शहरं
Join us  
Trending Stories
1
खळबळजनक! ३० वर्षीय अभिनेत्री घरात बेशुद्ध पडली अन् घेतला अखेरचा श्वास, कुटुंबाला मोठा धक्का
2
'या' लोकांना दर महिन्याला ₹१०,००० पेन्शन देण्याचा विचार करतेय सरकार; कोणती आहे योजना, जाणून घ्या
3
इराण युद्धाची भारताने चुकवली किंमत, २५ लाख टन युरियाची दुप्पट दरात केली खरेदी; बाजारपेठेत खळबळ
4
ब्रेक फेल, नियंत्रण सुटले, भरधाव ट्रकची बोलेरोसह दोन वाहनांना धडक, ११ जण जिवंत जळाले   
5
IRS अधिकाऱ्याच्या मुलीवर अत्याचार आणि हत्या; हाय-टेक सुरक्षा भेदून घरात कसा घुसला आरोपी?
6
Success Story: ₹८००० ची नोकरी ते ₹२३,००० कोटींच्या साम्राज्यापर्यंत, स्कूल ड्रॉपआउट निखिल कामथ कसे बनले अब्जाधीश?
7
विशेष लेख: नॉनस्टॉप ७० तास गेमिंग! खाणं, झोपणं तिथेच!
8
आजचे राशीभविष्य - २३ एप्रिल २०२६, व्यापार - व्यवसायात लाभ होतील, नोकरीत वरिष्ठ खुश होतील
9
लेख: काँक्रीटच्या जंगलात चतकोर तरी मोकळी जागा ठेवाल का?
10
लेख: डोनाल्ड ट्रम्प यांना झुकवणाऱ्या होर्मुझ सामुद्रधुनीचे रहस्य!
11
आजचा अग्रलेख: शस्त्रे म्यान, गळचेपी सुरूच !
12
महापालिका अधिकारी कैलास गायकवाड यांच्या घरात रात्रभर झाडाझडती, पोलिसांना सापडलं मोठं घबाड
13
'...तर कॉन्सर्टला परवानगी नाहीच' पोलीस आयुक्तांची भूमिका; कठोर कारवाईचे आदेश
14
१ मे पासून ऑनलाइन गेमिंग्सबाबत नवे नियम; सरकारचा मोठा निर्णय, 'या' गेम्सवर बंदी तर इतरांना सूट
15
Bombay High Court: ‘त्या’ दोन महिलांना गर्भधारणेसाठी वैद्यकीय चाचण्यांना मुभा- मुंबई उच्च न्यायालय
16
Anil Deshmukh: अनिल देशमुख यांची उच्च न्यायालयात धाव, आरोप निश्चितीला स्थगितीची मागणी
17
Mumbai-Pune Expressway: मुंबई-पुणे एक्स्प्रेसवेवर आज आणि उद्या 'ब्लॉक; कारण काय? पर्यायी मार्ग कोणते? A टू Z माहिती
18
Ashwini Paul: ड्रग्ज सप्लायर अश्विनीचे आंतरराष्ट्रीय कनेक्शन; एअर कार्गोतून तस्करी?
19
राज्यात १८ प्रकल्पांत २.५६ लाख कोटींची गुंतवणूक; कोणत्या जिल्ह्यात किती रोजगार उपलब्ध होणार? 
20
ट्रम्प यांनी युद्धविराम वाढवला, पण इराणला नाही विश्वास, अमेरिकेसमोर ठेवली 'अशी' अट!
Daily Top 2Weekly Top 5

ग्रामसभा सदस्यांच्या भत्त्यात घसघशीत वाढ

By admin | Updated: November 12, 2014 22:50 IST

पंचायत राज व्यवस्थेने ग्रामसभेला विशेष अधिकार दिले असले तरी बहुतांश गावात ग्रामसभेला नगन्य उपस्थिती असते. एवढेच काय ग्रामपंचायत सदस्यही उपस्थित राहण्यास टाळाटाळ करतात. ही बाब लक्षात

किशोर वंजारी - नेर पंचायत राज व्यवस्थेने ग्रामसभेला विशेष अधिकार दिले असले तरी बहुतांश गावात ग्रामसभेला नगन्य उपस्थिती असते. एवढेच काय ग्रामपंचायत सदस्यही उपस्थित राहण्यास टाळाटाळ करतात. ही बाब लक्षात आल्याने शासनाने आता ग्रामसभेला उपस्थित राहणाऱ्या सदस्यांच्या उपस्थिती भत्त्यात घसघशीत वाढ केली आहे. प्रत्येक ग्रामसभेला उपस्थित राहणाऱ्या सदस्याला २०० रुपये भत्ता दिला जाणार आहे. पंचायत राज व्यवस्थेत ग्रामपंचायत विकासाचा केंद्र बिंदू आहे. गावाच्या विकासाचे नियोजन गावातच व्हावे यासाठी ग्रामसभेला विशेष अधिकार देण्यात आले आहे. ग्रामसभेत बहुमताने ठरविलेली कामे केली जातात. मात्र बहुतांश गावांमध्ये ग्रामसभा म्हणजे केवळ सोपस्कर झाला आहे. गावकरीही उपस्थित राहत नाही. परिणामी शासनाच्या उद्देशाला तडा जातो. काही मोजकीच मंडळी गावाच्या विकासाचा निर्णय घेतात. हा प्रकार टाळण्यासाठी ग्रामविकास विभागाने पुढाकार घेतला आहे. सभेला उपस्थित राहणाऱ्या सदस्यांना मानधन देण्याचा निर्णय घेतला. परंतु सुरुवातीला नाममात्र २५ रुपये भत्ता दिला जात होता. त्यामुळे अनेक सदस्य मासिक सभेकडे पाठ फिरवित होते. आपल्या मानधनात वाढ करावी, अशी मागणी त्यांनी केली होती. आता या मागणीत घसघशीत आठ पट वाढ झाली आहे. मासिक सभेला उपस्थित राहणाऱ्या सदस्यांना २०० रुपये मानधन दिले जाणार आहे. यात ७५ टक्के वाटा शासनाचा तर २५ टक्के वाटा ग्रामपंचायतीला उचलावा लागणार आहे. यासोबतच सरपंच व उपसरपंचांना देण्यात येणाऱ्या मानधनातही वाढ झाली आहे. ही वाढ गावच्या लोकसंख्येवर आधारित राहणार आहे. दोन हजार लोकसंख्या असलेल्या गावाला एक हजार रुपये, दोन ते आठ हजार लोकसंख्या असलेल्या गावाला दीड हजार रुपये तर आठ हजारापेक्षा जास्त लोकसंख्या असलेल्या गावात दोन हजार रुपये मानधन मिळणार आहे. यातील ७५ टक्के वाटा हा शासन उचलणार आहे. वर्षभरात कितीही सभा झाल्या तरी उपस्थित भत्ता केवळ १२ सभांसाठीच देण्यात येणार आहे. त्यामुळे सदस्य १२ ही सभांना उपस्थित राहिल्यास त्याला वर्षभराचे २४०० रुपये मिळणार आहे.ग्रामविकासाचा केंद्रबिंदू असलेल्या ग्रामसभांच्या बळकटीकरणासाठी शासनाने हे पाऊल उचलले आहे. आता ग्रामसभांंना सरपंच, उपसरपंच आणि सदस्यांसह गावकरीही मोठ्या संख्येने उपस्थित राहतील, अशी अपेक्षा आहे. यातून गावाचा निश्चितच विकास होणार आहे. यासाठी गरज आहे ती, गावकऱ्यांच्या आणि पुढाऱ्यांच्या इच्छाशक्तीची.