शहरं
Join us  
Trending Stories
1
मोठी बातमी : भाजपचं धक्कातंत्र! विधान परिषद निवडणुकीसाठी ५ जणांची यादी जाहीर, कुणाला मिळाली संधी?
2
निवडणूक संपताच पेट्रोल-डिझेल महागणार? केंद्र सरकारनं दिलं मोठं स्पष्टीकरण! काय होणार?
3
१ मे पासून खिशाला कात्री! बँकिंगसह 'हे' मोठे नियम बदलणार; गॅस सिलिंडर स्वस्त होणार की महागणार?
4
PBKS vs RR : 'वंडर बॉय' वैभव सूर्यवंशीनं धु धु धुतलं! मग अर्शदीपनं लो फुलटॉसवर हिशोब केला चुकता
5
‘मुंबई-पुणे एक्स्प्रेस वे’ मिसिंग लिंकवर किती स्पीड जाता येणार?; वेगमर्यादेची नियमावली आली!
6
विदर्भात १ मे पर्यंत पावसाळी ढग; पारा खाली येणार, पण उष्णतेची तीव्रता कायम राहणार
7
गुजरातमध्ये BJPचा डंका! १५ महानगरपालिकांवर कमळ फुलले; आप-काँग्रेस आपटले, कुणाला किती जागा?
8
PBKS vs RR: परफेक्ट सेटअप! १५० kmph वेगवान चेंडूसह पुन्हा प्रियांश आर्यवर भारी पडला जोफ्रा (VIDEO)
9
"हे 'सेल्फ रेडिकलायझेशन'चं प्रकरण, जिहाद करायचा म्हणजे..."; मिरा रोड हल्ल्यासंदर्भात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस स्पष्टच बोलले
10
इराण-अमेरिका युद्धात UAE चा मोठा निर्णय; OPEC आणि OPEC+ गटातून बाहेर पडणार
11
म्हाडाच्या २६४० घरांच्या लॉटरीला मुदतवाढ; १४ मे पर्यंत अर्ज सादर करण्याची मुदत
12
१३६३५७ घन मीटर क्षमता, गायब होते LNG टँकर जहाज; अचानक भारताजवळ दिसले, महिनाभर कुठे होते?
13
इंडियन एअरलाईन बंद पडण्याची शक्यता! इंधनाच्या दरवाढीमुळे सरकारकडे मदतीची याचना; संघटनेकडे साकडे
14
Fastest Chase In IPL History : जे मुंबई इंडियन्सनं करून दाखवलं ते १८ वर्षांत कुणालाच नाही जमलं
15
Sonam Raghuvanshi : “आज पैशाच्या ताकदीपुढे आमचा पराभव”; सोनम रघुवंशीला जामीन मिळताच राजाच्या भावाचा संताप
16
कोलंबिया सरकार ८० हिप्पोंना ठार मारणार; अनंत अंबानी यांनी केली 'वनतारा'मध्ये पाठवण्याची विनंती
17
Top Marathi News LIVE Updates: वरूड-मोर्शी महामार्गावर भीषण अपघात, एकाच कुटुंबातील ३ जण ठार, एक जखमी
18
सोनम रघुवंशी जामिनावर सुटली, पण मेघालयातच अडकली; शिलॉन्ग न्यायालयाचा मोठा निर्णय
19
रशिया, चीनची जर क्षेपणास्त्रे आली तर अमेरिका बचाव करू शकणार नाही; पेंटागनची धक्कादायक कबुली 
20
"बोलने तो दो यार..." किंग कोहलीची शाळेतील विद्यार्थ्यांसमोरील 'बोलंदाजी' चर्चेत (VIDEO)
Daily Top 2Weekly Top 5

तपास मोबाईल लोकेशनवर केंद्रीत

By admin | Updated: July 31, 2014 00:15 IST

दोन दिवसांपूर्वी रात्रीदरम्यान शहरातील ११ वाहनांवर दगडफेक झाली. त्यामध्ये जिल्हा परिषद अध्यक्षांचे वाहन असल्याने ही घटना वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांकडून गांभीर्याने घेतली जात आहे.

वाहन तोडफोडप्रकरण : सिसीटीव्ही कॅमेऱ्याचे फुटेज ठरले व्यर्थ यवतमाळ : दोन दिवसांपूर्वी रात्रीदरम्यान शहरातील ११ वाहनांवर दगडफेक झाली. त्यामध्ये जिल्हा परिषद अध्यक्षांचे वाहन असल्याने ही घटना वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांकडून गांभीर्याने घेतली जात आहे. त्यामुळे स्थानिक गुन्हे शाखा पोलीस पथकापुढे या घटनेचा छडा लावण्याचे मोठे आव्हान उभे ठाकले आहे. दगडफेक करणाऱ्यांची ओळख अद्याप पटलेली नाही. त्यामुळे मोबाईल लोकेशनवर हा तपास केला आहे. यापूर्वी सीसीटीव्ही कॅमेऱ्याच्या फुटेजचा आधार घेण्यात आला मात्र त्याचा फारसा उपयोग झालेला नाही.शहरात दुचाकीवरून धुमाकूळ घालत अज्ञात दोन तरूणांनी दोन दिवसांपूर्वी रात्रीदरम्यान तब्बल ११ वाहनांवर दगडफेक केली. त्यामध्ये जिल्हा परिषदेचे अध्यक्ष प्रवीण देशमुख यांच्या वाहनालाही लक्ष्य करण्यात आले. घटनेनंतर या संदर्भात वाहन धारक आणि राष्ट्रवादी काँग्रेसतर्फे तीव्र प्रतिक्रीया उमटल्या. जिल्हा परिषद अध्यक्ष प्रवीण देशमुख यांच्यावर तर हा भ्याड हल्ला नव्हता ना, अशी शंकाही उपस्थित करण्यात आली. या घटनेची गंभीर दखल घेत जिल्हा पोलीस अधीक्षक रंजनकुमार शर्मा यांनी घटनेचा तपास स्थानिक गुन्हे शाखेकडे सोपविला. सुरूवातील सिसीटीव्ही कॅमेऱ्याचे फुटेज पडताळून दगडफेक करणाऱ्या तरूणांची ओळख पटविण्याचा प्रयत्न झाला. रात्रीदरम्यान ही घटना घडल्याने सीसीटीव्ही कॅमेऱ्यात अस्पष्ट चित्रीकरण झाले. त्यात केवळ धुमाकूळ घालणाऱ्या तरूणांनी पल्सर दुचाकीचा वापर केल्याचे निष्पन्न झाले. त्यांचे चेहरे मात्र स्पष्टपणे दिसत नाही. त्यामुळे पोलिसांनी हा तपास मोबाईल लोकेशनवर केंद्रीत केला आहे. ज्या मार्गांवर वाहनांवर दगडफेक झाली. त्या मार्गावरील प्रत्येक चौकातून त्यावेळी कुणा-कुणाच्या मोबाईलचे लोकेशन येत आहे. याची बारकाईने पडताळणी केली जाणार आहे. जिल्हा परिषद अध्यक्ष प्रवीण देशमुख यांच्या वाहनावर दगडफेक करण्यात दुखावलेले पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांचा तर हात नाही ना, संशयाची सुई आपल्याकडे वळू नये म्हणून त्यांच्यासोबतच इतरांच्या वाहनांवर दगडफेक करून बनाव तर निर्माण केला नाही ना, याची गोपनीय माहिती काढली जात आहे. असे असले तरी अद्याप पोलिसांना फारसे काही निष्पन्न झालेले नाही.कॉलडिटेल्सने दहशतजिल्हा परिषद अध्यक्षांच्या वाहनावरील दगडफेकीत त्यांच्यापासून दुखावलेल्याचा तर सहभाग ना, याची पडताळणी करण्यासाठी पोलीस मोबाईल लोकेशन आणि कॉलडीटेल्स घेत असल्याची माहिती पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांकडे आहे. त्यातूनच मोबाईल लोकेशन व कॉलडीटेल्सची धास्ती अनेकांनी घेतली आहे. गांजाच्या नशेत कृत्यवडगाव रोड हद्दीत राहणाऱ्या एका प्रतिष्ठीत कुटुंबातील तरूण गांजाच्या नादी लागला. यापूर्वी तो एका गुन्ह्यात सापडला. मात्र वडीलांचे राजनैतीक संबंध आडवे आल्याने त्यावेळी त्याच्यावर ठोस कारवाई झाली नाही. त्याच तरूणाने आपल्या साथीदाराच्या मदतीने बदली प्रकरणातून हा वचपा काढल्याची चर्चा आहे. मात्र अद्याप पोलिसांनी अशा कुठल्याही तरूणाला चौकशीसाठी ताब्यात घेतलेले नाही. (स्थानिक प्रतिनिधी)