शहरं
Join us  
Trending Stories
1
Rahul Gandhi: ‘भारताचा आत्मा वाचवण्यासाठीच विधेयक रोखले!’- राहुल गांधी
2
PM Modi: महिला आरक्षण रोखून विरोधकांनी पाप केले; त्यांना शिक्षा मिळणारच: पंतप्रधान मोदी
3
Iran fires on Indian ships: होर्मुजच्या सामुद्रधुनीमध्ये भारतीय जहाजांवर गोळीबार; इराणचे पुन्हा निर्बंध 
4
मोठी अपडेट! गोळीबारात एक जहाज होर्मुझमधून निसटले, इराणने भारताची १४ जहाजे रोखलेली
5
IPL 2026 : मलिंगाचा भेदक मारा; महागडा प्रफुलही शेवटी चमकला! CSK ला रोखत SRH नं मैदान मारलं
6
हा तर डिस्ट्रेस एड्रेस! पंतप्रधान मोदींच्या संबोधनावर काँग्रेसकडून पलटवार झाला; खर्गे म्हणाले, हताश होऊन पंतप्रधान...
7
आयुष म्हात्रेनं लंगडत लंगडत धाव घेतली; धोका पत्करुन डाव खेळला तोही फसला! पण खरंच याची गरज होती का?
8
भारतीय जहाजांवर हल्ला केल्यानंतर इराणची मोठी घोषणा; आता युद्ध संपेपर्यंत होर्मुझ ताब्यात ठेवणार...
9
"काल आमचे संख्याबळ कमी पडले, पण..."; महिला आरक्षणावरून PM मोदींचा निर्धार
10
संजू सॅमसनमध्ये दिसली MS धोनीची झलक; यशस्वी रिव्ह्यूसह CSK ला मिळवून दिली अभिषेकची विकेट
11
"स्त्री सर्व काही विसरू शकते, पण...!" महिला आरक्षण विधेयक पाडल्यावरून पंतप्रधान मोदी संतापले, भ्रूण हत्या संबोधले
12
"तुम्हीच परवानगी दिली आणि आता गोळीबार करताय?" भारतीय कॅप्टनचा इराणच्या नेव्हीकडून विश्वासघात,रेडिओवरील थरार समोर
13
Abhishek Sharma Fastest Fifty : अभिषेकची वादळी खेळी! रैना, ईशानला मागे टाकत वैभव सूर्यवंशीची बरोबरी
14
"विरोधकांनी राजकारण करून विधेयक मंजूर होऊ दिले नाही...", महिला आरक्षणावरून पंतप्रधान मोदींची टीका
15
'जग अर्णव' थोडक्यात बचावले; भारत संतापला, इराणच्या राजदूताला बजावले समन्स
16
IPL 2026 : मिलरचा किलर फिनिशिंग टच! RCB विरुद्धच्या रंगतदार सामन्यात DC नं अखेरच्या षटकात मारली बाजी
17
Akshaya Tritiya 2026 Wishes: अक्षय्य तृतीयेच्या हार्दिक शुभेच्छा, मराठी Messages, Images, Whatsapp Status शेअर करत साजरा करा अक्षय्य तृतीयेचा सण
18
"मम्मी, मी पास झाले..."; दहावी पास होताच लेकीने आईला केला फोन; Video पाहून व्हाल भावुक
19
इराणकडून भारतीय जहाजांवरच गोळीबार? टँकर VLCC माघारी परतला, होर्मुझमध्ये काय घडले...
20
कर्नाटकात 'बर्ड फ्लू'चा शिरकाव! बेंगळुरूमधील पोल्ट्री फार्ममध्ये H5N1 विषाणूचा प्रादुर्भाव; हजारो कोंबड्यांना पुरले
Daily Top 2Weekly Top 5

इंदिराग्राम गट ग्रामपंचायत अस्तित्वात

By admin | Updated: August 14, 2014 23:56 IST

येथील पंचायत समितीअंतर्गत कुंभा ग्रामपंचायतीचे विभाजन करून इंदिराग्राम (श्रीरामपूर) या नवनिर्मित ५७ व्या ग्रामपंचायतीची निर्मिती करण्यात आली. या ग्रामपंचायतीच्या कार्यालयाचे

मारेगाव : येथील पंचायत समितीअंतर्गत कुंभा ग्रामपंचायतीचे विभाजन करून इंदिराग्राम (श्रीरामपूर) या नवनिर्मित ५७ व्या ग्रामपंचायतीची निर्मिती करण्यात आली. या ग्रामपंचायतीच्या कार्यालयाचे उद्घाटन तब्बल सहा महिन्यांच्या विलंबाने पार पडले.कोलाम बांधवांच्या प्रखर आंदोलनातून १९९४ मध्ये महसुली गावाचा दर्जा प्राप्त झालेली सदर दोनही गावे १९९८ पासून स्वतंत्र गट ग्रामपंचायत स्थापनेच्या प्रतीक्षेत होती़ या संदर्भात कुंभा ग्रामपंचायतीमार्फत चार वेळा प्रस्ताव प्रशासनाकडे दाखल करण्यात आले़ दैनिक ‘लोकमत’ने सातत्याने हा प्रश्न उचलून धरला़ गेल्या १४ वर्षांच्या कालावधीत तब्बत ४९ बातम्या ‘लोकमत’मधून प्रकाशित झाल्या़ अखेर जिल्हा परिषद प्रशासन व शासनाला जाग आली आणि कुंभा ग्रामपंचायतीचे विभाजन करून इंदिराग्राम येथे नवीन ग्रामपंचायत स्थापेनला हिरवी झेेंडी मिळाली़ ग्रामविकास मंत्रालयातून यवतमाळ जिल्हा परिषदेला १८ जानेवारी २०१४ रोजी सदर ग्रामपंचायत स्थापन झाल्याचे पत्र मिळाले. जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांनी येथील गटविकास अधिकाऱ्यांना पत्र देऊन तत्काळ कारवाई करण्याचे निर्देश दिले़ ग्रामपंचायतीसाठी प्रशासकांची नियुक्तीसुध्दा झाली़ तथापि ग्रामपंचायतीचे दप्तर विभागणी व कार्यालय स्थापण्यास दिरंगाई होत होती. याबाबत जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ़मल्लीनाथ कलशेट्टी यांच्या निदर्शनास तंटामुक्ती अध्यक्षांनी ही बाब आणून दिली. त्यांनी तत्काळ मुहूर्त शोधून स्थानिक अंगणवाडी केंद्रात ग्रामपंचायत कार्यालयाचा फलक लावून कार्यालयाचे उद्घाटन केले. मात्र कार्यालयाच्या उद्घाटनाला कुंभाचे माजी सरपंच किंवा ग्रामपंचायतीच्या स्थापनेसाठी अविरत धडपडणाऱ्यांना विश्वासात न घेतल्याची खंत कार्यक्रमास्थळी व्यक्त करण्यात आली.याप्रसंगी आयोजित कार्यक्रमाला आमदार वामनराव कासावार, जिल्हा परिषद सदस्य नरेंद्र ठाकरे, पंचायत समिती सदस्य गजानन खापने, नानाजी खंडाळकर, वेणूताई काटवले, अ‍ॅड.राजीव कासावार, राकेश खुराणा, विनोद गाणार, दुष्यंत जयस्वाल, रामदास घोटेकर, पोडातील ज्येष्ठ नागरिक सुरबाजी आत्राम, पंजाब रामपुरे मंचावर उपस्थित होते़ ठाकरे यांनी गावातील पाणीपुरवठा, राजीव गांधी भवनाची जागा, सर्व कोलाम पोडांना जोड रस्ते, तसेच ग्रामपंचायत पेसाअंतर्गत समाविष्ट करण्यासाठी सर्वतोपरी प्रयत्न करणार असल्याचे सांगितले. संचालन कुंभा तंटामुक्त गाव समितीचे अध्यक्ष अण्णाजी कचाटे यांनी केले़ त्यानंतर झालेल्या पहिल्याच ग्रामसभेत ग्रामविकास, निवडणुकीसह विविध विषयांवर चर्चा होऊन आवाजी मताने ठराव पारित करण्यात आले. ग्रामसभेचे संचालन पंचायत विस्तार अधिकारी पी़एम़पंडित यांनी केले़ सभेला ग्रामपंचायतीअंतर्गत येणाऱ्या सहाही पोडातील नाईक, महाजनसह ग्रामस्थ उपस्थित होते. (तालुका प्रतिनिधी)