शहरं
Join us  
Trending Stories
1
Vaibhav Suryavanshi : फक्त १६ चेंडू खेळला अन् हवा करून गेला! वर्ल्ड रेकॉर्ड थोडक्यात हुकला, पण...
2
मोठी बातमी : भाजपचं धक्कातंत्र! विधान परिषद निवडणुकीसाठी ५ जणांची यादी जाहीर, कुणाला मिळाली संधी?
3
नांदेड विमानतळ परिसरात ‘गूढ गोलाकार वस्तू’! उडती तबकडी की साधा बलून?
4
पोलीस आयुक्तांचा धडाकेबाज निर्णय, एकाच दिवसात ४० शस्त्र परवाने रद्द 
5
मंत्री उदय सामंत अंतरवाली सराटीत मनोज जरांगे यांच्या भेटीला, एक तास चर्चा; कारण काय?
6
बाबासाहेबांनी ध्वनी प्रदूषणाचे कधीच समर्थन केले नसते, हायकोर्टाने समाजाला विचार व तत्वज्ञानाची जाणिव करून दिली
7
निवडणूक संपताच पेट्रोल-डिझेल महागणार? केंद्र सरकारनं दिलं मोठं स्पष्टीकरण! काय होणार?
8
नागपूर भाजप शहराध्यक्ष तिवारींचा मोबाईल हॅक, आरोपींकडून लोकांना पैशांची मागणी
9
PBKS vs RR : वैभव-यशस्वीचा धमाका; फरेरा-दुबेचा फिनिशिंग टच! राजस्थानने रोखला पंजाबचा विजयरथ
10
भाजपचे धक्कातंत्र, विदर्भातून प्रस्थापितांऐवजी सहकारतज्ज्ञ संजय भेंडेंना संधी; ‘मायक्रो प्लॅनर’ म्हणून आहे ओळख
11
१ मे पासून खिशाला कात्री! बँकिंगसह 'हे' मोठे नियम बदलणार; गॅस सिलिंडर स्वस्त होणार की महागणार?
12
PBKS vs RR : 'वंडर बॉय' वैभव सूर्यवंशीनं धु धु धुतलं! मग अर्शदीपनं लो फुलटॉसवर हिशोब केला चुकता
13
‘मुंबई-पुणे एक्स्प्रेस वे’ मिसिंग लिंकवर किती स्पीडने जाता येणार?; वेगमर्यादेची नियमावली आली!
14
विदर्भात १ मे पर्यंत पावसाळी ढग; पारा खाली येणार, पण उष्णतेची तीव्रता कायम राहणार
15
गुजरातमध्ये BJPचा डंका! १५ महानगरपालिकांवर कमळ फुलले; आप-काँग्रेस आपटले, कुणाला किती जागा?
16
PBKS vs RR: परफेक्ट सेटअप! १५० kmph वेगवान चेंडूसह पुन्हा प्रियांश आर्यवर भारी पडला जोफ्रा (VIDEO)
17
"हे 'सेल्फ रेडिकलायझेशन'चं प्रकरण, जिहाद करायचा म्हणजे..."; मिरा रोड हल्ल्यासंदर्भात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस स्पष्टच बोलले
18
इराण-अमेरिका युद्धात UAE चा मोठा निर्णय; OPEC आणि OPEC+ गटातून बाहेर पडणार
19
म्हाडाच्या २६४० घरांच्या लॉटरीला मुदतवाढ; १४ मे पर्यंत अर्ज सादर करण्याची मुदत
20
१३६३५७ घन मीटर क्षमता, गायब होते LNG टँकर जहाज; अचानक भारताजवळ दिसले, महिनाभर कुठे होते?
Daily Top 2Weekly Top 5

कळंबमध्ये पहिल्यांदाच काकड आरती

By admin | Updated: November 7, 2016 01:12 IST

आजच्या विज्ञान युगातही धार्मिक परंपरेचे महत्व टिकून आहे. त्यामुळेच गावखेड्यातील काकडा आरतीची परंपरा निरंतर सुरू आहे.

टाळ मृदंगाचा स्वर : वृध्दांसह युवकांचा पुढाकार, चिंतामणी देवस्थान भक्त मंडळकळंब : आजच्या विज्ञान युगातही धार्मिक परंपरेचे महत्व टिकून आहे. त्यामुळेच गावखेड्यातील काकडा आरतीची परंपरा निरंतर सुरू आहे. यावर्षी तर प्रथमच कळंब शहरात चिंतामणी विश्वस्तांच्या पुढाकारातून काकडा आरतीला प्रारंभ झाला. टाळ मृदंग, चिपळ्या, शंख, तानपुरा, घंटानांद आणि झांजच्या स्वरांनी चिंतामणी नगरीतील नागरिकांची पहाटारंभ उल्हासित वातावरणात होत आहे. कळंबच्या इतिहासात प्रथमच चिंतामणी देवस्थान, अनुसया देवस्थान, मोरया भक्तमंडळ व सत्यसाई भक्त मंडळाच्या पुढाकारातून नवीन काकडा आरतीला सुुरुवात झाली. टाळ, मृदंग, हरिनामाचा गजर करीत वृध्द महिला-पुरुष, युवक-युवती यात सहभागी असतात. पहाटे पाच वाजता श्री चिंतामणी मंदिरात सर्वजण एकत्र येतात. त्यानंतर घंटानांद करुन काकडे पेटऊन धार्मिक गीतांची सुरुवात होते. ‘जय जय राम कृृष्ण हरी...’ या भजनाने भक्तिमय वातावरणात नगरभ्रमणाला सुरुवात केली जाते. कडाक्याच्या थंडीतही पहाटे उठून अनवाणी पायांनी चालत मोठ्या भक्तीभावाने हरिनामाचा गरज केला जातो. यात परिसर भक्तीमय होऊन जातो. गावातील रोज एका मंदिरात काकडा पोहचतो. तेथे एका तालासुरात आणि मंजुळ आवाजात भजन कीर्तन आणि आरती म्हटली जाते. तेथून काकडा थेट श्री चिंतामणी मंदिरात पोहोचतो. तेथेही पुष्पांजली, प्रसादगीत व काकडा आरती व इतर धार्मिक विधी पार पाडल्यानंतर सर्वांना फराळ, चहापाणी देऊन आरतीचा समारोप होतो. कोजागिरी पोर्णिमेपासून काकडा आरतीला प्रारंभ झाला. आरतीची समाप्ती कार्तिक पौर्णिमेला काल्याच्या कीर्तनानंतर प्रसाद वाटप करुन करण्यात येणार आहे. एक महिना चालणारा हा उत्सव निद्रिस्त देवांना जागविण्यासाठी केला जातो, असे म्हटले जाते. चिंतामणी देवस्थानात पांढऱ्या सूतापासून तयार केला जाणारा काकडा आरतीसाठी पेटविला जातो. तो सर्व भक्तांना दिला जातो. त्यानंतर टाळमृदंगाच्या तालावर आरतीला प्रारंभ होतो. काकडा आरतीच्या मार्गावर पहाटेपासूनच अंगणात सडासारवण करुन रांगोळ्या टाकल्या जातात. विशेष म्हणजे युवकांचा आरतीत मोठा सहभाग असतो. काकड आरतीसाठी संपूर्ण गावकऱ्यांचे सहकार्य लाभत आहे. (तालुका प्रतिनिधी)