शहरं
Join us  
Trending Stories
1
सूर्य कोपला, विदर्भात तापला! उष्णतेचा कहर; अकोल्यात देशातील सर्वाधिक ४६.९ अंश सेल्सिअस तापमान
2
पाकिस्तानात 'अज्ञाता'चा पुन्हा थरार; लष्करचा टॉप कमांडर शेख युसूफ अफ्रिदीचा 'खातमा'! नेटवर्कला मोठा धक्का
3
"फक्त जिम करून बॉलर होणार नाहीस, तर..." शमीच्या तालमीत कसा घडला मोहसिन खान?
4
शिवाजी महाराज पूज्यनियच, माझ्या वक्तव्याचा विपर्यास केलागेला - धीरेंद्र शास्त्री
5
बाजारात आली नवीन इलेक्ट्रिक कार, ६३० किमी रेंज, केवळ ९ मिनिटांत होईल फुल चार्ज! जबरदस्त आहेत फीचर्स
6
ट्रेनवर चढलेल्या युवकाचा विजेच्या धक्क्याने मृत्यू, ओएचई वायरला स्पर्श; विद्युत पुरवठा विस्कळीत, रेल्वे पोलिसांत गुन्हा दाखल
7
पंतनं खिलाडूवृत्ती नाही जपली! Angkrish Raghuvanshi ची विकेट ठरली वादग्रस्त; नेमकं काय घडलं?
8
DCM शिंदेंनी केली ‘मिसिंग लिंक’च्या कामाची पाहणी; कोणत्या वाहनांना परवानगी अन् टोल किती?
9
"महिलांना वर्षाला ३६०००, प्रत्येक घुसखोराला हाकलून लावणार अन् TMC..."; पंतप्रधान मोदींची मोठी घोषणा
10
भूषण गवई-धीरेंद्र शास्त्री भेटीवरून टीका, CM फडणवीसांनी सुनावले; म्हणाले, “श्याम मानव कोण?”
11
साई सुदर्शनचा जलवा; ऋतुराजची जिगरबाज खेळी व्यर्थ! चेपॉकच्या मैदानात गुजरातनं उडवला चेन्नईचा धुव्वा
12
जय श्रीराम! आता मुंबईतून अयोध्या गाठणे सुलभ, अमृत भारत ट्रेन सुरू होणार; पाहा, थांबे-वेळा
13
जयपूरच्या राजघराण्यातील 'सुपरकॉम्प्युटर'चा लंडनमध्ये लिलाव; १७व्या शतकातील यंत्र आजही कार्यरत...
14
आता ‘वंदे भारत बुलेट ट्रेन’ येणार, बंगळुरूत बांधणी; ICF-BEMLवर जबाबदारी, रेल्वेची मेगा योजना!
15
HSC Result 2026: महाराष्ट्र बोर्ड १२ वीचा निकाल कोणत्याही क्षणी! डिजीलॉकरवर 'Coming Soon' चे संकेत; निकाल पाहण्यासाठी 'हे' डिटेल्स ठेवा तयार
16
हरभजन सिंगविरोधात रोष, भाजपत प्रवेश केला म्हणून घरावर लिहिलं 'गद्दार'; बघा VIDEO
17
‘आप’ने दणके द्यायला सुरुवात केली; हरभजन सिंगची सुरक्षा काढली, पंजाब मान सरकारची नाराजी उघड
18
“छत्रपती शिवाजी महाराज कधी थकले नाहीत, झुकले नाहीत”; राऊतांचा धीरेंद्र शास्त्रींवर पलटवार
19
आपली बस, आपली सेवा…! ST प्रवाशांसाठी मोठे पाऊल; १ मे पासून ‘लालपरी’चे नवे अभियान होणार सुरू
20
“लोकशाहीत हिंसाचाराला थारा नाही”; वॉशिंग्टन हॉटेल गोळीबार प्रकरणी PM मोदींची प्रतिक्रिया
Daily Top 2Weekly Top 5

शिक्षक आमदारांचे बेमुदत उपोषण

By admin | Updated: October 19, 2016 00:24 IST

शिक्षकांच्या विविध मागण्यांसाठी शिक्षक आमदार श्रीकांत देशपांडे उपोषणाला बसले.

शिक्षक आघाडी : चर्चा टाळल्याने शिक्षणमंत्र्यांचा निषेधयवतमाळ : शिक्षकांच्या विविध मागण्यांसाठी शिक्षक आमदार श्रीकांत देशपांडे उपोषणाला बसले. मात्र, भेटीची वेळ ठरल्यानंतरही शिक्षणमंत्र्यांनी चर्चेला आलेल्या शिष्टमंडळाला ताटकळत ठेवले. याबाबत शिक्षक आघाडी, शिक्षक सेना, महाराष्ट्र राज्य शाळा कृती समिती आदींनी निषेध नोंदविला आहे.१७ आॅक्टोबरपासून अमरावती विभागाचे शिक्षक आमदार श्रीकांत देशपांडे तसेच शिक्षक सेनेचे अध्यक्ष ज. मो. अभ्यंकर व पुण्याचे शिक्षक आमदार दत्तात्रय सावंत शिक्षकांच्या मागण्यांसाठी मुंबईच्या आझाद मैदानावर बेमुदत उपोषणाला बसले आहेत. ३० आॅगस्ट २०१६ च्या मंत्रिमंडळ बैठकीत मंजूर केलेले १४३ कोटी सरसकट २० टक्के अनुदान दिवाळीपूर्वी द्यावे, अशी मागणी करण्यात आली. तसेच १ व २ जुलै रोजी अनुदानास पात्र ठरलेल्या घोषित शाळांना सरसकट २० टक्के अनुदान देण्यात यावे, १९ सप्टेंबरच्या शासन आदेशातील जाचक अटी रद्द कराव्या, अघोषित शाळा व कनिष्ठ महाविद्यालयांची यादी तत्काळ घोषित करावी, विनाअनुदानित शाळेतील शिक्षकांच्या औरंगाबाद येथील मोर्चातील शिक्षकांवर लावलेले ३०७ कलम रद्द करावे, अपंग समावेशित विशेष शिक्षक व परिचर यांच्या बाबत उच्च न्यायालयाच्या औरंगाबाद खंडपीठाच्या २५ आॅगस्टच्या निर्णयाची अमलबजावणी करावी आदी मागण्यांसाठी शिक्षक आमदारांनी उपोषण सुरू केले आहे. १७ आॅक्टोबर रोजी उपोषणकर्त्यांच्या शिष्टमंडळाला दुपारी ३ वाजता शिक्षण मंत्री विनोद तावडे यांच्याकडे बोलाविण्यात आले होते. त्याप्रमाणे पोलीस वाहनातून ७ जणांचे शिष्टमंडळ ३ वाजता शिक्षणमंत्र्यांच्या भेटीसाठी उपस्थित झाले. मात्र, वेळ ठरलेली असतानाही शिक्षणमंत्री ३.४५ पर्यंत उपलब्ध झाले नाही. शिक्षक आमदारांच्या उपोषणालाही शिक्षणमंत्री महत्त्व न देता कृतीतून अवमान करतात, ही बाब निषेधार्ह असल्याचे शिक्षकांनी म्हटले आहे. शिक्षणमंत्र्यांच्या या कृतीचा निषेध करण्यात आल्याची माहिती शिक्षक आघाडीचे यवतमाळ जिल्हाध्यक्ष अविनाश रोकडे यांनी दिली. (स्थानिक प्रतिनिधी)