शहरं
Join us  
Trending Stories
1
"५१ अंशांच्या उन्हातही काही होणार नाही, माझ्या गाडीत AC चालत नाही"; ज्योतिरादित्य शिंदेंनी सांगितला उष्णतेच्या लाटेपासून बचावाचा देशी उपाय!
2
जाणून-बुजून तुमचा स्मार्टफोन स्लो केला जातोय; युरोप मोबाईल कंपन्यांवर भडकला, कंटाळून नवा घ्यावा म्हणून...
3
भारतापाठोपाठ आता 'या' देशालाही रशियन तेलासाठी सूट! ट्रम्प अचानक उदार का झाले?
4
राज्यात वीज पुरेशा प्रमाणात उपलब्ध, मात्र व्यवस्थेतील कमतरतेमुळे नागरिकांना मन:स्ताप- चंद्रशेखर बावनकुळे
5
Video - अग्नितांडव! हापूरमध्ये आग; ७० झोपड्यांसह २ कारखाने जळून खाक, कोट्यवधींचं नुकसान
6
स्वादिष्ट! पंजाबची फिरनी ते ओडिशाची खीर; जगातील सर्वोत्कृष्ट पदार्थांमध्ये 'या' ६ पदार्थांची बाजी
7
RCB ला मोठा धक्का! DC विरुद्धच्या सामन्यातूनही धडाकेबाज फलंदाज OUT
8
ऑटो कंपन्यांमध्ये खळबळ! २०२८ पासून फक्त इलेक्ट्रीक दुचाकी विकता येणार, दिल्लीत पेट्रोलच्या दुचाकी बॅन होणार
9
सुपर ओव्हरमधील विकेट्स आणि धावा खेळाडूच्या खात्यात का जमा होत नाहीत? जाणून घ्या त्यामागचं कारण
10
Top Marathi News Live: काळजी घ्या, उष्णतेची लाट होरपळून काढणार! IMD चा महाराष्ट्रातील 'या' भागांना सर्तकतेचा इशारा
11
"घराणेशाही वाटेल...", अमोल मिटकरींकडून विधान परिषदेसाठी 'या' नावाची शिफारस; ट्विट करुन केली मागणी
12
"हा सल्ला उद्धव ठाकरेंसाठी आहे का?"; संजय राऊतांच्या निवडणुकीबाबतच्या विधानावर भाजपचा पलटवार
13
पाकिस्तान मध्यस्थ होण्याच्या लायक नाही! इराणने बुरखा फाडला; ट्रम्प म्हणाले, इराणच्या पाईपलाईन्स फुटणार... 
14
Mitali Bag : TMC खासदार मिताली बाग यांच्या कारवर हल्ला; भाजपावर गंभीर आरोप, रडत रडत म्हणाल्या...
15
Mind Soul: थकवा, ताण की राग? तुमच्या प्रत्येक मानसिक समस्येवर आहे आहे एक सोपा उपाय
16
IPL 2026: तर Super Over झालीच नसती..!! पंचाच्या चुकीमुळे LSGवर आली पराभवाची वेळ? काय घडलं
17
भारत-न्यूझीलंडदरम्यान ऐतिहासिक ट्रेड डीलवर शिक्कामोर्तब! ७०% भारतीय सामानांवर ड्युटी नाही, जाणून घ्या
18
टॅक्स बचतीसाठी पत्नीच्या नावे मालमत्ता खरेदी फायद्याची? 'ही' एक गोष्ट तुमच्यासाठी ठरू शकते डोकेदुखी
19
Jara Hatke: शहाळ्याची मलई की गोड पाणी? तुमची निवड कधीच चुकणार नाही; जाणून घ्या सिक्रेट!
20
'काकी आय लव्ह यू', म्हणणं टवाळखोरांना पडलं महागात, तरुणीने भररस्त्यात शिकवला धडा
Daily Top 2Weekly Top 5

जिल्ह्यात कोरोनाचा प्रभाव वाढला; सॅनिटायझर वापर मात्र घटला!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 17, 2021 05:00 IST

महाराष्ट्रात कोरोनाची दुसरी लाट आल्याचा निर्वाळा आरोग्य विभागाने जाहीर केला आहे. आरोग्यमंत्र्यांच्या सूचनेनंतर नागरिकांनी स्वत:ची खबरदारी घेण्याची नितांत गरज आहे. कोरोनाचे रुग्ण एकीकडे वाढत आहे. दुसरीकडे नागरिक बिनधास्त झाले आहेत. सॅनिटायझर काहीतरी बनवेगिरी आहे, असा समज पसरला आहे. मुळात सॅनिटायझरचा कितीवेळा वापर करावा याची माहिती अनेकांना नाही. पूर्वीच्या तुलनेत सुरक्षित सॅनिटायझर बाजारात आले आहे.

ठळक मुद्देनागरिकांमधील दहशत संपली : वारंवार हात धुण्याचा होतो त्रास

लोकमत न्यूज नेटवर्कयवतमाळ : कोरोनाचा उद्रेक होताच पहिल्या टप्प्यात सॅनिटायझरचा अमाप वापर झाला. दर दिवसाला किमान १७ हजार ५०० बाॅटल्स विकल्या जात होत्या. आता दर दिवसाला १५० ते २०० सॅनिटायझर बाॅटल विकल्या जात आहेत. यातून नागरिकांमध्ये सॅनिटायझरच्या बाबतीत उदासीनता दिसून येते. महाराष्ट्रात कोरोनाची दुसरी लाट आल्याचा निर्वाळा आरोग्य विभागाने जाहीर केला आहे. आरोग्यमंत्र्यांच्या सूचनेनंतर नागरिकांनी स्वत:ची खबरदारी घेण्याची नितांत गरज आहे. कोरोनाचे रुग्ण एकीकडे वाढत आहे. दुसरीकडे नागरिक बिनधास्त झाले आहेत.सॅनिटायझर काहीतरी बनवेगिरी आहे, असा समज पसरला आहे. मुळात सॅनिटायझरचा कितीवेळा वापर करावा याची माहिती अनेकांना नाही. पूर्वीच्या तुलनेत सुरक्षित सॅनिटायझर बाजारात आले आहे. मात्र, त्याची विक्री मोठ्या प्रमाणात घटली आहे. यातून रुग्णांची संख्या वाढत आहे. अशा स्थितीत प्रत्येकाने स्वत:ची काळजी स्वत: घेणे गरजेचे झाले आहे.

एकवेळा हाताला सॅनिटायझर लावल्यावर ते ३० ते ४५ मिनिट काम करते. याचा अवेअरनेस अनेकांना नाही. याच्यात जाणीवजागृती झाली नाही. यामुळे प्रत्येक मिनिटाला सॅनिटायझर हाताला लावण्यात आले. यातून हाताला इजा झाली.- पंकज नानवाणी,  अध्यक्ष,केमिस्ट अँड ड्रगिस्ट असोसिएशन

  ९० टक्के विक्री घटली

कोरोनाचा प्रकोप दिवसेंदिवस वाढत आहे. याच सुमारास नागरिकांकडून कोरोनाच्या नियमांची पायमल्ली होताना दिसत आहे. नागरिक वारंवार हात धुवून थकले आहेत. यामुळे सॅनिटायझरचा वापर घटला आहे.

पूर्वी नागरिकांना कोरोनाची फार भीती वाटत होती. आता प्रकोप वाढल्यानंतरही ही भीती कमी झाली आहे. हाताला सॅनिटायझर लावले नाही तरीही कोरोना इफेक्ट करत नाही, असा गैरसमज पसरला आहे.

सर्वसामान्य नागरिकांना सॅनिटायझर विकत घेणे परवडत नाही. यामुळे नागरिक सॅनिटायझरचा वापर करत नाहीत. याशिवाय याला पर्याय असलेल्या साबणाचाही वापर होत नाही. यातून असुरक्षितता अधिक वाढली आहे.

सॅनिटायझरच्या अति वापराने हाताला ॲलर्जी झाल्याचे प्रकार पुढे आले आहेत. अनेकांच्या हाताला पुरळ आले, तर अनेकांची स्कीन यामुळे प्रभावित झाली आहे. यातून नागरिकांनी सॅनिटायझरचा वापर टाळला आहे.

सर्वसामान्य नागरिकांच्या प्रतिक्रिया

सॅनिटायझरचा वापर आम्ही करत नाही. सर्वसाधारण माणसांना तो परवडणारा नाही. अनेकांना त्यावर विश्वास नाही. मात्र, मी स्वत: स्वच्छ पाण्याने हात वारंवार धुते. प्रत्येकाने स्वत:ची काळजी घेण्याची गरज आहे.- प्रमाेदिनी रामटेके, यवतमाळ

पूर्वी दिवसभरात १० ते १२ वेळा सॅनिटायझरने हात धुतले जात होते. मध्ये पेशंट कमी झाले. यामुळे हात धुण्याची सवय कमी झाली. आता लस आली. यामुळे सॅनिटायझर वापर होत नाही. मात्र, सुरक्षितता बाळगणे गरजेचे आहे.- सतीश कांबळे, यवतमाळ

 

टॅग्स :corona virusकोरोना वायरस बातम्या