शहरं
Join us  
Trending Stories
1
मोठा खुलासा! मध्यपूर्वेत इराणनं अमेरिकेची कंबर मोडली; ८ देशांतील लष्करी तळ उद्ध्वस्त, रडारपासून विमानांपर्यंत सर्वकाही नष्ट!
2
मी माफी मागतो...! एक्स्प्रेस वेवरील वाहतूक कोंडीबद्दल मुख्यमंत्र्यांची दिलगिरी; सुप्रिया सुळेंना दिला खास संदेश
3
शत्रूचा कर्दनकाळ! भारताचे 'अग्नी-६' अमेरिकेपर्यंत पोहोचणार? जगातील कोण कोणते देश निशाण्यावर येणार? ताकद पाहून चक्रावून जाल
4
West Bengal Election : पश्चिम बंगालमध्ये १५ बूथवर पुन्हा मतदान; निवडणूक आयोगाचा मोठा निर्णय
5
रिझर्व्ह बँकेने लंडनमधून परत मागवले तब्बल १ लाख किलो सोनं, कारण काय?
6
भुसावळातील भीषण आग; सहा घरे जळून खाक; चार बकऱ्यांचा होरपळून मृत्यू
7
समुद्रात अडकले ४१ टँकर, अमेरिकेने केली इराणची नाकेबंदी, पण तिकडे चीनची झाली कोंडी 
8
“अजितदादांचा पक्ष मविआत येऊ शकतो अन् २०२९ला बारामतीचा आमदार…”; युगेंद्र पवारांचा मोठा दावा
9
महाराष्ट्र दिनी राज ठाकरेंची हुतात्मा स्मारकाबाबत पोस्ट; मराठी माणसाला आवाहन, सरकारवर टीका
10
‘मिसिंग लिंक’ नाही, मग आता काय म्हणायचे?; विशेष मार्गिकेला CM फडणवीसांनी दिले नवीन नाव
11
Travel : ना मोबाईल नेटवर्क, ना विजेचा झगमगाट! तरीही पर्यटकांची धाव; तुम्हाला माहितीये का 'हे' अनटोल्ड डेस्टिनेशन?
12
महाराष्ट्रदिनी PM मोदी यांचे CM फडणवीस यांना खास पत्र, नेमकं काय म्हटलंय? वाचा
13
नवमपंचम विपरीत राजयोग २०२६: ९ राशींना लक्षणीय लाभ, नवीन नोकरीची संधी; कष्टाचे चांगले फळ!
14
जुना एसी दुरुस्त करावा की नवा विकत घ्यावा? 'हे' पॉईंट्स वाचून निर्णय घ्या, वाचतील हजारो रुपये!
15
३ देशांतून तातडीने बाहेर पडा! UAEची नागरिकांना सूचना; सावधगिरीची इशारा की युद्धात उडी?
16
“महाराष्ट्राचे राजकीय महत्त्व कमी करायचा प्रयत्न, सरकारने आत्मपरीक्षण करावे”: हर्षवर्धन सपकाळ
17
माणुसकीला काळिमा! १२ वर्ष सिगरेटचे चटके, मग घटस्फोट देऊन घराबाहेर काढलं; हैवान पतीचा क्रूर चेहरा समोर
18
“महाविकास आघाडीने विकासाची लिंक मिस केली, आम्ही ती वेगाने कनेक्ट केली”: DCM एकनाथ शिंदे
19
लग्नाचे विधी सुरू होणार तोच पथक दारात! परभणीत बालविवाह रोखला; अल्पवयीन मुलीची बाल कल्याण समितीकडे रवानगी
20
कृणाल पांड्याला गोलंदाजी का दिली नाही? भुवीने सांगितलं अजब कारण; पाहा तुम्हाला तरी पटतंय का?
Daily Top 2Weekly Top 5

करण पराेपटे हत्याकांडात दाेन जिल्ह्यांतील आराेपी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 28, 2021 05:00 IST

येळाबारा शिवारातून शनिवारी रात्री बगिरा ऊर्फ आशिष दांडेकर, शुभम बघेल आणि रघू   राेकडे, प्रवीण ऊर्फ पिके केराम यांना अटक केली. त्यांना न्यायालयात हजर केले असता न्यायलयाने आराेपींना ४ जुलैपर्यंतची पाेलीस काेठडी सुनावली आहे. या हत्याकांडात पडद्या मागचे सूत्रधार काेण, याचाही शाेध पाेलीस घेत आहेत. ज्यांनी थेट करण पराेपटे याच्यावर हल्ला केला त्याच्याव्यतिरिक्त गुन्ह्यात आणखी काहींचा समावेश आहे.

लोकमत न्यूज नेटवर्कयवतमाळ : करण पराेपटे हत्याकांडात प्रत्यक्ष सहभाग असणाऱ्या आराेपींना पाेलिसांनी जेरबंद केले आहे.  सोबत घटनेच्या मागील सूत्रधारांचाही शाेध पाेलीस घेत आहे. नागपूरपाठाेपाठ आता अमरावती जिल्ह्यातील आराेपींचाही यात सहभाग असून पाेलीस त्यांच्या मागावर आहेत. येळाबारा शिवारातून शनिवारी रात्री बगिरा ऊर्फ आशिष दांडेकर, शुभम बघेल आणि रघू   राेकडे, प्रवीण ऊर्फ पिके केराम यांना अटक केली. त्यांना न्यायालयात हजर केले असता न्यायलयाने आराेपींना ४ जुलैपर्यंतची पाेलीस काेठडी सुनावली आहे. या हत्याकांडात पडद्या मागचे सूत्रधार काेण, याचाही शाेध पाेलीस घेत आहेत. ज्यांनी थेट करण पराेपटे याच्यावर हल्ला केला त्याच्याव्यतिरिक्त गुन्ह्यात आणखी काहींचा समावेश आहे. अटकेतील आराेपींच्या कबुली जबाबावरून पाेलिसांचा त्या दिशेने तपास सुरू आहे.  हत्याकांडाचे केले पूर्वनियाेजन भर चाैकात वर्दळीच्या वेळी थेट गाेळीबार करून चाकूहल्ला करण्याची घटना ही अचानक घडलेली नाही. हा गुन्हा करताना आराेपींनी पूर्वनियाेजन केले. काेण काय करणार, हे निश्चित करून हत्या करण्यात आली. त्यामुळे घटनास्थळावर प्रत्यक्ष हल्ला करणारे तिघे असले तरी त्यांना यात मदत करणाऱ्यांची संख्या माेठी आहे. त्यांनाही रेकाॅर्डवर घेण्याचे प्रयत्न पाेलिसांकडून केले जात आहेत. 

तिघांनी केला गाेळीबार व चाकुहल्ला - करण पराेपटे हा स्टेट बँक चाैकात आला असताना त्यांच्या पाळतीवर असलेल्या बगिराने त्याला आवाज देऊन बाेलण्यास थांबविले. नंतर तेथे वाद घातल्याचा देखावा करून शुभम बघेल याने थेट गाेळ्या घालण्यास सुरुवात केली. त्यानंतर रघू व बगिराने दातेरी चाकूने पाेट तसेच  पाठीवर सपासप वार केले. काेणत्याही परिस्थितीत करणचा जागेवरच खात्मा झाला पाहिजे, अशा इराद्याने हे तिन्ही आराेपी त्याच्यावर तुटून पडले.  वर्दळीच्या चाैकात काही मिनिटांत करण पराेपटे याचा गेम खल्लास केला. तेथून हे तिघे दुचाकीने येळाबारा परिसरात आश्रयाला पाेहाेचले.  दाेन दिवस मुक्काम करून त्यांचा राज्याबाहेर पसार हाेण्याचा बेत हाेता. मात्र, पाेलिसांच्या सर्तकतेमुळे ते जाळ्यात सापडले. 

 

टॅग्स :PoliceपोलिसCrime Newsगुन्हेगारी