कपाशीवर पॅराविल्ट रोगाचा प्रादुर्भाव

By Admin | Updated: September 3, 2014 00:05 IST2014-09-03T00:05:03+5:302014-09-03T00:05:03+5:30

मागील चार दिवसात तालुक्यात झालेल्या जास्त पर्जन्यमानामुळे शेतामधील खोलगट भागात पाणी साचल्याने कपाशी पिकांची झाडे मलूल झालेली आहेत. या पिकावर पॅराविल्ट रोगाचा प्रादुर्भाव झाल्याने

Influence of paravaluit disease on cotton | कपाशीवर पॅराविल्ट रोगाचा प्रादुर्भाव

कपाशीवर पॅराविल्ट रोगाचा प्रादुर्भाव

दारव्हा : मागील चार दिवसात तालुक्यात झालेल्या जास्त पर्जन्यमानामुळे शेतामधील खोलगट भागात पाणी साचल्याने कपाशी पिकांची झाडे मलूल झालेली आहेत. या पिकावर पॅराविल्ट रोगाचा प्रादुर्भाव झाल्याने शेतकरी वर्गात चिंतेचे वातावरण दिसून येत आहे.
२८ आॅगस्टपासून तालुक्यात दमदार पावसाने हजेरी लावली. गत चार दिवसातच २०४ मि.मी. पावसाची नोंद करण्यात आली आहे. तालुक्याची पावसाची सरासरी ८४४ मि.मी. पावसाची आहे. सरासरीच्या ७५ टक्के पाऊस तालुक्यात झाला आहे. सतत चार दिवस कोसळलेल्या पावसाने शेतकऱ्यांच्या शेतातील विशेषत: खोलगट भागामध्ये पावसाच्या पाण्याचा योग्य निचरा न झाल्याने त्या ठिकाणचे कपाशीची झाडे मलूल होत आहेत. कपाशीच्या झाडाचे बारीक तंतूमय मुळांचे जमिनीशी संपर्क तुटल्यामुळे त्या झाडांची अन्नद्रव्य शोषण करण्याची क्रीया मंदावते. त्यामुळे झाडे मर सदृश रोगाने ग्रासल्या जात आहेत. यासंदर्भात दारव्हा तालुका कृषी अधिकारी अंगाईत यांच्याशी संपर्क साधला असता, मलूल झालेले अथवा होत असताना कॉपर आॅक्सीक्लोराईड या बुरशीनाशकाची २५ ते ३० ग्रॅम १० लिटर पाण्यात मिसळून सोबत १०० ग्रॅम युरिया टाकावा व हे द्रावण स्प्रे पंपाने नोझल काढून बाधित झाडांच्या मुळांच्या सभोवताल १०० मि.ली.पर्यंत प्रती झाड टाकावे.
शक्य असल्यास फवारणी करावी तसेच मलूल झालेल्या झाडांच्या बुंध्याजवळ पायाने दाबावे त्यामुळे बारीक मुळांची पुन: जमिनीशी संपर्क होण्यास मदत होईल, अशी माहिती त्यांनी ‘लोकमत’ला दिली. पॅराविल्ट हा रोग भौतिक अवस्था व बुरशीमुळे होत असून शेतकऱ्यांनी लक्षणे दिसताच त्वरित सावधानता बाळगून योग्य उपाययोजना करण्याचे आवाहनही त्यांनी केले आहे. (प्रतिनिधी)

Web Title: Influence of paravaluit disease on cotton