शहरं
Join us  
Trending Stories
1
Heatwave: देशात उष्णतेचा कहर, 'या' ६ राज्यात आग ओकतोय सूर्य, पुढील तीन दिवस घ्यावी लागेल काळजी!
2
तुमच्या मुलीच्या खात्यात येतील ६९,२७,५७८ रुपये, तुम्हाला या योजनेत किती करावी लागेल गुंतवणूक, पैसेही राहतील सुरक्षित
3
अमराठी रिक्षा, टॅक्सी चालकांना मराठी अनिवार्य कशी करावी?; महत्त्वपूर्ण बैठकीत आज होणार मंथन
4
‘मिसिंग लिंक’ मार्गावर कार, बसलाच एंट्री, टोलवाढ नाही; मुंबई-पुणे अंतर ६ किमीने कमी
5
आजचे राशीभविष्य - २७ एप्रिल २०२६, वडील व वडीलधार्‍यांकडून लाभ होईल, समाजात मान-प्रतिष्ठा वाढेल
6
एमआयडीसी मुख्यालय निविदेला पाचवी मुदतवाढ; ‘रतन टाटा उद्योग भवन’ प्रकल्पाला मिळणार वेग
7
कुजबुज! सत्ता नसूनही ठाकरेंची तारेवरची कसरत; गायकवाडांवरही होऊ शकते पुस्तक
8
मराठी अभिनेता झाला जुळ्या मुलांचा बाबा! लग्नाच्या ८ वर्षांनी पाळणा हलला, नावंही ठेवली खूपच खास
9
मेट्रो ६ मार्गासाठी पश्चिम रेल्वेवर ४२ मीटर स्टील स्पॅनची उभारणी; काय आहेत वैशिष्ट्ये?
10
‘रेलवन’वर बुकिंग फसले अन् वॉलेटमध्येच रक्कम अडकली; प्रवासी नाराज, पैसे परत देण्याची मागणी
11
२२ वर्षीय मुलीची क्रूर हत्या, अवघ्या ५ दिवसांत गुन्ह्याचा छडा; आरोपीला ठाण्यातून केली अटक
12
मुंबईकरांनो, तुम्ही रामभरोसे बाहेरचे पदार्थ खाताय..! महाराष्ट्रात एफडीए इन्स्पेक्टरची वानवा
13
आजारपण अन् आयुष्यभराची कमाई साफ; कुटुंब अडकते वर्षानुवर्षे कर्जाच्या खाईत, मध्यमवर्ग संकटात
14
‘त्यांना’ मराठीची परीक्षा देऊन पदवी घ्यायची नाही; परिवहन मंत्र्यांनी मांडली स्पष्ट भूमिका
15
तुम्ही रिक्षा-टॅक्सीवाल्यांची उपजीविका नष्ट करताय; मराठी सक्तीला शशांक राव यांचा आक्षेप
16
हम ‘आप’ के हैं कौन? सत्तेसाठी पक्ष फोडणे ही प्रवृत्ती लोकशाहीच्या आत्म्याला नख लावणारी
17
महामुंबईतील वॉटर मेट्रोला वेग! २६ टर्मिनल्स उभारणार; शहरांना नवे कनेक्शन, काय बदलणार?
18
पंतनं खिलाडूवृत्ती नाही जपली! Angkrish Raghuvanshi ची विकेट ठरली वादग्रस्त; नेमकं काय घडलं?
19
DCM शिंदेंनी केली ‘मिसिंग लिंक’च्या कामाची पाहणी; कोणत्या वाहनांना परवानगी अन् टोल किती?
20
भूषण गवई-धीरेंद्र शास्त्री भेटीवरून टीका, CM फडणवीसांनी सुनावले; म्हणाले, “श्याम मानव कोण?”
Daily Top 2Weekly Top 5

मोरचंडीत होते व्यसनमुक्ती सहविचारसभा

By admin | Updated: July 17, 2014 00:21 IST

जिल्ह्यातील उमरखेड तालुक्यात दुर्गम भागात असलेल्या मोरचंडी येथे व्यसनाधिनतेमुळे पिढ्याच्या पिढ्या गारद झाल्या आहेत. गावची स्थिती सुधारण्यासाठी गावातीलच सुशिक्षित युवकांनी पुढाकार घेतला आहे.

यवतमाळ : जिल्ह्यातील उमरखेड तालुक्यात दुर्गम भागात असलेल्या मोरचंडी येथे व्यसनाधिनतेमुळे पिढ्याच्या पिढ्या गारद झाल्या आहेत. गावची स्थिती सुधारण्यासाठी गावातीलच सुशिक्षित युवकांनी पुढाकार घेतला आहे. गावात व्यसनमुक्ती सहविचार सभा घेवून घरोघरी जाऊन व्यसनमुक्तीचे महत्व पटवून दिले जात आहे. डोंगरमाथ्यावर असलेल्या मोरचंडी येथे शासकीय नोकरीनिमित्त गावाबाहेर असलेल्या सुशिक्षित युवकांनी परिवर्तनाची नांदी केली आहे. गावात शिक्षणाचे प्रमाण कमी असल्याने येथील युवा पीढीला व्यसनाधिनतेच्या अजगराने विळखा घातला आहे. तिशीच्या आतीलच अनेक तरुण केवळ व्यसनाधिनतेमुळे मृत्यूपंथाला लागले आहेत. ही स्थिती सुधारण्याचा निर्धार गावातीलच काही सुशिक्षित तरुणांनी वयोवृद्धांना विश्वासात घेऊन केला. त्यानंतर गावात घरोघरी जाऊन व्यसनाचे दुष्परिणाम समजावून सांगितले जाऊ लागले. आश्चर्याची बाब ज्यांचा दिवस दारूसोबतच सुरू होतो, असे पूर्णत: व्यसनाच्या आहारी गेलेलेही या कामात सहभागी झाले. त्यांनी आज आमची झालेली अवस्था पहा, अशी भावनिक साद घालून दारू, जुगारासारख्या व्यसनांना बळी पडू नका, असे आवाहन केले. दारुच्या नशेत झालेल्या वादामुळे अनेकांवर कोर्ट-कचेऱ्या करण्याची वेळ आली, काहींचा संसार उद्ध्वस्त झाला.स्वयंप्रेरणेने दारू सोडणाऱ्यांचा जाहीररीत्या गावात सत्कार करण्यात येऊ लागला. व्यसनमुक्ती सहविचार सभा बोलवून प्रबोधनाचे कार्यक्रम सातत्याने घेतले जात आहे. अजूनही व्यसनमुक्तीसाठी गावात भरपूर काम करण्याची गरज आहे. मात्र ही मोहीम हाती घेणाऱ्या गोकूळ राठोड, दत्ता माहुरे, ज्ञानेश्वर ब्रह्मटेके, ज्ञानेश्वर मुंडाले, सुभाष भरकाडे, कैलास चव्हाण त्यांच्यासह गावातील काही जणांनी वातावरण बदलण्याचा विश्वास प्राप्त झाला आहे. ही मोहीम अशीच सुरू ठेवणार असल्याचेही त्यांनी सांगितले. (कार्यालय प्रतिनिधी)