शहरं
Join us  
Trending Stories
1
TECH सेक्टरमध्ये खळबळ! Meta-Microsoft च्या प्लॅननं २३००० कर्मचाऱ्यांच्या नोकऱ्या धोक्यात
2
मुंबईत बांधकाम सुरू असलेल्या इमारतीवरून ९ जण कोसळले, एकाची प्रकृती चिंताजनक 
3
Top Marathi News LIVE Updates: विधानपरिषदेसाठी भाजपाने नावं पाठवली, मविआकडून उद्धव ठाकरेंचं नाव आघाडीवर
4
बेस्ट आहे Post Office ची ‘ही’ स्कीम; केवळ व्याजातून होईल ₹१२,००,००० पेक्षा जास्त कमाई
5
पहिले मुलांसाठी दिले ₹५२ हजार कोटी; आता रुग्णालयाला ६९०० कोटींचं दान, पाहा कोण आहे हे दांपत्य?
6
संशयास्पद हालचाली, RPF पथकाची पाळत; सिद्धेश्वर एक्सप्रेसमधील दरोड्याचा प्रयत्न हाणून पाडला
7
"तू मला आवडतेस, माझ्याकडे दैवी शक्ती..."; नाशिकच्या आणखी एका भोंदूबाबाचा कारनामा उघड
8
Stock Markets Today: शेअर बाजाराची घसरणीसह सुरुवात; सेन्सेक्स ४०० अंकांनी खाली, Pharma-IT शेअर्समध्ये मोठी विक्री
9
आजचे राशीभविष्य - २४ एप्रिल २०२६, शुभ फलदायी दिवस, नोकरी, व्यवसायात अनुकूल वातावरण राहील
10
IPL: इश्क वाला लव्ह! अनंत अंबानी - राधिका मर्चंट यांचा MI vs CSK मॅचमधील Cute Video चर्चेत
11
ना खेळपट्टी, ना कुठली सबब, हार्दिक पांड्याने 'या' खेळाडूंवर फोडलं मुंबईच्या पराभवाचं खापर
12
सीता नवमी २०२६: आयुष्यातील संकटांनी खचून गेलात? मग माता सीतेचा 'हा' एक गुण तुम्हाला उभारी देईल!
13
₹१४५ कोटींचा कथित FD घोटाळा आला समोर; ED चे अनेक ठिकाणी छापे, 'या' नामांकित बँकेत पैसे होते जमा
14
"जर दीदीने पैसे दिले असते तर..."; IRS अधिकाऱ्याच्या मुलीची हत्या करणाऱ्या आरोपीचा कबुलीनामा
15
Mumbai: देशातील ३५ टक्के गर्भश्रीमंत राहतात मायानगरी मुंबईत! 
16
Pune Water Shortage: पुण्याच्या पेठांमध्ये सकाळपासून पाणी नाही; पाण्यासाठी दुपारपर्यंत पाहावी लागणार वाट
17
लव्ह अफेअरचा दुर्दैवी अंत! २ तास गर्लफ्रेंडच्या ३ भावांनी मिळून बेदम मारले; बॉयफ्रेंडचा मृत्यू
18
रिक्षा, टॅक्सी चालकांना १० वाक्ये तरी मराठीत बोलता आली पाहिजेत
19
Donald Trump: इराणी लहान बोटी कुठेही दिसल्या तर उडवून टाका, ट्रम्प यांचे नौदलाला आदेश
20
प. बंगाल, तामिळनाडूत ‘मत रेकॉर्ड’, विधानसभा निवडणुकीत मतदारांचा उत्साह
Daily Top 2Weekly Top 5

महिनाभरात पाच हजारांवर नमुन्यांची तपासणी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 7, 2020 05:00 IST

यवतमाळ जिल्ह्यासह वाशिम व बुलडाणा येथून आलेल्या नमुन्यांची तपासणी केली जाते. २४ तासात दीडशे नमुने तपासणीची क्षमता या लॅबमध्ये आहे. सहा तंत्रज्ञ व प्राध्यापकांच्या अहोरात्र परिश्रमामुळे हे शक्य होत आहे. सूक्ष्मजीवशास्त्र विभागाकडून व्हायरॉलॉजी लॅब चालविण्यात येते. सध्या कोरोना तपासणीवरच पूर्ण फोकस आहे.

ठळक मुद्दे‘मेडिकल’ची कोरोना लॅब : २४ तासात दीडशे नमुने, वाशिम, बुलडाण्याचाही भार

सुरेंद्र राऊत।लोकमत न्यूज नेटवर्कयवतमाळ : येथील वसंतराव नाईक शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात जून महिन्यात कोरोना लॅब कार्यान्वित झाली. या लॅबमध्ये महिनाभरात एकूण पाच हजार नमुन्यांची यशस्वी तपासणी करण्यात आली आहे.यवतमाळ जिल्ह्यासह वाशिम व बुलडाणा येथून आलेल्या नमुन्यांची तपासणी केली जाते. २४ तासात दीडशे नमुने तपासणीची क्षमता या लॅबमध्ये आहे. सहा तंत्रज्ञ व प्राध्यापकांच्या अहोरात्र परिश्रमामुळे हे शक्य होत आहे. सूक्ष्मजीवशास्त्र विभागाकडून व्हायरॉलॉजी लॅब चालविण्यात येते. सध्या कोरोना तपासणीवरच पूर्ण फोकस आहे. याशिवाय इतरही विषाणू संसर्गाची तपासणी या लॅबमध्ये करणे शक्य आहे. दिवसरात्र कोरोना लॅब चालू असल्याने रुग्णांचा शोध घेणे सहज शक्य होत आहे. संशयित रुग्णाचा किमान २४ तासातच त्याचा अहवाल मिळत असल्याने वैद्यकीय यंत्रणेला उपचाराचे नियोजन करताना मोठी मदत होत आहे.यापूर्वी नागपूर व अकोला येथे स्वॅब तपासणीला पाठविले जात होते. त्याचा अहवाल येण्यास विलंब लागत होता. आता ती प्रतीक्षा संपली आहे. उलट वाशिम व बुलडाणा या जिल्ह्यातील रुग्णांचे स्वॅब तपासण्यात येत आहे. विभाग प्रमुख डॉ. विवेक गुजर यांच्या नियंत्रणात या लॅबचे कामकाज सुरू आहे.३ जुलैपर्यंत ३३९ नमुन्यांचा अहवाल पॉझिटिव्हकोरोना लॅब ३ जूनला सुरू झाली. तपासलेल्या पाच हजार नमुन्यांमध्ये सर्वाधिक यवतमाळातील नमुन्यांचा समावेश आहे. त्यानंतर वाशिम व बुलडाणाचा क्रमांक लागतो. एकूण ३३९ नमुने पॉझिटिव्ह आले. यात यवतमाळचे १९७, वाशिम १०१, बुलडाणा ४१ अशी आकडेवारी आहे.

टॅग्स :corona virusकोरोना वायरस बातम्या