शहरं
Join us  
Trending Stories
1
पराभवानंतरही टीवीकेसोबत सत्तेत येण्याची काँग्रेसला संधी; तामिळनाडूत सत्ता समीकरण कसं जुळणार?
2
ममता बॅनर्जींनी पश्चिम बंगाल गमावला! संजय राऊत राहुल गांधींना म्हणाले, "जागे व्हा, आता आपण..."
3
पाकिस्तानचा प्रसिद्ध मौलाना इदरीस तरंगजईची गोळ्या झाडून हत्या; दोन पोलीस गंभीर
4
निवडणूक संपताच सैन्याकडून बंगालच्या उपसागरात NOTAM जारी; पाकिस्तानशी आहे खास संबंध
5
भाजपचा बंगालमध्ये ऐतिहासिक विजय! मुख्यमंत्रीपदासाठी ४ नावांची चर्चा; शपथविधी सोहळ्याची मोठी तयारी
6
लग्नाच्या प्रश्नांना अन् दडपणाला कशी सामोरी जातेस? प्राजक्ता माळी म्हणाली, "जे तुमचं असतं..."
7
भीषण, भयंकर, भयावह! चीनमध्ये फटाक्याच्या फॅक्ट्रीत मोठा स्फोट; २१ जणांचा मृत्यू, ६१ जखमी
8
चिनी नागरिक स्वत:ला नेपाळी भासवत होता, नेपाळी नंबरची स्कूटर घेऊन भारतात घुसला अन्...
9
LNG Supply: कतारकडून पुरवठा थांबला, भारतानं कंबर कसली; ७ नव्या टाक्यांचा 'यासाठी' उपयोग होणार, काय आहे संपूर्ण प्लॅन
10
तिघांनी हल्ला केला, कोयता डोक्यात अडकला; सायन रुग्णालयातील थरारक व्हिडिओ, तो तरुण नेमका कोण?
11
Adhik Maas 2026: तब्बल ११ वर्षांनंतर दुर्मिळ योग! अधिक मासात सुख समृद्धीसाठी 'या' तीन गोष्टींचे करा दान!
12
ब्राझीलमध्ये विमान थेट इमारतीला धडकले; अपघाताचा थरारक Video आला समोर, ३ जण दगावले
13
लग्नाच्या पहिल्या वाढदिवसापूर्वीच संसार उद्ध्वस्त; शेजारणीवर जीव जडला, बायकोचा काटा काढला
14
‘सरकारने कुठलाही विचार न करता या आरोपीला हालहाल करून संपवावं’, नसरापूर प्रकरणी राज ठाकरेंचा रोखठोक सल्ला
15
Crude Oil Price Today: कच्च्या तेलाच्या किमतीत मोठी वाढ: इराणच्या UAE वरील हल्ल्यानंतर ब्रेंट क्रूड $११४ पार; जाणून घ्या पेट्रोल-डिझेलचे दर
16
आता पुढचे लक्ष्य अखिलेश यादव; ममता बॅनर्जींचा पराभव करणाऱ्या सुवेंदू अधिकारींनी थोपटले दंड
17
Gold Silver Price Today : सोनं महागलं, चांदी झाली स्वस्त; आज काय आहेत नवे दर? पटापट चेक करा
18
कॅनडाचे दोन तुकडे होणार? स्वतंत्र देशासाठी जनमत संग्रहाची मागणी; प्रादेशिक उपेक्षा भोवली
19
Marathi News LIVE : इराणच्या हवाई हल्ल्यात तीन भारतीय जखमी, भारताने व्यक्त केला संताप 
20
Raja Shivaji Box Office: रितेश देशमुख ठरला बॉक्स ऑफिसचा 'राजा'! ४ दिवसांत सिनेमाची किती कोटींची कमाई?
Daily Top 2Weekly Top 5

कारागृहात मेटल डिटेक्टर

By admin | Updated: October 11, 2015 00:44 IST

जिल्हा कारागृहात मोबाईल बाळगणे, बाहेरून गांजासह अंमली पदार्थ आत नेणे, शस्त्रे नेणे, बराकीत होणारी कैद्यांमधील भांडणे यासारखे प्रकार रोखण्यासाठी ...

यवतमाळ : जिल्हा कारागृहात मोबाईल बाळगणे, बाहेरून गांजासह अंमली पदार्थ आत नेणे, शस्त्रे नेणे, बराकीत होणारी कैद्यांमधील भांडणे यासारखे प्रकार रोखण्यासाठी सुरक्षेच्या व्यापक उपाययोजना करण्यात आल्या आहे. सुरक्षेची मेटल डिटेक्टर, जामर, सीसीटीव्ही यासारखी अत्याधुनिक उपकरणे कारागृहात बसविण्यात आली आहे. कारागृह विभागाचे अपर पोलीस महासंचालक डॉ. भूषणकुमार उपाध्याय यांनी नुकताच राज्यभरातील कारागृहांमध्ये उपलब्ध सुरक्षा व्यवस्थेचा आढावा घेतला. अनेक ठिकाणी नव्या उपाययोजना सुचविण्यात आल्या आहे. नागपूर कारागृहातून चार कैदी पळाल्याच्या घटनेनंतर कारागृह प्रशासन सावध झाले असून सुरक्षा विषयक उपाययोजनांमध्ये आणखी वाढ करण्यात आली आहे. यवतमाळ जिल्हा कारागृहात पाच मोबाईल जामर बसविण्यात आले आहे. यापूर्वी तत्कालीन अपर महासंचालक मीरा बोरवनकर यांनी दिलेल्या अकस्मात भेटीत हा जामर बंद असल्याचे उघड झाले होते. त्यानंतर जामरची संख्या वाढविण्यात आली. ४८ सीसीटीव्ही कलेक्टर कारागृहात बसविण्यात आले आहे. त्यावर सूक्ष्म नियंत्रण ठेवण्याचे व त्यासाठी स्वतंत्र कर्मचारी नियुक्त करण्याचे आदेश डॉ. उपाध्याय यांनी दिले आहे. कारागृहात १० वॉकी-टॉकी देण्यात आले आहे. कारागृहामध्ये एक डोअर फ्रेम मेटल डिटेक्टर (डीएफएमडी) आणि तीन हॅडहोल्ड मेटल डिटेक्टर (एचएचएमडी) बसविण्यात आले आहे. याद्वारे कारागृहात प्रवेश करणाऱ्या कैदी-न्यायाधीन बंदीच नव्हे तर कर्मचाऱ्यांनाही तपासले जाते. एक डिजीसेट कारागृहात बसविण्यात आला आहे. कर्मचाऱ्यांद्वारेच कारागृहात गांजा व अन्य अंमली पदार्थ नेण्याचे प्रकार यापूर्वी उघडकीस आले होते. एका कैद्याने चक्क चप्पलमध्ये गांजा नेण्याचा प्रकारही केला होता. अशा घटनांना आता चाप बसणार आहे. बराकीमध्ये सीसीटीव्ही कॅमेराद्वारे वॉच ठेवला जाणार आहे. गुन्हेगारी टोळ्यांच्या म्होरक्यांकडून कारागृहात मोबाईल वापरण्याचा प्रयत्न होतो. बराकीतील असे मोबाईल ‘डिटेक्ट’ करण्यासाठी जिल्हा कारागृहात मोबाईल डिटेक्टर मात्र अद्याप उपलब्ध झाले नाही. सीसीटीव्हीद्वारेच त्यावर नियंत्रण ठेवण्याचा प्रयत्न सुरू आहे. डिटेक्टरबाबतचे प्रशिक्षणही तेथील कर्मचाऱ्यांना देण्यात आले आहे. (प्रतिनिधी)