शहरं
Join us  
Trending Stories
1
Election Results 2026 LIVE: विजयी घोषणेपूर्वीच सुनेत्रा पवारांचं सर्व कार्यकर्त्यांना भावूक आवाहन, म्हणाल्या...
2
ममता बॅनर्जी वि. सुवेंदू अधिकारी...! भवानीपूरमध्ये आतापर्यंत सात फेऱ्या झाल्या, प्रत्येक फेरीचा निकाल आला...
3
तृणमूल काँग्रेस पराभवाच्या उंबरठ्यावर, ममता बॅनर्जी हताश, पण सोडली नाही विजयाची आस, कार्यकर्त्यांना केलं असं आवाहन
4
थलापती विजयचे राज्यभरात ८५ हजार फॅन क्लब्स; TVK च्या विजयात निभावली सर्वात मोठी भूमिका
5
आसनसोलमध्ये तृणमूलच्या कार्यालयात तोडफोड, बॉम्ब सापडला; ममता बॅनर्जींच्या घराबाहेर 'जय श्री राम'च्या घोषणा
6
केरळमध्ये 'या' पक्षाने अवघ्या २७ जागा लढवल्या, त्यातील २३ जागांवर पुढे; २१ उमेदवार मुस्लीम
7
Thalapathy Vijay Net Worth: अभिनेता ते राजकारणी; ६०० कोटींपेक्षा अधिकचं साम्राज्य, कशी आहे थलापति विजय यांची लक्झरी लाईफ 
8
लग्नानंतर सासरची पायरी चढण्याआधीच मोडला संसार! २०० रुपयांच्या नोटेमुळे नवरदेवाचा असा झाला भांडाफोड
9
तीन राज्यं जिंकली, पण दोन राज्यांत भाजपाची निराशा; भोपळा फोडला, पण हवं तसं 'कमळ' फुलेना!
10
दाक्षिणात्य सुपरस्टार विजयला 'थलापती' का म्हणतात? जाणून घ्या ३२ वर्षे जुनी कहाणी!
11
IPL 2026: RCBला मोठा धक्का! तुफान घोडदौड सुरू असताना स्टार खेळाडू संघ सोडून घरी परतला
12
भीषण अपघात! प्रभू श्रीरामाचं दर्शन घेऊन परतणाऱ्या कुटुंबावर काळाचा घाला; ६ जणांचा मृत्यू
13
तामिळनाडूमध्ये 'थलापती' विजय बहुमतापासून दूर; एआयडीएमके जाण्यापूर्वीच काँग्रेसने पाठिंब्याचा हात पुढे केला...
14
युद्ध थांबणार की ठिणगी पडणार? इराणचा पाकिस्तानमार्गे ट्रम्प यांना निरोप; अटी वाचून व्हाल थक्क!
15
Video - बापरे! चावीच हरवली... कर्नाटकात हातोड्याने तोडावं लागलं EVM स्ट्रॉन्ग रूमचं कुलूप
16
रितेश देशमुखचा वेडा चाहता! रत्नागिरीच्या पठ्ठ्याने 'राजा शिवाजी' सिनेमा पाहण्यासाठी बुक केलं अख्खं थिएटर
17
अंगारक संकष्ट चतुर्थी २०२६: भीती, नैराश्य, संकटांपासून मुक्तीसाठी पठण करा 'गणेश रक्षा मंत्र'
18
केरळमध्ये मुख्यमंत्री कोण? निकाल नाही आले तोवर काँग्रेसच्या नेत्यांमध्ये लॉबिंग सुरु झाली, १० वर्षांनी...
19
ममता बॅनर्जी यांच्या बालेकिल्ल्याला सुरुंग लावणारे भाजपचे '५' नायक; या नेत्यांनी शांतपणे बंगालची समीकरण बदलली
20
IPL 2026: 'टेबल टॉपर' पंजाब किंग्जचा सलग दुसरा पराभव, श्रेयस अय्यर 'या' गोष्टीवर संतापला...
Daily Top 2Weekly Top 5

यवतमाळात अतिक्रमण हटविले

By admin | Updated: October 10, 2015 01:59 IST

नगरपरिषदेने शहरातील अतिक्रमण काढण्याची मोहीम हाती घेतली आहे. याची सुरूवात जिल्हाधिकारी कार्यालय परिसरापासून करण्यात आली.

शेड काढले : जिल्हाधिकारी कार्यालय परिसरातील टपऱ्या हटविल्या यवतमाळ : नगरपरिषदेने शहरातील अतिक्रमण काढण्याची मोहीम हाती घेतली आहे. याची सुरूवात जिल्हाधिकारी कार्यालय परिसरापासून करण्यात आली. अडीच दिवस चालणाऱ्या या मोहिमेत जाजू चौक ते मुख्य बाजारापेठ परिसरातील दुकांनाचे रस्त्यावर असलेले शेड काढण्यात आले. जिल्हाधिकारी सचिंद्र प्रताप सिंह यांनी खरमरीत इशारा दिल्यानंतर नगरपरिषदेने पुन्हा अतिक्रमण काढण्याची मोहीम हाती घेतली. याची सुरूवातच गुरूवारी दुपारी जिल्हाधिकारी कार्यालय परिसरातील चहाटपऱ्या उचलून करण्यात आली. यापूर्वीसुध्दा तीन ते चार वेळा येथील अतिक्रमण काढण्यात आले आहेत. मात्र यावर कायस्वरूपी तोडगा अद्याप निघालेला नाही. त्यानंतर पालिका प्रशासनाने शुक्रवारी सकाळपासून जाजू चौक ते मेन लाईन परिसरातील अतिक्रमण काढले. अनेक दिवसांपासून वाद सुरू असलेल्या साडी दुकानाच्या अतिक्रमणावर शेवटी नगरपरिषदेचा बुलडोजर चालला. त्यानंतर आपली काही गय होणार नाही म्हणून इंदिरा गांधी मार्केट परिरातील अनेक बड्या दुकानदारांनी आपले रस्त्यावर आलेले शेड काढण्यास सुरूवात केली. सायंकाळपर्यंत ही मोहीम सुरू होती. एकंदर रस्त्यावरच्या २५० टपऱ्यांचे अतिक्रमण काढण्यात आले. ही मोहीम शनिवारीसुध्दा राबविण्यात येणार असल्याचे सांगण्यात आले. या अडीच दिवसांच्या मोहिमेत केवळ नगरपरिषद परिरातील काही तुरळक अतिक्रमण काढण्यात आले. तसेच रस्त्यावर व्यवसाय करणाऱ्या गरीब व्यवसायिकांना हुसकावून लावण्यात आले. ही मोहीम शनिवार होताच परत गुंडाळून ठेवण्यात येणार आहे. त्यामुळे बड्या व्यावसायिकांचे पक्के अतिक्रमण तसेच अबाधीत राहणार आहे. याकडे पालिका प्रशासनाने लक्ष देण्याची आवश्यकता आहे. या मोहिमेत उपविभागीय अधिकारी विकास माने, तहसीलदार अनुप खांडे, नगरपरिषद मुख्याधिकारी सुदाम धुपे, नगरपरिषद कर्मचारी, वडगाव रोड आणि शहर ठाण्यातील पोलीस उपनिरीक्षक सहभागी झाले होते. पोलीस बंदोबस्तातच ही मोहीम राबविण्यात आली. (कार्यालय प्रतिनिधी)