शहरं
Join us  
Trending Stories
1
“असा नेता लाभणे भारताचे भाग्य”; प. बंगाल विजयानंतर ट्रम्प यांनी केले PM मोदींचे खास अभिनंदन
2
पुण्यात आजोबाकडून अल्पवयीन मुलीवर अत्याचाराचा प्रयत्न; नागरिकांच्या सतर्कतेमुळे अनर्थ टळला
3
Sanju Samson Record : संजूनं साधला 'द्विशतकी' डाव; किंग कोहली-KL राहुलनंतर अशी कामगिरी करणारा तो पहिलाच
4
“ममता दीदी अन् किशोरी पेडणेकर बहिणी, दोघींना खुर्चीचा मोह सुटत नाही”; कुणी केली खोचक टीका?
5
संजूचा धमाका; कार्तिक शर्मानंही दाखवला दम! DC ला पराभूत करत CSK नं प्लेऑफ्सची दावेदारी केली भक्कम
6
पश्चिम बंगाल, आसाम झाले, आता पुढचा नंबर कोणाचा? BJPचे टार्गेट सेट; काँग्रेसचे टेन्शन वाढणार?
7
निवडणूक हरताच ममतादीदींना इंडिया आघाडी आठवली; म्हणाल्या, “राजीनामा देणार नाही, सगळे पाठिशी”
8
“सेक्यूलर पक्ष भाजपाला रोखू शकत नाही, जनादेश स्वीकारा”; प. बंगाल निकालावर ओवेसी थेट बोलले
9
काय रे देवा! दोघांच्या गोंधळात तिसऱ्याचा फायदा; चेन्नईकरांनी Sameer Rizvi चा सोपा झेल सोडला (VIDEO)
10
“ममतादीदी पडतील असे कधी वाटले नाही”; पश्चिम बंगाल निवडणूक निकालावर मनोज जरांगेंनाही शंका
11
ममता बॅनर्जींचा CMपद सोडण्यास नकार, आता भाजप सत्तास्थापना कशी करणार? हे आहेत २ पर्याय
12
कोणत्याही ट्रेनमध्ये सहजपणे लोअर बर्थ कसा मिळेल? IRCTCनेच सांगितली खास ट्रिक, तुम्ही वापरली का?
13
चौकट मोडली, T20 मध्ये छाप सोडली! केएल राहुल म्हणतो; "प्रत्येक वेळी मनासारखं घडत नाही, पण…"
14
टी-२० क्रिकेटमध्ये टीम इंडियाला तोड नाही; IPL दरम्यान ICC नं केली मोठी घोषणा
15
TMC ला गळती; मनोज तिवारींचा पक्षाला रामराम, ममतांवर केला ५ कोटी मागितल्याचा आरोप
16
इंडिगो विमानात पॉवर बँकचा स्फोट; विमानतळावर प्रवाशांची आपत्कालीन सुटका, एक महिला जखमी
17
Latest Marathi News LIVE: गोंदियात वादळी वाऱ्यासह अवकाळी पावसाची हजेरी; शेतकरी चिंतेत
18
IPL 2026 : पलटवार करण्यासाठी DC नं खेळला हा डाव! मॅच विनरच्या कमबॅकसह CSK ची ताकद वाढली
19
पश्चिम बंगालमधील भाजपा विजयानंतर पाकची मोठी प्रतिक्रिया; थेट युद्धाची भाषा केली, म्हणाले...
20
Budget Travel: अवघ्या २० हजारांत अनुभवा केरळचं सौंदर्य; वायनाडला भेट देण्यापूर्वी हे नक्की वाचा!
Daily Top 2Weekly Top 5

निधी आरक्षणात ओबीसींवर अन्याय

By admin | Updated: November 29, 2015 03:11 IST

देशभरात ओबीसींची संख्या सर्वाधिक आहे. लोकसंख्येनुसार निधीची तरतूद होणे गरजेचे आहे.

चंद्रशेखर यादव : भारतीय पिछडा शोषित संघटनेची पत्रकार परिषदयवतमाळ : देशभरात ओबीसींची संख्या सर्वाधिक आहे. लोकसंख्येनुसार निधीची तरतूद होणे गरजेचे आहे. प्रत्यक्षात तसे घडले नाही. सरकारची त्या दृष्टीने काम करण्याची इच्छा नाही. यामुळे ओबीसी संघटनांनी एकत्रित लढा दिला तरच आरक्षणानुसार निधी मिळेल, असे मत भारतीय पिछडा शोषित संघटनेचे राष्ट्रीय अध्यक्ष डॉ. चंद्रशेखर यादव यांनी पत्रकार परिषदेत व्यक्त केले.ओबीसींचा सर्वांगीण विकास होणे गरजेचे आहे. त्यासाठी ओबीसींची जनगणना होणे आवश्यक आहे. मात्र सत्ताधाऱ्यांना ओबीसींची संख्या सांगणे धोक्याचे वाटत आहे. खुर्ची जाण्याचा धोका त्यांना वाटतो. यामुळे ओबीसींच्या मागण्यांसाठी सर्वांनी एकत्र येऊन काम करण्याची गरज असल्याचे मत संघटनेच्या राष्ट्रीय अध्यक्षांनी व्यक्त केले. सध्याचे सरकार संघ चालवित आहे. भाजपा आणि मोदी संघाचा मुखवटा असल्याचे ते म्हणाले. महाराष्ट्रात सामाजिक जागृती आहे. मात्र राजकीय जागृती नसल्याचे ते म्हणाले. बुद्धीजीवी लोकांनी पुढे येण्याची आवश्यकता असल्याचे मत त्यांनी व्यक्त केले. पत्रकार परिषदेला रमेश पिसे, अनिल घुसे, दीपक वाघ, गुणवंत गणवीर, विलास काळे उपस्थित होते. (शहर वार्ताहर)