शहरं
Join us  
Trending Stories
1
“असा नेता लाभणे भारताचे भाग्य”; प. बंगाल विजयानंतर ट्रम्प यांनी केले PM मोदींचे खास अभिनंदन
2
पुण्यात आजोबाकडून अल्पवयीन मुलीवर अत्याचाराचा प्रयत्न; नागरिकांच्या सतर्कतेमुळे अनर्थ टळला
3
Sanju Samson Record : संजूनं साधला 'द्विशतकी' डाव; किंग कोहली-KL राहुलनंतर अशी कामगिरी करणारा तो पहिलाच
4
“ममता दीदी अन् किशोरी पेडणेकर बहिणी, दोघींना खुर्चीचा मोह सुटत नाही”; कुणी केली खोचक टीका?
5
संजूचा धमाका; कार्तिक शर्मानंही दाखवला दम! DC ला पराभूत करत CSK नं प्लेऑफ्सची दावेदारी केली भक्कम
6
पश्चिम बंगाल, आसाम झाले, आता पुढचा नंबर कोणाचा? BJPचे टार्गेट सेट; काँग्रेसचे टेन्शन वाढणार?
7
निवडणूक हरताच ममतादीदींना इंडिया आघाडी आठवली; म्हणाल्या, “राजीनामा देणार नाही, सगळे पाठिशी”
8
“सेक्यूलर पक्ष भाजपाला रोखू शकत नाही, जनादेश स्वीकारा”; प. बंगाल निकालावर ओवेसी थेट बोलले
9
काय रे देवा! दोघांच्या गोंधळात तिसऱ्याचा फायदा; चेन्नईकरांनी Sameer Rizvi चा सोपा झेल सोडला (VIDEO)
10
“ममतादीदी पडतील असे कधी वाटले नाही”; पश्चिम बंगाल निवडणूक निकालावर मनोज जरांगेंनाही शंका
11
ममता बॅनर्जींचा CMपद सोडण्यास नकार, आता भाजप सत्तास्थापना कशी करणार? हे आहेत २ पर्याय
12
कोणत्याही ट्रेनमध्ये सहजपणे लोअर बर्थ कसा मिळेल? IRCTCनेच सांगितली खास ट्रिक, तुम्ही वापरली का?
13
चौकट मोडली, T20 मध्ये छाप सोडली! केएल राहुल म्हणतो; "प्रत्येक वेळी मनासारखं घडत नाही, पण…"
14
टी-२० क्रिकेटमध्ये टीम इंडियाला तोड नाही; IPL दरम्यान ICC नं केली मोठी घोषणा
15
TMC ला गळती; मनोज तिवारींचा पक्षाला रामराम, ममतांवर केला ५ कोटी मागितल्याचा आरोप
16
इंडिगो विमानात पॉवर बँकचा स्फोट; विमानतळावर प्रवाशांची आपत्कालीन सुटका, एक महिला जखमी
17
Latest Marathi News LIVE: गोंदियात वादळी वाऱ्यासह अवकाळी पावसाची हजेरी; शेतकरी चिंतेत
18
IPL 2026 : पलटवार करण्यासाठी DC नं खेळला हा डाव! मॅच विनरच्या कमबॅकसह CSK ची ताकद वाढली
19
पश्चिम बंगालमधील भाजपा विजयानंतर पाकची मोठी प्रतिक्रिया; थेट युद्धाची भाषा केली, म्हणाले...
20
Budget Travel: अवघ्या २० हजारांत अनुभवा केरळचं सौंदर्य; वायनाडला भेट देण्यापूर्वी हे नक्की वाचा!
Daily Top 2Weekly Top 5

उद्योगांना चालना आणि कामगार हितासाठी तपासणी

By admin | Updated: October 12, 2015 02:38 IST

विविध कामगार कायद्याची अंमलबजावणी होऊन कामगारांचे हित जोपासण्याबरोबरच उद्योगांना चालना मिळावी ...

यवतमाळ : विविध कामगार कायद्याची अंमलबजावणी होऊन कामगारांचे हित जोपासण्याबरोबरच उद्योगांना चालना मिळावी यासाठी कारखान्यांचे रॅण्डम इनेस्पेक्शन राबविण्याच्या दृष्टीने कारखाने निरीक्षण योजना शासनाकडून तयार करण्यात आली आहे. त्या अनुषंगाने कामगार आयुक्त कार्यालयास देण्यात आलेल्या सुचनांनुसार आयुक्तालयाने नोंदणीकृत असणाऱ्या कारखान्यांचे निरीक्षण करण्यासाठी राज्यस्तरीय निरीक्षण समितीची स्थापना करण्याबाबतचा प्रस्ताव सादर केला असून त्यानंतर टप्प्याटप्प्याने नोंदीत दुकाने व आस्थापना यांना लागू करण्याचे प्रस्तावित केले आहे. या समितीची संरचना, कार्यपद्धती, निरीक्षणावेळी दिलेले शेरे आदींबाबत गुणवत्तापूर्वक कार्यप्रणाली निश्चित करून त्याची अंमलबजावणी करणे अभिप्रेत आहे. सध्या अस्तित्वात असलेले नोंद झालेले कारखाने, दुकाने व आस्थापना यांचे अधिक प्रभावी निरीक्षण व्हावे तसेच त्यामध्ये पारदर्शकता रहावी आणि एकंदरीत कार्यप्रणालीमध्ये सुसूत्रता यावी व त्याबाबत कालबद्ध कृती आराखडा निश्चित असावा या हेतूने अशा निरीक्षणासाठी राज्यस्तरीय निरीक्षण समिती व गुणवत्तापूर्वक कार्यप्रणाली निश्चित करण्यात आली आहे. कामगार कायद्याची अंमलबजावणी अधिक प्रभावीरित्या व्हावी, पारदर्शक व विकासाभिमुख निरीक्षण योजना निश्चित करण्याचा निर्णय शासनाने घेतला आहे. त्यानुसार ही योजना स्वीकृत करण्यात आली आहे. राज्यस्तरीय निरीक्षण समितीमध्ये मुंबई कामगार आयुक्त हे अध्यक्ष तर सहकामगार आयुक्त, कामगार उपआयुक्त (प्रशासन), कामगार उपायुक्त (औ.स.) आदींचा सदस्यांमध्ये समावेश असून कामगार उपआयुक्त (ग्रा.वि.) हे सदस्य सचिव आहेत. ही राज्यस्तरीय निरिक्षण समिती १८ कामगार कायद्याच्या अंमलबजावणीच्या सनियंत्रणाचे कामकाज पाहणार असून या समितीची कार्यकक्षा ठरवून दिली आहे. त्यानुसार तपासणीच्या निकषानुसार आस्थापना व कारखाने यांचे रॅन्डमायझेशन करून मासिक तपासणी कार्यक्रम तयार करणे, क्षेत्रीय यंत्रणेकडून मासिक तपासणी कार्यक्रमाची अंमलबावणी करून घेणे, निरीक्षण कार्यक्रमावर सनियंत्रण ठेवणे, तपासणीबाबत मार्गदर्शन करणे, निरीक्षणाचे निकष ठरविणे व त्यात बदल करणे, इतर अनुषंगिक कार्यसुद्धा ही समिती पाहणार आहे. यातून उद्योगांना चालना आणि कामगारांचेसु्द्धा हित साधता येणार आहे. (प्रतिनिधी)