ॅड़ प्रकाश आंबेडकर यांनी सांगितले. (सांस्कृतिक प्रतिनिधी)