शहरं
Join us  
Trending Stories
1
"१८ तासांचा प्रवास कशाला? बोलायचं तर थेट फोन करा"; ट्रम्प यांनी रद्द केला पाकिस्तान दौरा
2
होर्मुझमध्ये संघर्ष पेटणार! इराण म्हणाला, 'नाकेबंदी हटवली नाही, तर आता अमेरिकेला प्रत्युत्तर देणार"
3
अभिषेक-ईशानचा शानदार शो! वैभव सूर्यवंशीचं शतक व्यर्थ! RR च्या घरच्या मैदानात SRH नं मारली बाजी
4
वरातीत नाचला अन् जीव गमावला! पुण्यात चुलत भावानेच केला भावाचा गेम; कात्रजमधील हत्येने खळबळ
5
सिंधुदुर्गातील वाहनाना टोल मधून सुट मिळणार; पालकमंत्र्यांचे आश्वासन 
6
Vaibhav Suryavanshi Records : शतक एक, विक्रम अनेक! वैभव सूर्यवंशी अशी कामगिरी करणारा जगातील पहिला फलंदाज
7
इस्लामाबादमधील चर्चेपूर्वीच खळबळ! इराणचा अमेरिकेला सणसणीत टोला; म्हणाले "अब्रू वाचवण्यासाठी.."
8
'गिव्ह मी वन चान्स' फेम Karun Nair ट्रोल! ५ मिनिटांत श्रेयस अय्यरचे २ कॅच सोडले; चर्चा तर होणारच
9
Travel : जणू स्वर्ग पृथ्वीवरच आहे! 'या' व्हॅलीचे सौंदर्य पाहून मसुरी-नैनिताललाही विसरून जाल!
10
Vaibhav Suryavanshi : उत्तुंग फटकेबाजी! १५ वर्षीय वैभव सूर्यवंशीनं ३६ चेंडूत पेश केला शतकी नजराणा
11
लॅपटॉपचा Type-C पोर्ट आहे 'ऑल-इन-वन' बाहुबली; याचे भन्नाट फीचर्स वाचून तुम्हीही थक्क व्हाल
12
भयंकर! अखिलेश यादवांचा पुतळा जाळताना स्फोट; भाजपा आमदार अनुपमा जयस्वाल भाजल्या
13
Raghav Chadha : "घाबरुन नाही, तर हताश होऊन पक्ष सोडला"; राघव चड्ढांनी सांगितलं दिल्लीतील पराभवाचं कारण
14
DC vs PBKS : पंजाब किंग्स इज चेज मास्टर! दिल्ली कॅपिटल्सविरुद्धच्या विजयासह रचला नवा इतिहास
15
ना भांडण, ना ब्रेकअप! Gen Z च्याही पुढे गेली Gen Alpha; खऱ्या प्रेमापेक्षा 'AI गर्लफ्रेंड'ची क्रेझ
16
“तेलंगणने करून दाखवले, महाराष्ट्रात ST महामंडळाचे विलिनीकरण कधी करणार?”; काँग्रेसचा थेट सवाल
17
"महाराष्ट्राच्या व मराठी माणसाच्या उरावर बसवले जात असतील तर...", अमोल मिटकरींचा धीरेंद्र शास्त्रींवर घणाघात
18
बागेश्वर बाबा अडचणीत! शिवप्रेमींच्या भावना दुखावल्या प्रकरणी छत्रपती संभाजीनगरात तक्रार
19
४,४,४,४,४,४! प्रभसिमरन सिंगची तुफान फटकेबाजी; अजिंक्य रहाणे अन् पृथ्वी शॉच्या विक्रमाशी बरोबरी
20
Nithin Kamath : "माझ्या मुलाचा स्क्रीन टाईम दिवसाला फक्त ३० मिनिटं, तरीही..."; नितीन कामथ यांनी व्यक्त केली चिंता
Daily Top 2Weekly Top 5

जुनोनी आश्रमशाळेचा भोंगळ कारभार उघड

By admin | Updated: January 23, 2016 02:41 IST

येथून जवळच असलेल्या झरी तालुक्यातील जुनोनी येथील शासकीय आदिवासी आश्रमशाळेत भोंगळ कारभार सुरू आहे. त्याचा विद्यार्थ्यांना त्रास सहन करावा लागत आहे.

घोन्सा : येथून जवळच असलेल्या झरी तालुक्यातील जुनोनी येथील शासकीय आदिवासी आश्रमशाळेत भोंगळ कारभार सुरू आहे. त्याचा विद्यार्थ्यांना त्रास सहन करावा लागत आहे.एकात्मिक आदिवासी विकास प्रकल्प पांढरकवडाअंतर्गत जुनोनी येथे शासकीय आश्रमशाळा आहे. या आश्रमशाळेत पहिली ते दहावीपर्यंतचे शिक्षण देण्यात येते. या शाळेत विद्यार्थ्यांना शासनातर्फे अनेक सुविधा देण्यात येतात. मात्र सोयीसुविधा विद्यार्थ्यांपर्यंत पोहोचत नसल्याने विद्यार्थी त्रस्त झाले आहे. सध्या सर्वत्र कडाक्याची थंडी पडत आहे. मात्र येथील विद्यार्थ्यांना थंड्या पाण्यानेच आंघोळ करावी लागत आहे. विद्यार्थ्यांना आंघोळीसाठी गरम पाणीसुद्धा मिळत नाही. विद्यार्थ्यांना आंघोळीसाठी गरम पाणी मिळावे म्हणून सौर ऊर्जेवरील पाणी गरम करण्याचे यंत्र या आश्रमशाळेत बसविण्यात आले आहे. मात्र तेथील पाण्याची टाकीच गायब झाली आहे. त्यामुळे विद्यार्थ्यांना नाईलाजाने भर थंडीत थंड्या पाण्याने आंघोळ करावी लागत आहे. परिणामी त्यांच्या आरोग्याचा प्रश्न निर्माण झाला आहे.या आश्रमशाळेत लाखो रूपये खर्च करून जनरेटर घेण्यात आले. मात्र हे जनरेटर धुळखात पडले आहे. त्याच्या देखभालीकडे कुणाचेही लक्ष जात नाही. याबाबत संबंधितांना विचारणा केली असता, उडवाउडवीची उत्तरे देण्यात आली. सोबतच एखादा विद्यार्थी आजारी पडला, तर त्याच्यावर प्राथमिक उपचारसुद्धा तेथे होत नाही. त्यामुळे विद्यार्थ्यांना थेट झरी येथील शासकीय दवाखान्यात न्यावे लागते. झरी येथे जाण्यासाठी वेळ लागतो. तसेच ऐनवेळी कोणतेही वाहन मिळत नाही. त्यामुळे एखादवेळी अघटित घडण्याची शक्यता बळावली आहे. त्याचबरोबर या आश्रमाशाळेकडे कुणी लक्ष द्यायला तयार नसल्याने मुख्याध्यापक व शिक्षक वेळेवर तासिकासुद्धा घेत नसल्याची ओरड विद्यार्थ्यांकडून होत आहे. संबंधित विभागाने याकडे लक्ष देऊन आश्रमशाळेचा कारभार सुधारावा, अशी मागणी होत आहे. (वार्ताहर)