शहरं
Join us  
Trending Stories
1
"१८ तासांचा प्रवास कशाला? बोलायचं तर थेट फोन करा"; ट्रम्प यांनी रद्द केला पाकिस्तान दौरा
2
होर्मुझमध्ये संघर्ष पेटणार! इराण म्हणाला, 'नाकेबंदी हटवली नाही, तर आता अमेरिकेला प्रत्युत्तर देणार"
3
अभिषेक-ईशानचा शानदार शो! वैभव सूर्यवंशीचं शतक व्यर्थ! RR च्या घरच्या मैदानात SRH नं मारली बाजी
4
वरातीत नाचला अन् जीव गमावला! पुण्यात चुलत भावानेच केला भावाचा गेम; कात्रजमधील हत्येने खळबळ
5
सिंधुदुर्गातील वाहनाना टोल मधून सुट मिळणार; पालकमंत्र्यांचे आश्वासन 
6
Vaibhav Suryavanshi Records : शतक एक, विक्रम अनेक! वैभव सूर्यवंशी अशी कामगिरी करणारा जगातील पहिला फलंदाज
7
इस्लामाबादमधील चर्चेपूर्वीच खळबळ! इराणचा अमेरिकेला सणसणीत टोला; म्हणाले "अब्रू वाचवण्यासाठी.."
8
'गिव्ह मी वन चान्स' फेम Karun Nair ट्रोल! ५ मिनिटांत श्रेयस अय्यरचे २ कॅच सोडले; चर्चा तर होणारच
9
Travel : जणू स्वर्ग पृथ्वीवरच आहे! 'या' व्हॅलीचे सौंदर्य पाहून मसुरी-नैनिताललाही विसरून जाल!
10
Vaibhav Suryavanshi : उत्तुंग फटकेबाजी! १५ वर्षीय वैभव सूर्यवंशीनं ३६ चेंडूत पेश केला शतकी नजराणा
11
लॅपटॉपचा Type-C पोर्ट आहे 'ऑल-इन-वन' बाहुबली; याचे भन्नाट फीचर्स वाचून तुम्हीही थक्क व्हाल
12
भयंकर! अखिलेश यादवांचा पुतळा जाळताना स्फोट; भाजपा आमदार अनुपमा जयस्वाल भाजल्या
13
Raghav Chadha : "घाबरुन नाही, तर हताश होऊन पक्ष सोडला"; राघव चड्ढांनी सांगितलं दिल्लीतील पराभवाचं कारण
14
DC vs PBKS : पंजाब किंग्स इज चेज मास्टर! दिल्ली कॅपिटल्सविरुद्धच्या विजयासह रचला नवा इतिहास
15
ना भांडण, ना ब्रेकअप! Gen Z च्याही पुढे गेली Gen Alpha; खऱ्या प्रेमापेक्षा 'AI गर्लफ्रेंड'ची क्रेझ
16
“तेलंगणने करून दाखवले, महाराष्ट्रात ST महामंडळाचे विलिनीकरण कधी करणार?”; काँग्रेसचा थेट सवाल
17
"महाराष्ट्राच्या व मराठी माणसाच्या उरावर बसवले जात असतील तर...", अमोल मिटकरींचा धीरेंद्र शास्त्रींवर घणाघात
18
बागेश्वर बाबा अडचणीत! शिवप्रेमींच्या भावना दुखावल्या प्रकरणी छत्रपती संभाजीनगरात तक्रार
19
४,४,४,४,४,४! प्रभसिमरन सिंगची तुफान फटकेबाजी; अजिंक्य रहाणे अन् पृथ्वी शॉच्या विक्रमाशी बरोबरी
20
Nithin Kamath : "माझ्या मुलाचा स्क्रीन टाईम दिवसाला फक्त ३० मिनिटं, तरीही..."; नितीन कामथ यांनी व्यक्त केली चिंता
Daily Top 2Weekly Top 5

माहूर घाटात भाविकांची जीप कोसळली

By admin | Updated: November 2, 2016 00:51 IST

रेणुका देवीच्या दर्शनासाठी जाणाऱ्या भाविकांची जीप २५ फूट खोल दरीत कोसळून झालेल्या अपघातात चालक जागीच ठार तर १३ प्रवासी जखमी झाले.

चालक ठार : १३ भाविक जखमी, एक तरुणी अत्यवस्थमाहूर : रेणुका देवीच्या दर्शनासाठी जाणाऱ्या भाविकांची जीप २५ फूट खोल दरीत कोसळून झालेल्या अपघातात चालक जागीच ठार तर १३ प्रवासी जखमी झाले. यातील एक तरुणी अत्यवस्थ आहे. हा अपघात येथील रेणुका मंदिरालगतच्या वळणावर मंगळवारी सकाळी १० वाजताच्या सुमारास घडला. जयदेव रा. सलगरा ता. मुखेड असे ठार झालेल्या जीप चालकाचे नाव आहे. तर प्रियंका शामराव टापरे (१८) रा. रूई ता. कंधार असे अत्यवस्थ तरुणीचे नाव आहे. कंधार आणि मुखेड तालुक्यातील भाविक रेणुका देवीच्या दर्शनासाठी मंगळवारी जीपने (क्र.एम.एच.२६-बी-९२३४) रेणुकागडाकडे जात होते. त्यावेळी घाट चढत असताना एका वळणावर चालकाचे नियंत्रण गेले आणि जीप तीन-चार पलट्या खावून सुमारे २५ फूट खोल दरीत कोसळली. हा प्रकार माहीत होताच परिसरातील भाविकांनी घटनास्थळी धाव घेतली. माजी नगराध्यक्ष राजेंद्र केशवे, रेणुकादेवी संस्थानचे पी.डी. चव्हाण, इलियास बावाणी, राजू गंधेवाड, सुरेश शिंदे आदींनी जखमींना दरीतून बाहेर काढले. मात्र चालक जयदेवचा मृत्यू झाला होता. जखमींना ग्रामीण रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले. तेथे डॉ. निरज कुंभारे यांनी उपचार केले. जखमींपैकी प्रियंका टापरे हिची प्रकृती गंभीर असल्याने तिला पुढील उपचारासाठी पुसद येथे रवाना करण्यात आले. या घटनेने काही काळ वाहतूक विस्कळीत झाली होती. घटनास्थळावर नागरिकांची मोठी गर्दी झाली होती. दैव बलवत्तर म्हणून इतर भाविकांना किरकोळ दुखापत झाली. (वार्ताहर)